शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचे सिंह राशीत गोचर: ७ राशींना ३२ दिवस लाभ, गुप्तधन प्राप्ती योग; शेअर मार्केटमधून नफा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 3:03 PM

1 / 15
नवग्रहांपैकी महत्त्वाचा मानला गेलेला शुक्र ग्रह कर्क राशीतून सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान झाला आहे. आगामी ३२ दिवस शुक्र ग्रह सिंह राशीत असेल. यानंतर ०३ नोव्हेंबर रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल.
2 / 15
कन्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी शुक्र ग्रह १७ ऑक्टोबर रोजी पूर्वा नक्षत्र आणि ३० ऑक्टोबर रोजी उत्तरा नक्षत्रात गोचर करेल. त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक शुक्र ग्रह मानला गेला आहे.
3 / 15
कुंडलीत शुक्र बलवान असेल तर व्यक्तीला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. लग्नानंतर वैवाहिक जीवन आनंदी राहते. प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. जर कुंडलीत शुक्र कमजोर स्थितीत असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असे म्हटले जाते. सिंह राशीतील शुक्राचे गोचर सर्व राशींसाठी कसे असेल? काही राशींसाठी फायदेशीर ठरेल तर काही राशींना समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. जाणून घेऊया...
4 / 15
मेष: शुक्र गोचराचा काळ वरदानापेक्षा कमी नाही. विशेषत: विद्यार्थी आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. प्रेम जीवन खूप मजबूत होईल. परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदारी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. कोणताही घाईघाईने निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
5 / 15
वृषभ: शुक्राचा प्रभाव लाभदायक ठरू शकतो. स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकेल. घर आणि वाहन खरेदीसाठी हा चांगला काळ आहे. परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. नोकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी किंवा नागरिकत्वासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्या दृष्टीनेही वेळ चांगला जाईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल.
6 / 15
मिथुन: कौटुंबिक जीवन खूप चांगले असेल. धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. इतरांना मदत करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. व्यवसाय वाढीसाठी कोणतीही योजना करत असाल तर ती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. भावंडांसोबत मतभेद नसावेत. व्यापाऱ्यांना वेळोवेळी नफा मिळेल. नवीन मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याच्या स्थितीत असाल, ज्यामुळे फायदा होईल.
7 / 15
कर्क: आर्थिक बाजू मजबूत राहील. कुठूनतरी गुप्तधन प्राप्तीची शक्यता आहे. ज्यामुळे फायदा होईल. नोकरदारांचे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. डोळ्याशी संबंधित समस्यांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी षड्यंत्राचे बळी होण्याचे टाळा. कामात प्रामाणिक राहा. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील.
8 / 15
सिंह: आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. शत्रू काहीही नुकसान करू शकणार नाहीत. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर चांगले लाभ होतील. एखाद्या कामांत सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. करिअरमध्ये परदेशी संधी मिळू शकतात, ज्यामुळे जीवनात आनंद मिळेल.
9 / 15
कन्या: जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. शेअर ट्रेडिंगमधून चांगला फायदा होईल. चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल. परदेश प्रवासाचा लाभ मिळेल. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या दृष्टीने काळ अनुकूल राहील. कोणालाही जास्त पैसे उधार देऊ नका, अन्यथा पैसे वेळेवर मिळणार नाहीत.
10 / 15
तूळ: मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिल्यास शुभ फळ मिळतील. उर्जेचा योग्य वापर केला तर पूर्णपणे यशस्वी व्हाल. नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मोठ्या भावांसोबत मतभेद वाढू देऊ नका. करिअरमध्ये परदेशी जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, जीवनात आनंद मिळेल.
11 / 15
वृश्चिक: एखादी निवडणूक लढवायची असेल तर त्यात विजय मिळेल. रिअल इस्टेटशी संबंधित प्रकरणे सोडवली जाऊ शकतील, जिथे नफा मिळू शकेल. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळू शकते. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात फायदा होईल. सामान चोरीला जाऊ नये म्हणून काळजीपूर्वक प्रवास करा. कामाच्या जास्त दबावामुळे चुका होऊ शकतात. नोकरदार लोकांना दुसऱ्या कंपनीकडून कॉल येऊ शकतो. नवीन ऑफर मिळू शकते.
12 / 15
धनु: जीवनात ध्यान आणि योगाचा समावेश करा. आरोग्य चांगले राहील. कामामुळे प्रशंसा आणि यश मिळेल. धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल. व्यवसाय योजना गोपनीय ठेवा. कामात व्यस्त राहा. मित्राला पैसे उसने दिले, तर नुकसान सहन करावे लागू शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे फायदेशीर ठरेल.
13 / 15
मकर: नोकरदारांना सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेलच असे नाही. कठीण स्पर्धेचा सामना करावा लागेल. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी षड्यंत्राचे बळी होण्याचे टाळा. आर्थिक बाजू मजबूत असेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळा. आप्तेष्ट अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, सावध राहा.
14 / 15
कुंभ: चांगले पैसे कमवू शकता. पैसे वाचवू शकता. नोकरदारांना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलांसाठी काही ठोस निर्णय घेऊ शकाल. सासरच्या लोकांकडून सहकार्य आणि मदत मिळू शकेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल, ज्याचा फायदा होईल. उत्पन्नाला पूरक असे अनेक मार्ग दिसतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
15 / 15
मीन: जास्त खर्चामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचे फायदे मिळतीलच, शिवाय लक्झरी वस्तूंवरही जास्त खर्च कराल. करिअरवर लक्ष केंद्रित करावा. पैसे कमवण्यावर आणि बचत करण्यावर भर द्यावा. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी केलेल्या योजना यशस्वी होतील. आयुष्यात येणाऱ्या संधींचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य