शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ ते ११ जून २०२२; मीन राशीच्या लोकांसाठी धोक्याची घंटा, पाहा कसा असेल तुमचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 11:44 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपले व्यावसायिक जीवन व व्यक्तिगत जीवन ह्यात समतोल साधू शकाल. त्याने आपला आनंद द्विगुणित होईल. आपणास दोन्हीकडे चांगले परिणाम मिळतील. आपण काही रचनात्मक कार्य हाती घ्याल व त्यात आपणास मान व लोकप्रियता मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात रोमांसाचा वर्षाव झाल्याने आपणास संबंधात आनंद जाणवेल. आपल्या कल्पनेनुसारच आपला वैवाहिक जोडीदार असल्याचे आपणास जाणवेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास संबंधातील वास्तविकता जाणवेल व संबंधाच्या आड येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण कराल. व्यापाऱ्यांच्या व्यापारास गती येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. आपण घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. आपली पदोन्नती संभवते. बँकेतील शिल्लक वाढेल. खर्च कमी होतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण सहकाऱ्यांशी खूप चांगले वागल्यामुळे ते संपूर्ण आठवडाभर आपणास चांगली साथ देतील व त्यामुळे आपला खूप फायदा होईल. आपली प्रतिमा व कामगिरी सुद्धा उंचावेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. आपणास व्यवसाय वाढीसाठी काही नवीन ऑफर्सचा विचार करावा लागेल. असे केल्याने बाजारातील उपक्रमांवर नियंत्रण ठेवता येईल. ह्या दरम्यान आपली प्राप्ती कितीही चांगली झाली तरी खर्चात खूप मोठी वाढ होणार असल्याने आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. तसेच खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. आपल्यातील जवळीक वाढेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला असून त्यांची अभ्यासात प्रगती होईल.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. आपण एखाद्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या मध्यास प्रवास संभवतो. आपण कुटुंबाची जवाबदारी ओळखू लागल्याने कुटुंबीय आपल्यावर खुश होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना त्यांच्या संबंधात ताजेपणा जाणवेल. आपली प्रेमिका जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली देईल. त्यामुळे आपल्या दोघात उत्तम समन्वय साधला जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या दरम्यान हातून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खुश खबर घेऊन येणारा आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित न झाल्याने त्यांना सतत पुनरावर्तन करण्याची गरज भासेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
4 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली ऊर्जा वाढल्याने आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कुटुंबीय एकमेकांप्रती आपली जवाबदारी समजू शकतील. आपल्या सासूबाई धार्मिक कार्यात व्यस्त राहतील. घरी एखाद्या पूजेचे आयोजन संभवते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात खुश राहतील. आपण आपले संबंध पुढे नेऊ शकाल. एकमेकांच्या साथीने आपले संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप चांगले परिणाम मिळतील. आपण अभ्यासात खूप मेहनत कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या स्वभावात थोडा बदल करावा लागेल. नोकरी हि नोकरीच असते असा विचार मनात रुजवावा लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या कामात प्रगती होईल. खर्चात वाढ होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याची सुरवात थोडी संथ गतीने होईल. खर्चात वाढ होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. परंतु, आठवड्याच्या मध्यास आपली अनेक चांगली कामे होतील. खर्चात कपात होईल. आपण खुश राहिल्याने आपली अनेक कार्ये आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपणास उत्तम प्राप्ती होईल. प्राप्तीत वाढ होईल, शिवाय अनपेक्षितपणे आपणास काही पैसे मिळू शकतील. थकबाकी मिळण्याची संभावना सुद्धा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना रोमांस करण्याची संधी मिळेल. आपण प्रेमिकेसह एखादा चित्रपट बघावयास जाऊ शकाल. किंवा एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन प्रेमिकेस आपल्या मनातील भावना रोमँटिकपणे सांगू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. व्यापारी आपल्या व्यापारात प्रगती करू शकतील. आपली प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना आपली एकाग्रता वाढवावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत झटपट वाढ होईल, परंतु आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होऊ लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपण स्वतःकडे लक्ष देऊ लागाल. आपण स्वतःसाठी नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद राहील. आपण आपले संबंध अधिक दृढ कराल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधात जवाबदारीपूर्वक पुढे जाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची बदली संभवते. व्यावसायिकांना आर्थिक लाभ संभवतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी आशास्पद व लाभदायी आहे. आपणास आपल्या कार्यक्षमतेची जाणीव होईल. आपणास आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झाल्याने भविष्यात नवीन काही करण्यात आपल्याला मदत होऊ शकेल.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण काही नवीन व्यावसायिक सौदे करू शकाल. व्यापारात तेजी येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांची कामे चिकाटीने करतील. आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. कोर्ट - कचेरीच्या कामात आपण यशस्वी व्हाल. हा आठवडा विवाहितांसाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या संबंधात प्रेमाचा आनंद घेऊ शकाल. प्रेमीजन आपल्या संबंधांच्या बाबतीत खूपच कार्यशील राहतील. स्वतःच्या प्रेमिकेचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करतील. आपल्या सर्जनात्मकतेने आपण प्रेमिकेसाठी एखादी मोठी भेटवस्तू खरेदी कराल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. हा आठवडा प्रवासास अनुकूल असला तरी अखेरच्या दिवसात प्रवास करू नये.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण आपली कामे झटपट पूर्ण करून आठवडा सुखद करण्याचा प्रयत्न कराल. आपले प्रयत्न यशस्वी झाल्याने आपणास कार्यात खूप चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना त्यांच्या कामात अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास शासनाकडून मोठा फायदा होण्याची संभावना असल्याने प्रयत्न करत राहावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांचे निराकरण होऊ शकेल. असे झाल्यामुळे आपण व आपला वैवाहिक जोडीदार दरम्यानचे संबंध सुधारतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. संबंधातील प्रेम टिकून राहिले तरी काही कारणाने लहान - सहान वाद होण्याची संभावना आहे. परंतु, आपण समजूतदारपणा दाखवून ते टाळू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण अभ्यासात खूप मेहनत केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. परीक्षेत आपणास चांगले गुण मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण न ठेवल्याने आपण थोडे दुःखी होण्याची संभावना आहे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा स्थावर संपत्तीची खरेदी करण्यासाठी चांगला असल्याने मोठ्या स्थावर संपत्तीसाठी प्रयत्न करावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवतील. आपणास आपल्या कामात यश प्राप्त होईल. आपली प्रशंसा होईल. व्यावसायिकांना ह्या आठवड्यात काही खास करण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन काही करण्याची संधी मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपला वैवाहिक जोडीदार दूरवरचा प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण रोमांस करण्यात वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबर इतर बाबींवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. असे केल्याने आपल्या अभ्यासात येणारे अडथळे आपण दूर करू शकाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपणास आपल्या वैवाहिक जोडीदारास बाहेर फिरावयास घेऊन जावे लागेल किंवा एखादी आश्चर्यचकित करणारी भेटवस्तू द्यावी लागेल. प्रेमीजन मोकळेपणाने आपल्या संबंधांचा आनंद घेऊ शकतील. ह्या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेवर प्रेमाचा वर्षाव करत राहाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाची गंभीरता ओळखून ते उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील. त्यात त्यांना सुखद परिणाम मिळतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप चांगला आहे. आपल्या कामास गती येईल व कार्य शीघ्र गतीने प्रगती पथावर वाटचाल करेल. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपले मनोबल सुद्धा उंचावेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी एकाग्रतेने आपला अभ्यास करू शकतील. त्यांना त्याचे चांगले परिणाम मिळतील. तसेच त्यांना अभ्यासात मेहनत करण्या पासून कोणीही थोपवू शकणार नाही.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपली प्रकृती उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपण मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकाल. त्यासाठी आपण थोडा खर्च सुद्धा कराल. आपणास प्राप्ती सुद्धा चांगली झाल्याने आपल्याला आर्थिक स्थैर्य जाणवेल. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद राहील. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या कुटुंबियांना खुश ठेवेल. तसेच त्यांची सर्व जवाबदारी उत्तम प्रकारे पार पाडेल. त्यामुळे आपल्या मनातील त्यांचे स्थान उंचावेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या मनातील भावना प्रेमिके पर्यंत पोचविण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा साधारण फलदायी आहे. काही गुप्त योजना ज्या आजवर आपण कोणालाही सांगितल्या नसतील त्यावर लक्ष केंद्रित करावे. कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये, अन्यथा आपण अडचणीत याल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे. आपले काम बिनचूक करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक आपला अभ्यास करावा लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
12 / 12
हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपली प्रकृती नरम - गरम राहण्याच्या संभाव्यतेमुळे आपणास त्याची संपूर्ण काळजी घ्यावी लागेल. आपल्या खाण्या - पिण्यावर लक्ष ठेवावे लागेल. अन्नातून विषबाधा होण्याची संभावना आहे. तेव्हा खूप काळजी घ्यावी. विवाहित व्यक्ती स्वतःच्या जीवनात नवीन स्वप्ने बघतील व आपल्या वैवाहिक जोडीदाराशी त्या बाबत चर्चा करतील. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस खुश करण्यासाठी स्वतःच्या रचनात्मक क्षमतेचा उपयोग करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या मेहनतीचे आपणास यथोचित फळ मिळेल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपला व्यापार आपल्या व्यक्तिगत प्रयत्नाने, नवीन मार्केटिंग तंत्राने व संवादाच्या कौशल्यामुळे विकसित होईल. आपण आपला व्यवसाय पुढे नेऊ शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१