शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३१ ऑगस्टला शुक्राचा सिंह प्रवेश: ‘या’ राशींना सुख-समृद्धी वृद्धी; तुमची रास कोणती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:01 PM

1 / 15
2 / 15
भौतिक सुखांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर २३ दिवस या राशीत राहून शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. यानंतर पुढील काही दिवस सूर्य आणि शुक्राची युती असेल. (shukra gochar in singh rashi 2022)
3 / 15
ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ असेल तेव्हा देवी लक्ष्मीचाही विशेष शुभाशीर्वाद मिळतो. जेव्हा शुक्र प्रतिकूल असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील, त्यामुळे काही लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी शुक्राचे गोचर कसे सिद्ध होऊ शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश अनुकूल ठरू शकेल. या कालावधीत आत्मसंयम ठेवा. जास्त राग टाळा. मनःशांतीसाठी प्रयत्न करा. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. आरोग्याबाबत सावध राहा कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. या कालावधीत मन प्रसन्न राहील. पण संभाषणात संयत राहा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश लाभदायक ठरू शेकल. या काळात मनात शांतता आणि आनंद राहील. आत्मविश्वास भरपूर असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उच्च पद मिळू शकते. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत मन अस्वस्थ होऊ शकते. आत्मसंयम ठेवा. व्यवसायात वाढ होईल. धावपळीचा अतिरेक होईल. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम होतील. लाभदायक प्रवास होत आहे.
8 / 15
सिंह राशीत होत असलेला शुक्राचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. या काळात मन प्रसन्न राहील. पण नोकरीतील बदलामुळे अस्वस्थताही जाणवेल. अधिक धावपळ होईल. खर्च वाढतील. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश आनंददायी ठरू शकेल. आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल. पण संयम कमी होऊ शकतो. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कौटुंबिक वाद होऊ शकते. मालमत्तेतून आर्थिक लाभ होऊ शकतो.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश अनुकूल ठरू शकेल. सकारात्मकता वाढू शकेल. व्यवसायात जास्त धावपळ होईल. मात्र, केलेल्या मेहनतीचे चीज होईल. यश मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. अधिक धावपळ होईल. तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या जीवनसाथीची काळजी घ्या. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत मानसिक स्थितीत चढ-उतार असतील. खर्चाच्या अतिरेकामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. वास्तूचा आनंद वाढू शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत परदेशात जाण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश यशकारक ठरू शकतो. कला किंवा संगीताकडे कल वाढू शकतो. बोलण्यात मवाळपणा राहील. पण संयम कमी होऊ शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. वाचनाची आवड निर्माण होईल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. मनःशांती राहील. आत्मविश्वास वाढेल. धार्मिक संगीतात रुची वाढू शकते. मान-सन्मान मिळू शकतो. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा सिंह प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आत्मविश्वास भरपूर असेल. पण मन अस्वस्थ होऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात वाढ होईल. परदेश प्रवास व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अधिक उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य