शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगलमय त्रिग्रही योग: ११ राशींना अनुकूल, येणी वसूल होतील; धनलाभ संधी, श्रीविष्णू शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 1:23 PM

1 / 15
मंगळ मकरेत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, शुक्र आणि मंगळ धनुत, मंगळ मकरेत जात असून, तेथे त्याची युती रवी, बुध आणि प्लूटो यांच्याशी होईल. शनी कुंभेत असून, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंदाचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून राहील. मंगळवारी षट्तिला एकादशी, बुधवारी प्रदोष, शुक्रवारी दर्श अमावास्या आहे. संत निवृत्तीनाथ यात्रा आहे. शिवरात्री आहे.
3 / 15
एकूण ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचे मकर राशीत होणारे गोचर तसेच सूर्य आणि बुधासोबतचा युती योग, त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा काळ मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात जरी सुख-शांतता असली तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे जीवन तणावयुक्त असल्याचे दिसून येईल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. शेअर बाजारात मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नोकरीत बदल करण्यासाठी प्रतिकूल काळ आहे. अति आत्मविश्वास टाळावा. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतील. व्यस्त जीवनातून कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल. स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
5 / 15
वृषभ: हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. सर्वजण एकत्रितपणे कामे करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबात मांगलिक कार्याचे आयोजन होईल. सर्वांची ये-जा सुरू होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. स्पर्धेत यश प्राप्ती होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावे लागतील. व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होता येईल. वैवाहिक जोडीदारासह आपण काही सुखद क्षण व्यतीत करताना दिसून येईल. मुलांचे सहकार्य मिळेल.
6 / 15
मिथुन: हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी येण्याची संभावना असून त्याने काहीसे त्रस्त झाल्याचे दिसेल. घराची सजावट व दुरुस्तीसाठी काही पैसे खर्च कराल, मात्र खर्च नियंत्रणात ठेवणे हिताचे होईल. नोकरीत स्थान परिवर्तन संभवते. व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. मात्र मन विचलित होऊ न देण्याची दक्षता घ्यावी लागेल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबात मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. कुटुंबियांसह खरेदीस जाल.
7 / 15
कर्क: हा काळ अत्यंत चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवाल. प्राप्तीत वाढ होईल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. भविष्यात उपयोगी होण्यासाठी पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. व्यापारी व्यवसाय वृद्धीसाठी खूप प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल.
8 / 15
सिंह: हा काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. वैवाहिक जोडीदार भरपूर सहकार्य करेल. व्यवसाय वृद्धीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे. धन संचय कसा करावा हे आपण वरिष्ठांकडून शिकून घ्याल. पैतृक व्यवसायात काही बदल होऊन त्यात वृद्धी होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांना परिश्रम वाढवावे लागतील. विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवते.
9 / 15
कन्या: हा काळ अत्यंत चांगला आहे. जीवनात सुख-शांतता नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. थोडा वेळ कुटुंबियांच्या सहवासात व्यतीत करून भविष्यात उपयोगी होऊ शकतील, अशा बऱ्याच गोष्टी शिकाल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. धनलाभ संभवतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. वैवाहिक जोडीदारासह रोमँटिक रात्री भोजनास जाल.
10 / 15
तूळ: हा काळ अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता होईल. विद्यार्थी शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा जाऊ शकतील. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारी व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होतील. खर्चाचे अंदाजपत्र तयार केलेत तर ते हितावह होईल. अचानकपणे काही अवांछित खर्च करावे लागतील. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने थकबाकी मिळेल. स्वतःसाठी एखादे वाहन खरेदी करू शकता. घर किंवा एखादी जमीन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
11 / 15
वृश्चिक: हा काळ अनुकूल आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास करण्याचे आयोजन कराल. विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. धनलाभ संभवतो. थकबाकी मिळू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.
12 / 15
धनु: हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. आर्थिक स्थितीत चढ-उतार येतील. खर्चात वाढ झाल्याने त्रस्त झाल्याचे दिसेल. प्रकृतीमुळे खर्चात वाढ होऊ शकते. मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांची पद - प्रतिष्ठा उंचावत असल्याचे दिसेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील. व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करताना दिसतील. स्पर्धेत यश प्राप्त होईल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे संपुष्टात येतील. पैतृक संपत्तीत धनलाभ होईल. जमीन - जुमल्यात गुंतवणूक केल्यास फायदा होईल.
13 / 15
मकर: हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. वैवाहिक जोडीदाराबद्दल भरपूर आकर्षण राहील. नात्यात प्रेम व विश्वास असल्याचे दिसेल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेसह रोमँटिक रात्री भोजनास जाऊन तेथे प्रेमाच्या गप्पागोष्टी करताना दिसतील. एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देऊ शकतील व त्यामुळे दोघातील प्रेम व विश्वास वृद्धिंगत होईल.
14 / 15
कुंभ: हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल. सर्वजण एकजुटीने कामे करताना दिसतील. भावाच्या विवाहात येत असलेले अडथळे संपुष्टात येतील. घरात मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. कुटुंबातील सर्वजण खरेदीसाठी जाऊन खूप मौज-मजा करताना दिसतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. खर्चात वाढ होईल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार आपण करू शकता. व्यापाऱ्यांना इच्छित लाभ झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल.
15 / 15
मीन: हा काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवू शकाल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. व्यवसायात यशस्वी होऊ शकाल असे नवनवीन संपर्क व्यापारात प्रस्थापित होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. पगारवाढ व पदभार जास्त असेल. स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. ज्या व्यक्ती शासकीय नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. घर-जमीन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. वाणीत माधुर्य टिकवून ठेवावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य