शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शुक्राचा बुधाच्या राशीत प्रवेश: १८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ ८ राशींना धनवृद्धी; यश-प्रगती, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 1:24 PM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार असल्याने अद्भूत योग जुळून येत आहे. याच महिन्यात गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सर्व ठिकाणी सुरू आहे. नवदुर्गेचे गजारुढ आगमन अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जात आहे. (venus transit virgo 2022)
2 / 15
यातच या महिन्यातील अखेरचा राशीबदल होत आहे. नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याचे स्वामित्व असणाऱ्या सिंह राशीतून नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुधाच्या कन्या राशीत शुक्राचे आगमन होत आहे. २४ सप्टेंबर रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत शुक्र कन्या राशीत विराजमान असेल. (shukra gochar kanya rashi 2022)
3 / 15
शुक्राच्या कन्या प्रवेशानंतर शुभ मानला गेलेला त्रिग्रही, लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव शुक्र कन्या राशीत असेपर्यंत राहणार आहे. शुक्र हा प्रेम, जीवनसाथी आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. शुक्र हा शुभ ग्रह आहे. शुक्राच्या कन्या प्रवेशाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा कालावधी संमिश्र ठरणार आहे, शक्य असल्यास कोणते उपाय करावे? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश संमिश्र ठरू शकतो. कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी अतिशय सतर्क राहून कामकाज करावे लागेल. हितशत्रू आणि विरोधकांपासून जपून राहावे. व्यवसायात भागीदारासोबत वाद होणार नाही अथवा वाद वाढणार नाही, याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. शक्यतो प्रवास टाळावेत. शक्य असल्यास प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या रंगांचा समावेश असलेली वस्तू दान करावी.
5 / 15
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश चांगला ठरू शकेल. मान-सन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत पर्यटनाचे बेत आखू शकता. विद्यार्थ्यांना चांगले निकालही मिळतील. सरकारी नोकरीशी संबंधित कोणतीही परीक्षा देत असेल तर त्यांना यावेळी लाभ मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळ तुमच्या वैयक्तिक जीवनातही आनंद आणणारा ठरू शकेल. शक्य असेल तर लक्ष्मी देवीला गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.
6 / 15
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश लाभदायक ठरू शकेल. जर तुम्ही तुमचे घर घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. आर्थिक आघाडीवरही तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन सुख आणि शांतीने भरलेले असू शकेल. तुम्हाला समाजात खूप मान-सन्मान मिळेल. शक्य असेल तर लक्ष्मी देवीला तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
7 / 15
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. मान-सन्मानात वृद्धी होईल. या काळात तुमची लोकप्रियता जास्त असेल. आर्थिकदृष्ट्या ही स्थिती तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते. तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचे खूप कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणीही परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. शक्य असल्यास महादेवांना जलाभिषेक करावा.
8 / 15
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. हा काळ आराम आणि तणावमुक्तीचा ठरू शकेल. सुख-सोयींवर अधिक पैसे खर्च होऊ शकतील. शक्य असल्यास शुक्रवारी मंदिरात जाऊन लक्ष्मी देवीसमोर दीप प्रज्वलित करावा.
9 / 15
कन्या राशीत होत असलेला शुक्राचा प्रवेश शुभ-लाभदायक ठरू शकेल. आगामी काळात विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील. तसेच हा कालावधी करिअरच्या दृष्टीनेही खूप चांगला ठरू शकेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थीही चांगली कामगिरी करू शकतात. शक्य असल्यास कात्यायणी देवीच्या मंत्रांचा जप करावा.
10 / 15
तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. आपले लक्ष भरकटू न देणे, परंतु आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे उचित आहे. जर तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर हा काळ शुभ राहील. शक्य असल्यास भैरवाची उपासना करावी.
11 / 15
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश आनंददायी ठरू शकेल. या काळात तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर आर्थिक लाभ मिळवू शकाल. तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मसालेदार, तळलेले, चमचमीत पदार्थ शक्यतो टाळावेत. सात्विक आहार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्याला उत्तम सहकार्य लाभू शकेल. त्याचा लाभही तुम्हाला मिळू शकेल. करिअरमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शक्य असल्यास हिरव्या रंगाचा समावेश असलेल्या वस्तू दान कराव्यात.
13 / 15
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. मिळकतीत वाढ होऊ शकेल. मात्र, आगामी काळात पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे. बजेटचे भान ठेवून पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ राहील. धार्मिक कार्यांकडे कल वाढू शकेल. शक्य असल्यास भैरवाची उपासना करावी.
14 / 15
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश चिंतामुक्तीचा ठरू शकेल. आर्थिक स्थिती खूप मजबूत राहू शकेल. कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. मात्र, नकारात्मक विचारांना थारा न देणे उपयुक्त ठरू शकेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. शक्य असल्यास शुक्रवारी शुक्र यंत्राची स्थापना करावी.
15 / 15
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कन्या प्रवेश संमिश्र ठरू शकेल. प्रत्येक निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागू शकेल. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या जोडीदाराशी भांडण थोडे वाढू शकते, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य