शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना चहुबाजूंनी लाभ, जुनी थकबाकी मिळेल; शुभ-मंगलदायी आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:38 AM

1 / 15
या सप्ताहात शुक्र आणि बुध यांचे राशीपालट आहेत. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत आहे. रवि आणि बुध मिथुनेत आहे. ८ रोजी बुध वृश्चिकेत जाईल. शुक्र कर्केत असून, ६ रोजी शुक्र सिहेत तेथे त्याची ती मंगळाशी होईल.
2 / 15
केतू तूळ राशीत, प्लूटो मकर राशीत शनी कुंभ राशीत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील. या सप्ताहात ३ रोजी गुरुपौर्णिमा आहे. ६ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. गुरुवारी सायंकाळी ७:०१ पासून पंचक सुरु होत आहे. शुक्रवार, शनिवारी पूर्ण काळ पंचक आहे.
3 / 15
एकंदरीत ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी जुलै महिन्याचा हा आठवडा कसा असेल? कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळतील? कोणत्या राशींना काहीसे सावध राहून कार्यरत राहावे लागेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या नात्यातील समस्या दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी कामात वाढ होईल. तसेच लोकांच्या अपेक्षा वाढतील. आपणास आपली क्षमता दाखवावी लागेल, तेव्हाच आपण आपली स्थिती उंचावू शकाल. व्यापार करणाऱ्या व्यक्तींची कामे जलदगतीने पूर्णत्वास गेल्याने ते अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. व्यापार वृद्धीसाठी मित्रांचे सहकार्य प्राप्त होऊ शकते. कुटुंबातील प्रेम टिकून राहील. एखाद्या चांगल्या सोहळ्याची तयारी होऊ शकते. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. तसेच खूप मेहनत करावी लागेल. आहारावर लक्ष ठेवा.
5 / 15
वृषभ: हा आठवडा उत्तम आहे. दाम्पत्य जीवनात आनंदाने भरलेला राहील. कामात यश प्राप्त झाल्याने आत्मविश्वास उंचावेल व मन हर्षित होईल. व्यापारात मोठे यश प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. जमीन - जुमल्यापासून लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे एखाद्याशी भांडण होण्याची संभावना असल्याने किंवा त्यांच्या विरोधात एखादे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता असल्याने त्यांना मेहनतीच्या जोडीनेच बुद्धिपूर्वक कामे करावी लागतील. खूपच सावधपणे कामे करून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. आहारावर मात्र लक्ष ठेवावे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा चांगला आहे. समस्यांपासून मुक्ती मिळेल. मनातील द्वंद्व संपुष्टात येईल. व्यक्तिगत जीवन बहरून उठेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मात्र अति आत्मविश्वासात राहू नका. व्यापाऱ्यांना शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळेल. ही संधी हातून जाऊ देऊ नका. व्यवसाय वृद्धिंगत होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. सुखद परिणाम सुद्धा मिळतील. प्रकृतीत थोडा चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल.
7 / 15
कर्क: हा आठवडा अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खूपच समाधानी असल्याचे दिसून येईल. संपूर्ण आठवड्याचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. उत्तम प्राप्ती झाल्याने आर्थिक स्थिती प्रबळ होईल. असे असले तरी किरकोळ खर्च होतच राहतील, ज्यावर आपणास नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना खूप मेहनत करावी लागेल. कोणाशीही भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा चांगला आहे. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नका. कौटुंबिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा खूपच महत्वाचा आहे. कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागू शकतात. व्यापारी कामात प्रगती करण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील. योग्य नियोजन करून अति मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळावे.
9 / 15
कन्या: हा आठवडा चांगला आहे. मित्रांसह फिरावयास जाल. खूप मौजमजा कराल. मनातील सर्व कामे उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती बुद्धिमत्तेच्या व कार्यक्षेत्रातील मेहनत व इमानदारीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकतील. कामाची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांना लाभ प्राप्त होईल. खर्चात वाढ होणार असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमले तरी त्यांना वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा लागेल.
10 / 15
तूळ: हा आठवडा चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने खोळंबलेली कामे होऊ लागतील. थकबाकी मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास चोहोबाजूने लाभ होऊ शकतो. नोकरी असो किंवा व्यापार त्यात अग्रस्थानी राहिल्याने आपले मनोबल उंचावेल. विरोधकांवर मात कराल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा अनुकूलता घेऊन येणारा आहे. आर्थिक प्राप्ती झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. नशिबाची साथ मिळाल्याने घरातील वातावरण सुखावह होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट संभवते. नोकरी करणाऱ्यांना आठवडा अनुकूल आहे. अधिकारात वाढ होईल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. असे असले तरी आपला मान - सन्मान खंडित होईल असे कोणतेही कृत्य करू नका. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न केल्यास त्यांना जास्त लाभ होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. अवघड विषयांवर पकड मजबूत करण्यात ते यशस्वी होतील.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. आत्मविश्वास वाढल्याने व्यापारात प्रगती करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. व्यापारास आवश्यक असलेले धाडस कराल. त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यापारास गती येईल व आनंदित व्हाल. जर गुंतवणूक करावयाची असेल तर थोडा विचार करावा. असे असले तरी या आठवड्यात केलेली गुंतवणूक फायदेशीरच होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आपली गणना चांगल्या कर्मचारी वर्गात होईल. कार्यभारात वाढ होऊ शकते. काही नवीन कामाची जवाबदारी सोपविण्यात येऊ शकते. त्याचा स्वीकार कराल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात मेहनतीसह यश सुद्धा प्राप्त होईल.
13 / 15
मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस काहीजणांना वायफळ खर्च करावे लागतील, परंतु त्या नंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. असे असले तरी आर्थिक दृष्ट्या आठवडा काहीसा कमकुवतच आहे. प्राप्तीच्या मानाने खर्चाचे प्रमाण अधिकच राहील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत असेल. व्यापारात चढ - उतार होताना दिसून येईल. भागीदाराशी सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना यश प्राप्त होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरुवातीसच एखादा मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. अत्यंत खुश व्हाल. खूप मेहनत कराल. कौटुंबिक गरजा पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहतील. त्यांना बढतीसह पगारवाढ मिळू शकते. व्यापारी व्यक्तींनी जर आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवले तर ते यशाचे शिखर सर करू शकतील. त्यांचे विरोधक धारातीर्थी पडतील. कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करू नका. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. चांगले परिणाम त्यांना मिळतील. आहारावर लक्ष ठेवावे. तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
15 / 15
मीन: हा आठवडा शुभ व मंगलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारून नात्यातील गैरसमज दूर करू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच व्यापारास गती देण्याचा प्रयत्न कराल. व्यापारानिमित्त प्रवास करावे लागतील. दूरवरच्या क्षेत्राशी व राज्याशी आपले संबंध जुळतील. व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामे लक्षपूर्वक करावी लागतील. विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचा अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक अभ्यास करावा लागेल. आहारावर लक्ष ठेवावे लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य