शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना दिवाळी सर्वोत्तम, शासकीय लाभ; नोकरीत यश, व्यापारात वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:55 AM

1 / 15
या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कन्येत, रवी, मंगळ, केतू आणि बुध तूळ राशीत, ६ नोव्हेंबरपासून बुध वृश्चिक राशीत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील. या सप्ताहात ९ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आणि वसुबारस आहे. १० नोव्हेंबर रोजी प्रदोष आणि धनत्रयोदशी आहे. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी आश्विन कृष्ण अष्टमी आहे.
3 / 15
दिवाळीचा आठवडा आहे. देशभरात आनंदाचे, उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. या आठवड्यातील ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना दिवाळीचा काळ अतिशय उत्तम, लाभदायक, धन-धान्य, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी करणारा ठरू शकेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: घरकामात खूपच व्यस्त राहाल. विवाहित व्यक्ती सुटकेचा श्वास घेतील. काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. सध्या काही घरगुती खर्च होतील. कामात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. उत्तमरित्या गोष्टी हाताळाव्या लागतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. परिश्रम करतच राहाल. व्यापाऱ्यांना समस्या कमी झाल्याने दिलासा मिळेल. व्यवसायात नवीन उर्जेसह वाटचाल करतील. सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विरोधकांपासून सतर्क राहा. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. आत्ता केलेल्या मेहनतीचा त्यांना चांगला फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
5 / 15
वृषभ: हा आठवडा खूपच चांगला आहे. असे असले तरी विवाहितांचा आठवडा वैवाहिक जीवनातील भांडणात जाऊ शकतो, तेव्हा सावध राहावे. मित्रांसह मौजमजा करण्यास जाऊ शकता. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी झाल्याने मित्र मंडळ वाढेल. मनात धार्मिक विचार येतील. लोकांची मदत कराल. विरोधकांवर मात कराल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. परिश्रम यशदायी ठरतील. व्यापाऱ्यांना दूरवरच्या क्षेत्रांशी व राज्यांशी किंवा परदेशाशी संपर्क साधून व्यवसाय वाढविण्यात यश प्राप्त होईल. खूप कष्ट करावे लागतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. स्पर्धेत यश संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
6 / 15
मिथुन: हा आठवडा अनुकूल आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त राहाल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. वैवाहिक जोडीदारामुळे आपणास खूप मोठा फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांना व्यवसायात चोहोबाजूने पाठिंबा मिळाल्याने व्यवसाय वृद्धी होईल. प्राप्ती उत्तम होईल. विविध स्रोतातून लाभ होईल. नशिबाची साथ मिळून कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी आपणास थोडे सावध राहावे लागेल. मनात वेगवेगळे विचार करण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. मित्रांशी उत्तम संबंध राहतील. वैवाहिक जीवनातील तणाव निवळेल. आत्मविश्वास उत्तम असल्याने कामात यश प्राप्त होईल. एखाद्या सरकारी निविदेसाठी अर्ज केल्याने आपणास मोठा फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात किंवा बांधकाम व्यवसायात काम करणे फायदेशीर होऊ शकते. खूप पैसे कमावू शकाल. नोकरीच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. आत्मविश्वास व अनुभव यशाचा मार्ग निर्माण करेल. वरिष्ठ खुश असल्याचे दिसून येईल. आव्हानांचा सामना करत असल्याचे बघून ते कौशल्याची पारख करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकांताची गरज भासेल. त्याकडे लक्ष द्यावे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. खर्चात वाढ होईल. कुटुंबियांशी असलेल्या समन्वयात काहीसा बिघाड होऊ शकतो. घरात एखादा सोहळा संभवतो, त्यामुळे खूप लोकांची ये-जा होईल. असे असले तरी भावंडांशी काही मतभेद संभवतात. शासकीय लाभ संभवतात. शत्रू धारातीर्थी पडतील. एकतर्फी विजय प्राप्त होईल. एखाद्या निवडणुकीसाठी उभे राहिलात तर आपणास विजयाची चांगली संधी मिळू शकते. नोकरीसाठी आठवडा अनुकूल आहे. परिश्रम करत राहा. कामावर जास्त लक्ष द्या. व्यापारी कामात खूप परिश्रम करतील. असे असले तरी त्यांनी अधूनमधून थोडी विश्रांती घेऊन चांगले भोजन करावे. टेक्निकल व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते उत्तम कामगिरी करू शकतील.
9 / 15
कन्या: हा आठवडा अनुकूल आहे. आत्मविश्वास चांगला असल्याने कार्यात यश प्राप्त होईल. एकीकडे असे वाटेल की भौतिक जगापासून विरक्त व्हावे, तर दुसरीकडे सर्व भौतिक सुखांची कामना होऊ लागेल. अशा प्रकारे आपल्या मनात एक अंतर्द्वंद्व होऊ लागेल, जे आपल्या मित्रांना प्रभावित करू शकेल. प्राप्ती सामान्यच राहील. बँकेतील शिल्लक वाढत असल्याचे दिसून येईल. खर्चात कपात होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत राहील. कामगिरीने तसेच वरिष्ठांपासून समाधानी असल्याचे दिसून येईल. व्यापारात काही नवीन सौदा होऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्याचे यथोचित फळ प्राप्त होईल.
10 / 15
तूळ: हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक व व्यक्तिगत जीवनात समतोल साधण्यात यशस्वी व्हाल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चात अचानकपणे वाढ होईल. काही खर्च सुखसोयींसाठी होतील. विचारपूर्वक खर्च करावा लागेल, म्हणजे खिशावर ताण पडणार नाही. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. काही नवीन काम मिळण्याची संभावना असून ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्वी पणास लावाल. त्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी खूप परिश्रम करतील. नोकरीत यश प्राप्त होईल. वातावरणातील बदलामुळे सतर्क राहावे.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. नशिबाची साथ मिळून प्रगतीची संधी मिळेल. कामे होतील. नोकरीतील स्थिती हळूहळू अनुकूल होऊ लागेल. परंतु सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. परिश्रमातून चांगल्या लाभाची अपेक्षा करावी. गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. दिनचर्येचे नियमित पालन करावे.
12 / 15
धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांतीचा काही प्रमाणात अभाव राहील. एखाद्या गोष्टीमुळे कुटुंबात अंतर्द्वंद्वची स्थिती निर्माण होईल व कुटुंबियात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक सौख्यात कमतरता असल्याचे दिसून येईल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. नोकरीत चढ - उतार येतील. कामात मन रमणार नाही. व्यापारात यश प्राप्त होईल. परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. तेव्हा काळजी घ्यावी.
13 / 15
मकर: हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदाराशी सुसंवाद राहील. नात्यात प्रगल्भता येईल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. परिश्रमाचे फळ मिळेल.आत्मविश्वास उंचावेल. लोक सल्ला घेण्यासाठी येतील. व्यापारात आपले परिश्रम अजून वाढतील, परंतु त्याचे परिणाम मिळण्यास काही वेळ लागेल. असे असले तरी प्रयत्नशील राहावे. यश नक्कीच मिळेल. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक भावना वृद्धिंगत होईल. फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.
14 / 15
कुंभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो. भरपूर खर्च होतील. प्राप्ती मध्यमच राहील. तेव्हा आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल, अन्यथा आर्थिक चणचण जाणवेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. पूजा समजून कामे कराल व त्यासाठी भरपूर परिश्रम कराल. त्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. सहकारी पाठिंबा देतील. असे असले तरी आळस झटकावा लागेल. हा आठवडा व्यापारासाठी उत्तम आहे. जास्तीत जास्त वेळ प्रवास करण्यात जाईल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. सरकारी क्षेत्राकडून काही लाभ संभवतो किंवा आपण एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम प्राप्त होतील.
15 / 15
मीन: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखावह होईल. प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल. अभ्यासात यश प्राप्ती होईल. कार्यात यशस्वी व्हाल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य