शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ७ राशींना शानदार, उत्पन्नात वाढ; नशिबाची साथ अन् यशाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 7:08 AM

1 / 15
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला नवग्रहातील शुक्र ग्रह एप्रिल महिन्यात स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. (venus transit in taurus 2023)
2 / 15
मंगळाच्या मेष राशीतून शुक्राचे वृषभ राशीत गोचर झाले आहे. ०२ मे २०२३ रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. तत्पूर्वी, मेष राशीत असताना राहु, बुध आणि शुक्राचा त्रिग्रही योग जुळून आला होता. शुक्राच्या वृषभ प्रवेशानंतर या योगाची सांगता झाली आहे. शुक्राचा वृषभ प्रवेश महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण या राशीत शुक्र मजबूत स्थितीत असेल असे सांगितले जात आहे. (shukra gochar in vrishabha rashi 2023)
3 / 15
शुक्राच्या गोचराचा देश-दुनियेसह अर्थव्यवस्था, करिअर तसेच सर्व १२ राशींवर प्रभाव पडेल, असे म्हटले जात आहे. कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असेल तर मान-सन्मान, यश-प्रगती, नानालाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. तर शुक्र कमकुवत असेल तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शुक्राचा वृषभ प्रवेश तुमच्यासाठी कसा ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पैसे वाचवणे शक्य होऊ शके. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ राशीत शुक्राचे आगमन झाले आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या व्यक्तींना स्वामीग्रहाचे आगमन अनुकूल ठरू शकते. एखादा नवा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकाल. सहलीला जाण्याचे बेत आखू शकाल. इच्छापूर्ती होऊ शकेल. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकतो. भागीदारीत व्यवसाय करायचा असेल, तर ही योजना काही काळासाठी पुढे ढकला. या कालावधीत, एकीकडे, तुम्ही पैसे कमवू शकाल, दुसरीकडे, तुमचे खर्च वाढू शकतील. अध्यात्मिक कार्यांकडे कल असेल. लांबच्या प्रवासाला जावे लागेल. नोकरदारांना सहकाऱ्यांचा त्रास होऊ शकतो.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अनेक क्षेत्रांतून पैसे कमावण्याच्या संधी असतील, पण तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये काही कारणाने वादाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. गरजा भागवण्यासाठी कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते. बजेट पाहूनच खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेशाने कौटुंबिक बाबींमध्ये त्रास होऊ शकतो. भावंडांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते. खूप धावपळ करावी लागेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील, तरच चांगल्या संधी मिळू शकतील.
9 / 15
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. कुटुंबात लग्नासारखे काही शुभ कार्य होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल. प्रगतीच्या नवीन संधीही मिळू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदाराशी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. मुलांची झपाट्याने प्रगती होऊ शकेल. करिअरमध्ये चांगल्या पदावर पोहोचून समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ अनुकूल आहे. विवाहितांचे जीवन सुखमय होऊ शकेल. मानधनात चांगली वाढ होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याचे फायदे होऊ शकतील. नशीब आणि वडिलांची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होऊ शकतील. करिअरमध्ये नशिबाने साथ दिल्याने चांगले पैसे मिळू शकतील. नवीन संधीही मिळतील. जोडीदार आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. भावंडांना सोबत घेऊन घरगुती कामे पूर्ण करू शकाल. नातेसंबंध मजबूत होऊ शकतील.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आरोग्य चांगले राहू शकेल. समस्यांतून दिलासा मिळू शकेल. कामाचा ताण जास्त राहू शकेल. अधिका-यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या निर्णयांबाबत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा धनहानी होण्याची शक्यता आहे.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतील. कामानिमित्त परदेशातही जावे लागू शकते. भावंडांसोबतचे नाते घट्ट होऊ शकेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहू शकेल. नोकरी करणाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. अन्यथा अधिकाऱ्यांच्या बाजूने वाद होऊ शकतो.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश लाभाचा ठरू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागेल. लव्ह लाईफमधील गैरसमज झाल्यामुळे मोठा वाद होऊ शकतो. व्यवसायात निर्णयक्षमतेचा चांगला फायदा होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकाल. विवाहितांसाठी काळ अनुकूल राहू शकेल. जोडीदारासोबत भविष्यातील योजनाही बनवू शकतील.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा वृषभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील. नशिबाने साथ दिल्याने उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकेल. व्यापारी नफा कमावण्यात यशस्वी होऊ शकतील. पैसे वाचवण्याची संधीही मिळू शकेल. पर्यटन, सहलीला जाण्याची योजना बनवू शकाल. नवीन मालमत्ता खरेदीचे प्लान करू शकाल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य