शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मी नारायण समसप्तक योग: ७ राशींना सुवर्ण संधी, यश-प्रगती; कमाई वाढेल, ३ ग्रह शुभ करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:28 PM

1 / 10
चातुर्मास सुरू आहे. काही दिवसांनी जुलै महिना संपून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर होत असून, त्यामुळे विविध शुभ योग, राजयोग, काहीसे प्रतिकूल योग जुळून येणार आहेत.
2 / 10
जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ जुलै रोजी शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत बुध ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीने शुभ मानला गेलेला लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. तसेच शुक्र ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशाने कुंभ राशीत असलेल्या शनी ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे.
3 / 10
शुक्राच्या सिंह प्रवेशाने जुळून येणारे लक्ष्मी नारायण आणि समसप्तक योग काही राशींना अनेक बाबतीत लाभदायक ठरू शकतात, असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या लकी राशी? शुक्राच्या सिंह प्रवेशाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: लक्ष्मी नारायण राजयोग शुभ ठरू शकतो. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल. बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळे व्यवसायाचा विस्तार करणे चांगले राहू शकेल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.
5 / 10
वृषभ: आगामी काळ शुभ फलदायक ठरू शकेल. आर्थिक बाबींमध्ये मोठा फायदा होऊ शकेल. नवीन मालमत्ता खरेदी-विक्री करू शकता. व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. उत्साहाने काम कराल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन कल्पनांवर काम करू शकाल. मुलांची प्रगती पाहून समाधानी असाल.
6 / 10
कर्क: चांगले यश मिळू शकेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकेल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय प्रस्थापित होऊ शकेल. पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकाल.
7 / 10
सिंह: लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यावसायिकांना काही मोठे यश मिळू शकते. कमाईचे साधन वाढू शकेल. नियोजित योजना पूर्ण होऊ शकतील. भागीदारीच्या कामात फायदा होईल.
8 / 10
तूळ: लक्ष्मी नारायण राजयोगाने चांगले दिवस सुरू होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. इच्छा पूर्ण होऊ शकतात. पैशाअभावी रखडलेली कामे किंवा मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळू प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नफा वाढू शकेल.
9 / 10
वृश्चिक: शुभ संधी निर्माण होऊ शकतात. संपत्ती वाढेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल घडू शकतील. व्यवसायात चांगली कमाई करू शकाल. बेरोजगारांना नवीन संधी मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.
10 / 10
कुंभ: जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतील. भगवान शंकराच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकेल. करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी मिळवू शकता. कौटुंबिक बाबतीतही हा काळ शांततापूर्ण असेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य