शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 10:26 AM

1 / 9
नोव्हेंबर महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. यामध्ये नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य, नवग्रहांचा राजकुमार बुध आणि शुक्र यांचा समावेश आहे. तर नवग्रहांचा सेनापती मंगळ वक्री होणार असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पति मार्गी होणार आहे. यापैकी शुक्राचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले गेले आहे. (venus transit in scorpio 2022)
2 / 9
शुक्र ग्रह स्वराशीतून म्हणजेच तूळ राशीतून ११ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. शुक्र ग्रह धन, वैभव, सुखकारक मानला जातो. वृश्चिक राशीत शुक्राच्या आगमनाने काही राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होणार होऊ शकेल. (shukra gochar in vrushchik rashi 2022)
3 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर होतो. अशा परिस्थितीत शुक्राचा वृश्चिक राशीत प्रवेश अनेक राशींसाठी हानिकारक ठरू शकतो. शुक्र सुमारे २५ दिवस वृश्चिक राशीत असेल, यानंतर ५ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करेल.
4 / 9
काही राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशीपरिवर्तन प्रतिकूल प्रभाव पडणारे ठरू शकेल. शुक्राचा प्रभाव प्रेमसंबंध, आर्थिक आघाडीवर पडू शकेल. या कालावधीत काही समस्या, अडचणींचा सामना करावा लागू शकेल. तर, काही गोष्टी करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्यासाठी शुक्राचे वृश्चिक राशीतील गोचर कसे ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. प्रेम जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराच्या आरोग्याबाबतही तुम्ही चिंतेत राहू शकता. प्रवासावर पैसे खर्च होऊ शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. तिथेही पैसा खर्च होईल. नशिबावर विसंबून काहीही करू नका. या काळात केवळ चिकाटी आणि मेहनत तुमच्या कामी येऊ शकेल.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. जोखमी पत्करून गुंतवणूक करणे हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक जीवनात हट्टीपणा आणि विसंगत बोलण्यामुळे तणाव होऊ शकतो. मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. बोलताना तारतम्य ठेवून संभाषण करावे. या कालावधीत छंद आणि आवडींवर पैसे खर्च होऊ शकतात.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या आगामी काळात खर्च वाढू शकतात. छंद आणि सुखाची इच्छा वाढेल. जे वाहन खरेदी करू पाहत आहेत त्यांना वाहन खरेदी करण्यात यश मिळू शकते. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. एखाद्या गोष्टीबद्दल मनात भीती राहू शकेल. आर्थिक बाबतीत धोका पत्करू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. लव्ह लाइफ कटू-गोड अनुभव येऊ शकतील. प्रियकराशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. घराच्या गरजांवर पैसा खर्च कराल. मुलांचे आरोग्य आणि शिक्षणावर पैसा खर्च होऊ शकेल. प्रवासाचे नियोजन करता येईल. सामाजिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये तणाव राहील. कुठूनतरी पैसे येणार असतील तर या दिवसात अडकू शकतात.
9 / 9
११ नोव्हेंबर रोजी शुक्रानंतर सूर्य आणि बुधाचेही वृश्चिक राशीत आगमन होणार आहे. या तीनही ग्रहाच्या एकाच राशीत असण्याने अनेक शुभ जुळून येणार आहेत. याचा अनेक राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य