शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा धनु प्रवेश: ‘या’ १० राशींना अनुकूल, लाभदायक; २ राशींना संमिश्र, तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 3:02 PM

1 / 15
शुक्राचे हे संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. शुक्र वृश्चिक राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत विराजमान झाला आहे. आगामी महिनाभर शुक्र याच राशीत राहील. वास्तविक पाहता शुक्र आणि गुरु शत्रू ग्रह मानले जातात. मात्र, धनु राशीत शुक्र आणि बुधची युतीने विशेष लाभदायक राजयोग तयार होत आहे. (venus transit in sagittarius december 2022)
2 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र डिसेंबर महिन्यात राशीपरिवर्तन करत आहे. २९ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल. (shukra gochar in dhanu rashi december 2022)
3 / 15
शुक्राचे राशीपरिवर्तन १० राशीच्या व्यक्तींना अनुकूल आणि लाभदायक ठरू शकते. तर केवळ २ राशींना शुक्राचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. तुमच्यावर कसा असेल शुक्राचा धनु राशीतील प्रवेशाचा प्रभाव? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. विवाहासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दाम्पत्य जीवनही सुखकारक होऊ शकते. अनेक बाबतीत लाभ प्राप्त होऊ शकतात. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक व्यस्त राहील.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश काहीस संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. तळलेले पदार्थ खाणे टाळावे. संशोधन कार्य आणि गंभीर विषयांबद्दल काही शिकण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ आहे. एवढेच नाही तर या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. विवाहासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. लांबच्या प्रवासालाही जावे लागेल. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. भागीदारीतील व्यवसायात खूप फायदा होऊ शकेल.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. तुमच्या आईच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात काही गोष्टींबद्दल वाद होऊ शकतो. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मित्रांमध्येही मतभेद होण्याची शक्यता आहे.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. प्रेमात असलेल्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकेल. प्रियजनांसोबत आनंददायी क्षण व्यतीत करू शकाल. मुलांचे सुख मिळू शकते. शुक्राचे संक्रमण खूप चांगले असू शकेल.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश कौटुंबिकदृष्ट्या सुखद ठरू शकेल. आई-वडिलांशी असलेले संबंध अधिक दृढ होऊ शकतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन करू शकता. मात्र, खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. महागड्या वस्तूंची खरेदी करू शकाल.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश फलदायी ठरू शकेल. तुमचे लेखन कौशल्य, संवाद आणि सर्जनशील कार्यात वाढ होईल. याचा नक्कीच फायदा होईल. भावंडांसोबत सहलीला जाण्याची योजना करू शकता. आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकाल. परदेशातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ चांगला असणार आहे. त्यातून सकारात्मक परिणाम मिळू शकतील.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा याच राशीतील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. स्वतःला सिद्ध करण्याचा पूरेपूर प्रयत्न कराल. जनसंपर्कात वाढ होऊ शकेल. प्रभावशाली लोकांशी असलेला संपर्क वाढू शकेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नही वाढू शकेल.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आयात-निर्यातीशी संबंधित आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना करिअरमध्ये शुभ परिणाम दिसून येतील. व्यावसायिक कामासाठी परदेशात जाऊ शकाल. प्रवास फायदेशीर ठरेल. नात्यात गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश उत्तम फलदायी ठरू शकेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. एवढेच नाही तर समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमात असलेल्यांचे नाते अधिक घट्ट होईल. शुक्राचे गोचर खूप फलदायी ठरेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा धनु प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तुम्ही कामात अधिक सर्जनशील व्हाल. कामे अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करू शकाल. व्यावसायिक जीवनात अचानक काही बदल होऊ शकतात. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य