शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; लक्ष्मी देवीची कृपा अन् दिवाळीत अपार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:31 AM

1 / 9
यंदाच्या दिवाळीला विशेष योग जुळून येत आहेत. यंदाचा दीपोत्सव केवळ धार्मिक नाही, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला गेला आहे. एकामागून एक ग्रहांचे होत असलेले राशीपरिवर्तन काही राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ तसेच लाभदायक मानले जात आहे. तर काही राशीच्या व्यक्तींना हा संमिश्र कालावधी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. (venus transit in libra 2022)
2 / 9
१६ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर १७ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर लगेचच १८ ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहही कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (shukra gochar in tula rashi 2022)
3 / 9
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी मानला गेला आहे. त्यामुळे शुक्राचा तूळ प्रवेश अनेकार्थाने विशेष मानला जात आहे. या कालावधीत धनत्रयोदशीसह दिवाळीतील अनेक सण साजरे केले जाणार आहेत. या पाच राशींवर शुक्राच्या शुभ प्रभावामुळे दिवाळीत लक्ष्मी देवीची विशेष कृपा होईल. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्रचा तूळ प्रवेश यशकारक ठरू शकेल. तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती होईल. तुमचे अधिकारी वर्गाशी संबंध चांगले राहतील. हा काळ व्यवसायिकांना खूप फायदेशीर ठरू शकतो. मोठा करार करू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. दाम्पत्य जीवन आनंदी असेल. शक्य असल्यास शुक्रवारी ७ प्रकारचे धान्य दान करावे.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा तूळ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जे काही मिळवण्यासाठी तुम्ही दीर्घकाळ मेहनत करत आहात, ते तुम्हाला मिळू शकेल. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते किंवा त्यांना दिवाळीत उंची भेटवस्तू मिळू शकतात. तुम्ही पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद टाळणे चांगले.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्रचा तूळ प्रवेश शुभ ठरू शकेल. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीवर पैसे खर्च करू शकाल. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वाहन सुख मिळू शकते. व्यवसायाशी निगडीत असलेल्यांना या सणासुदीत अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. तुम्ही कष्टात कमी पडू नका. आर्थिक लाभाच्या रूपात मेहनतीचे फळ मिळण्याची अपेक्षा आहे. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीतही हा काळ अतिशय चांगला असणार आहे.
7 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्रचा तूळ प्रवेश प्रगतीकारक ठरू शकेल. भौतिक सुखांमध्ये वाढ होऊ शकेल. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्हाला यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमच्या क्षेत्रातील कामगिरीतही सुधारणा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. येणी परत मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होऊ शकतात.
8 / 9
शुक्र आपलेच स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना हे गोचर सकारात्मक ठरू शकेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. पैसे वाचवू शकाल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देऊ शकेल.
9 / 9
सूर्याच्या तूळ प्रवेशानंतर शुक्र तसेच बुधाच्या तूळ राशीतील विराजमान होतील. यामुळे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य