शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचे वृश्चिक गोचर: ७ राशींना नववर्षाची सुरुवात शानदार, यश-प्रगतीची संधी; काय करु नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:07 PM

1 / 15
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र राशीपरिवर्तन करत आहे. शुक्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. २०२३ ची सांगता होताना शुक्राचे होत असलेले गोचर देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभावकारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
2 / 15
नववर्षात १८ जानेवारीपर्यंत शुक्र वृश्चिक राशीत असेल, त्यानंतर शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे गोचर महत्त्वाचे मानले जात आहे. काही दिवसांनी धनु राशीत वक्री असलेला बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे.
3 / 15
शुक्राचे वृश्चिक राशीतील गोचर काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकते. तर काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. तुमची रास कोणती? मेष ते मीन राशीवर कसा असेल शुक्राच्या वृश्चिक गोचराचा प्रभाव? जाणून घ्या...
4 / 15
मेष: महत्त्वाची सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठेवा. स्वभावात बरेच बदल दिसतील. नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक आघाडीवर काळ चांगला जाणार आहे. यापूर्वी गुंतवणूक केली असेल तर चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. जुन्या कर्जातूनही सुटका मिळू शकते.
5 / 15
वृषभ: नोकरदारांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करू इच्छिणाऱ्यांना चांगला जोडीदार मिळू शकेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर वर्षाच्या पहिल्या महिन्यात समस्या संपतील. आशत्रूंकडून काही त्रास होऊ शकतो, धैर्याने सामना कराल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.
6 / 15
मिथुन: पैशाचे मोठे व्यवहार टाळा. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. कोणाकडूनही पैसे घेऊ नका किंवा देऊ नका. दोन्ही बाबतीत नुकसान होऊ शकते. नवीन वर्षात कोणत्याही प्रकारचे अनैतिक कृत्य करणे टाळा. अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. समाजात बदनामी होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात.
7 / 15
कर्क: कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. सामाजिक वर्तुळात एखाद्या खास व्यक्तीस भेटू शकतात. नवीन वर्षाच्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नवीन मालमत्ता खरेदी कराल.
8 / 15
सिंह: घरगुती जीवनात आनंदाचे वातावरण असेल. सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील. नोकरदार बॉसला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करू शकतात. परदेशात राहणारा एखादा नातेवाईक नवीन वर्षात भेटू शकतो. आगामी काळ व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. पैसे मिळण्याची शक्यता आहे.
9 / 15
कन्या: एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. भविष्यात चांगला फायदा होईल. संवादाच्या पद्धतीत बरीच सुधारणा होईल. मित्रांची संख्या वाढेल. नवीन वर्षात धार्मिक कार्यात खूप रस असेल. सर्व छंद पूर्ण कराल. नवीन वर्ष स्वप्नासारखे असेल. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील.
10 / 15
तूळ: कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल. आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी तयार कराल. बँक बॅलन्स वाढेल. आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. खाण्या-पिण्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागेल.
11 / 15
वृश्चिक: व्यक्तिमत्त्व सुधारेल. स्वतःवर पैसे खर्च कराल. आरोग्याची काळजी घ्या. सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी खूप चांगले असणार आहे. समाजात स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. कामाचे सर्वत्र कौतुक होईल. कला दाखवण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.
12 / 15
धनु: जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचा वाद होत असेल तर तो संपुष्टात येईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा पहिला महिना चांगला जाणार आहे. काही समस्यांना तोंड द्यावे लागले तरी सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जाल. इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा खर्च करू शकता. नोकरदारांसाठी नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे, या काळात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील.
13 / 15
मकर: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात नोकरदारांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना करू शकता. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. गुंतवणूक केली असेल तर आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. नवीन लोकांशी ओळख वाढेल.
14 / 15
कुंभ: पालकांसोबतचे संबंध चांगले राहतील. काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. सर्वांचा आदर करण्याचा सल्ला दिला जातो. सर्व प्रकारच्या वादांपासून दूर राहा. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी बॉसचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल.
15 / 15
मीन: धार्मिक कार्यात रस असेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वडील आणि गुरू यांच्याशी संबंध चांगले राहतील. नवीन वर्षात ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर पुढे जाण्यास सक्षम राहाल. विद्यार्थ्यांसाठीही काळ चांगला राहणार आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. भावंड, नातेवाईकांशी तुमचे संबंध अनुकूल असतील. सहलीला जाण्याची संधी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य