शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वृश्चिक प्रवेश: ‘या’ ८ राशींवर शुक्राची कृपा; धनलाभाचे उत्तम योग; सुख लाभेल, भाग्य चमकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:58 AM

1 / 15
नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा मानला गेलेला ग्रह म्हणजे शुक्र. या ग्रहाने आपल्या स्वराशीतून म्हणजेच तूळ राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीत शुक्र ग्रह ५ डिसेंबरपर्यंत विराजमान असेल. (venus transit in scorpio november 2022)
2 / 15
मंगळाच्या राशीत येणारा शुक्र आणि नंतर मंगळाच्या राशीत जाणारा शुक्र. ही अत्यंत शुभ स्थिती आहे. यामुळे मंगळ आणि शुक्र यांच्यामध्ये राशी परिवर्तन होईल. या योगाने शुक्र वृश्चिक राशीत बुधाची साथही मिळेल, जो अनेक राशींसाठी खूप शुभ आणि फलदायी असेल. (shukra gochar in vrishchik rashi november 2022)
3 / 15
शुक्र ग्रह हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेला आहे. या शुक्राचा वृश्चिक राशीतील प्रवेशाचा कोणत्या राशींना भरघोस लाभ मिळू शकेल. कोणाचा उत्तम फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश उत्तम फलदायी ठरू शकेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आगामी काळात तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतील. मात्र, पैसे गुंतवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. संयम राखा. तुमचा स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकतो. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण केल्याने लाभ मिळू शकेल. त्यातून पैसे मिळविण्यासाठी ही चांगली वेळ आहे. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कार्यक्षेत्रासाठी चांगला काळ आहे. आयात-निर्यात व्यवसाय आहे, त्यांच्या कामाला चालना मिळेल. तुम्ही तुमच्या कामाचा विस्तार करू शकता. कोणालाही कर्ज देणे टाळा. अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता धुसर होऊ शकेल. परदेशात जाणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश लाभदायक ठरू शकेल. मंगळ आणि शुक्राचे परिवर्तन योग तुम्हाला धनप्राप्तीत लाभ देतील. नवीन मार्ग सापडतील. सामाजिक कार्यात असणाऱ्यांना अनेक लोकांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकेल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. शुक्राचे गोचर तुमच्यासाठी एकंदरीत खूप शुभ मानले गेले आहे.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश चांगले ठरू शकेल. कामात मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. तुम्हाला कामात मोठे यश मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. सुखसोयी वाढू शकतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश अनुकूल ठरू शकेल. भाग्याचा संपूर्ण पाठिंबा मिळू शकेल. तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न करणे थांबवा, तुम्ही प्रयत्न करत राहावे. अनेक गोष्टींसाठी चांगला काळ राहील. परदेशात जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी हा खूप चांगला योग आहे. धावपळ वाढू शकेल. खर्च वाढू शकतो. अडचणींमध्ये काही प्रमाणात कपात होऊ शकते.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. सरकारी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवाल. चांगली सहकार्य मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतील. उत्पन्न वाढू शकेल. मात्र, गुंतवणुकीच्या योजना लांबणीवर टाका. मन प्रसन्न राहील.
11 / 15
वृश्चिक राशीत होत असलेला शुक्राचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींसाठी आनंददायी ठरू शकेल. जोडीदाराशी असलेले नातेसंबंध सुधारतील. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. भागीदारीतील व्यवसाय लाभदायक ठरू शकतील. शुक्राचे गोचर उत्तम ठरू शकेल. मात्र, त्याचबरोबर खर्चातही वाढू होऊ शकेल.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश अनुकूल ठरू शकेल. संपत्तीत वाढ होऊ शकते. परदेशात तुमचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरदारांचे नशीब उजळेल. चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात. परदेश प्रवासाचे संकेत आहेत. व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश चांगला ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे संक्रमण चांगले आहे. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. दिलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी विविध स्त्रोतांकडून पैसे येतील. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. जुना मित्र भेटल्यानंतर मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यात अडचणी येऊ शकतील. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. शत्रूंची संख्या वाढू शकते. कौटुंबिक कलहामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आगामी काळ सामान्य राहू शकेल.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृश्चिक प्रवेश नवीन वस्तू खरेदी कराल. नशीब तुम्हाला खूप साथ देईल. अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. परंतु कठोर परिश्रम आवश्यक आहेत. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होऊ शकते. तुमचा आनंद आणि समृद्धी वाढेल. मात्र, काही गोष्टींमध्ये गोंधळ वाढू शकेल. पैशांचे व्यवहार करताना योग्य खबरदारी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य