शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३: ‘या’ १० राशींना उत्तम आठवडा, प्राप्तीत वृद्धी; यश-प्रगतीचा अनुकूल काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 12:39 PM

1 / 15
सन २०२३ मधील फेब्रुवारीचा महिना सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या या आठवड्यात अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्याचा आपल्याला लाभ मिळू शकतो. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध या आठवड्यात गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करत आहे.
2 / 15
फेब्रुवारी महिन्याच्या आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ आणि पवित्र मानल्या गेलेल्या माघ पौर्णिमेने झाली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या माघ पौर्णिमा महत्त्वाची मानली गेली आहे. तसेच या आठवड्यात माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत शुभ फलदायी मानले गेले आहे.
3 / 15
ज्योतिषीय आणि धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या चांगला असलेला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी आठवडा आनंददायी, लाभदायक ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात काय काळजी घ्यावी, जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: फेब्रुवारीचा पहिला आठवडा आनंदित करणारा आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या उन्नतीदायक आहे. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. जास्त काही खर्च न केल्यामुळे आपली चांगली बचत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. पदोन्नती संभवते. आपल्या वरिष्ठांशी चांगला समन्वय साधावा. त्याचा आपणास लाभ होऊ शकतो. आपणास परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. व्यापारास गती येईल. सरकारी क्षेत्राची एखादी निविदा आपणास मिळू शकते. विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
5 / 15
वृषभ: आपल्यासाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराची वागणुकीमुळे त्रास होऊ शकतो. मित्रांसह वेळ घालविण्याची संधी मिळेल. छंदासाठी वेळ द्याल. प्राप्तीत वाढ होईल. नोकरदारांसाठी आठवडा चांगला आहे. चांगला लाभ होईल. वरिष्ठांशी सलोखा राहील. व्यापाऱ्यांना मेहनतीचा फायदा होईल. ऑटोमोबाईल किंवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा जास्त फायदेशीर आहे. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात भरपूर मेहनत करतील. त्याचे चांगले परिणाम मिळतील. एखाद्या मार्गदर्शकाचे सहकार्य सुद्धा त्यांना मिळू शकते.
6 / 15
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबात काही नवीन गोष्टी होतील, ज्यात काही विशेष गोष्टींवर विचार - विनिमय होतील. घरातील वातावरण सकारात्मक असेल. भविष्यासाठी एखाद्या नवीन योजनेवर चर्चा होईल. नोकरदारांसाठी आठवडा अनुकूल आहे. मन लावून काम कराल. आपले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. व्यापारी वर्ग व्यापार वृद्धीच्या बाबतीत काहीसे चिंतीत असू शकतात. नवीन योजनेमुळे व्यापार वाढू शकेल. व्यापारात गुंतवणुकीचा विचार होऊ शकेल. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करतील.
7 / 15
कर्क: आठवड्याची सुरुवात मध्यम फलदायी असेल. विवाहितांना वैवाहिक जीवनात वाढत असलेल्या तणावाचा त्रास होईल. उत्साहित होऊन आपली कामे दृढतेने कराल. आत्मविश्वास उंचावेल. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वरिष्ठांशी आपले संबंध सलोख्याचे राहतील. नोकरीत लाभ होईल. एखादे नवीन काम देण्यात येऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धीसाठी काही नवीन लोकांना भेटावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मेहनत करण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
8 / 15
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा आनंद अनुभवता येईल. आपल्या कामात नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. खर्चात वाढ होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले असतील. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वरिष्ठ पाठीशी असल्याने आपल्या लहान - सहान चुकांकडे दुर्लक्ष करतील. कोणतीही मोठी चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांना कामात अजून काहीतरी करून दाखवावे लागेल. मार्केटिंगवर लक्ष द्यावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. मोठे यश प्राप्त होईल. प्राप्तीत वाढ होईल. कामाची सुद्धा प्रशंसा होईल. व्यापारात आपण यशस्वी होऊन विरोधकांवर मात कराल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे येतील. खूप मेहनत करावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपणास प्रगती करण्यास प्रेरित करणारा आहे. व्यापारासाठी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी होतील. जोखीम पत्करण्याची आपली वृत्ती वाढेल. संपर्कांचा लाभ होईल. मित्र मदत करतील. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल. सहकार्यांचे भरपूर सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही अडथळे आले तरी त्यांनी मेहनत चालूच ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुखाची व आनंदाची लाट येईल. कार्यात यशस्वी झाल्याने मन हर्षित होईल. कार्यक्षेत्रात आपला मान - सन्मान वाढून आपली स्थिती मजबूत होईल. नोकरदारांचे काम चांगले झाल्याने त्यांची कामावरील पकड मजबूत होईल. सरकारी नोकरी करत असणाऱ्यांना मोठा फायदा मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या बरोबरीनेच रिअल इस्टेट क्षेत्रातील स्थिती सुद्धा उत्तम असेल. व्यापार यशस्वी होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. आत्मविश्वास उंचावेल.
12 / 15
धनु: या आठवड्यात प्रगतीची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने सर्व कामात यशस्वी होता येईल. विरोधकांच्या काही गोष्टींमुळे आपली बाजू भक्कम होऊन फायदा होईल. निव्वळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या सुद्धा मजबूत व्हाल. नोकरीच्या ठिकाणी आपले चातुर्य व हजरजवाबीपणा कामी येईल. अति आत्मविश्वासात राहू नये. व्यापाऱ्यांच्या व्यापाराची वृद्धी होईल. नवीन करार झाल्याने अत्यंत आनंदित व्हाल. नवीन ओळखी होण्याची संभावना आहे. याचा भविष्यात फायदा होईल. विद्यार्थी कामगिरी उंचावण्यात यशस्वी होतील.
13 / 15
मकर: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मानसिक तणाव दूर होईल. नोकरदारांना कामावर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरेल. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करावे लागतील. व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न कराल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या गुरूंचे सहकार्य मिळेल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरदारांसाठी आठवडा चांगला आहे. कामे मन लावून करतील. त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना दूरवरचे प्रवास करून फायदा होईल. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. व्यापारवृद्धी सुद्धा होईल. व्यावसायिक भागीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी मिश्र फलदायी आहे. अभ्यासात भरपूर मेहनत करावी लागेल. प्रकृतीत सुधारणा होईल.
15 / 15
मीन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धीची संधी मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा आर्थिक स्थिती खालावू शकते. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरदारांना कारकीर्द उंचावण्यासाठी काही जास्त प्रयत्न करावे लागतील. लोकांशी समन्वय साधावा लागेल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे संभवतात. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य