शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, लाभच लाभ; बिझनेसमध्ये मोठा फायदा, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 12:49 PM

1 / 15
या सप्ताहात ७ ऑगस्ट रोजी शुक्र सिंहेतून चक्री कर्क राशीत येत आहे. अन्य कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत आहे. रवी कर्क राशीत आहे. मंगळ, बुध आणि शुक्र सिंहेत असून, सोमवारी शुक्र वक्री कर्केत जाईल. केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शूनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन या राशीमधून राहील. शनिवारी कमली एकादशी आहे. अधिक श्रावण कृष्ण पंचमी/षष्ठी आहे. अवघ्या काही दिवसांनंतर अधिक मासाची सांगता होणार आहे. त्यानंतर निज श्रावण मास सुरू होईल. या महिन्यात श्रावणात केली जाणारी सर्व व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातील.
3 / 15
या आठवड्यातील ग्रहमान हे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, आर्थिक आघाडी, करिअर, शिक्षण, बिझनेस या क्षेत्रांमधील कामगिरी कशी राहू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा खर्चात वाढ करणारा आहे. वायफळ खर्चांपासून दूर राहा. नोकरीशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. आपण आपल्या पदावर अधिकाराने कामे कराल. व्यापाऱ्यांना परदेशी व्यक्तींच्या सहकार्याने काम केल्याचा फायदा होण्याची किंवा एखाद्या बहुराष्ट्रीय संस्थेबरोबर काम केल्यास अधिक फायदा होण्याची संभावना आहे. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा आपणास होऊ शकतो. कुटुंबात थोडा तणाव वाढू शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळून ते आपणास नवीन काही करण्यासाठी प्रेरित करतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला आठवडा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
5 / 15
वृषभ: हा आठवडा प्राप्तीत वाढ घेऊन येणारा आहे. काही नवीन योजनांवर कार्यरत व्हाल ज्याचा फायदा होईल. खर्च होतच राहिल्याने चिंतीतही व्हाल. कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. आपण आपले प्रयत्न चालूच ठेवावेत. दाम्पत्य जीवनात तणाव असूनही प्रेम टिकून राहील. एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी झाल्याने नाते दृढ होईल. मित्र आपल्या मदतीस धावून येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.
6 / 15
मिथुन: हा आठवडा चांगला आहे. खूप जोशात येऊन प्रत्येक काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नशिबाच्या प्राबल्यामुळे कामे होतील. नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही ठिकाणी आपला दबदबा राहिल्याने स्थिती मजबूत होईल. आर्थिक दृष्ट्या मजबुती देणारा आठवडा आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात नियमितता राखण्याचा प्रयत्न करावा.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. आनंद मिळून ताजेतवाने सुद्धा वाटू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाच्या बाबतीत कुटुंबियांचे सहकार्य घ्यावे लागेल. व्यापाऱ्यांना व्यापारातील काही पैसा कुटुंबियांच्या गरजा भागविण्यासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबात काही मतभेद होण्याची संभावना आहे. काहीसा असंतोष जाणवेल. मनात सर्वांवर वर्चस्व गाजविण्याची इच्छा जागृत होईल. वैवाहिक जीवनासाठी असे वाटणे योग्य नाही. असे झाल्यास वैवाहिक जीवनातील तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा मनात काही नवीन उमेद घेऊन येणारा आहे. नशिबाची साथ मिळून काही कामे होतील.मानसिक शांतता प्राप्त करण्याची संधी मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडी धावपळ केल्यानेच कामात मनोवांच्छित परिणाम प्राप्त होऊ शकतील. व्यापाऱ्यांना खूप परिश्रमपूर्वक विचार करावा लागेल. काय परिस्थिती आहे ह्याचा अंदाज घ्यावा लागेल. हे बघूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. कोणतीही गुंतवणूक करू नये. खर्च वाढतील. प्राप्ती सामान्यच राहील. वैवाहिक जीवनात परस्परातील सामंजस्याने नाते टिकून राहील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे.
9 / 15
कन्या: रोज थोडा वेळ आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण उत्तम आरोग्या सारखी कोणतीच संपत्ती नाही. व्यायामाकडे थोडे लक्ष दिल्यास आरोग्याशी संबंधित त्रास कमी होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. भविष्यात आर्थिक त्रास होऊ नये म्हणून प्राप्तीतील काही भाग एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून ठेवावी. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना खूप मेहनत करावी लागेल. कदाचित भरपूर प्रवास करावा लागू शकतो. जास्त श्रम केल्याने आपणास आजारपण येण्याची संभावना आहे. व्यापारी जुन्या मित्रांच्या सहकार्याने एखादी नवीन योजना आखू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन जोडीदाराशी संबंध सुधारतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. प्रयत्न व कष्ट यश प्रदान करतील.
10 / 15
तूळ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. काही महत्वाच्या कामांसाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. व्यापारात स्थिती मजबूत राहील. नोकरी करत असाल तर समर्थक खूप मदत करतील. विशेष म्हणजे वरिष्ठांशी समन्वय उत्तम असल्याचा आपणास फायदा होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. घरासाठी खरेदी करतील, ज्याने घरात खुशीचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता भासेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदाराशी नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला. वरिष्ठांशी वाद संभवतात. व्यापाऱ्यांना काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्या दुसऱ्या व्यापारावर लक्ष द्याल, म्हणजेच वर्तमान व्यापाराव्यतिरिक्त दुसरा एखादा व्यापार करून आपली प्राप्ती वाढविण्यावर भर द्याल. प्राप्ती चांगली झाली तरी खर्च तितकेच होतील. विवाहित व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. व्यक्तिगत जीवन आनंदमय होईल. पालकांशी संबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक संपत्ती प्राप्त होऊ शकते. नोकरीत बदली व कामात चांगली स्थिती निर्माण झाल्याने खुश झाल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना प्रयत्नांचा चांगला फायदा होईल. व्यवसाय प्रगती पथावर जाईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सभोवतालचे वातावरण सुखावह असेल. विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे.
13 / 15
मकर: हा आठवडा चांगला आहे. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरू शकतो. मित्रांच्या सहकार्याने कामात यशस्वी होता येईल. व्यापारात पाठिंब्याने एखादे मोठे काम हाती घेऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी काही विरोधक सक्रिय होऊन विरुद्ध षडयंत्र रचण्याची संभावना असल्याने सावध राहावे. आर्थिक बाबतीत प्रतिकूल आहे. धनहानी संभवते. वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. मेहनत वाढवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. संगतीवर लक्ष दिल्यास अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक गरजांवर लक्ष द्याल. कुटुंबात पाहुण्यांची ये - जा राहील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. जितके अधिक प्रयत्न कराल तितके जास्त यश प्राप्त होईल. हा आठवडा यश प्रदान करेल. काही नवीन ओळखी होतील. नातेवाईकांना भेटून खुश व्हाल. मित्रांच्या सहवासात मौजमजा करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी कौटुंबिक जीवनाचा प्रतिकूल प्रभाव आपल्या अभ्यासावर होऊ देऊ नका.
15 / 15
मीन: हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आर्थिक बाजू मजबूत होऊ लागेल. किरकोळ खर्च झाले तरी काळजीचे कारण नाही. प्रकृतीत बिघाड झाला तरी ती सुधारण्यात यशस्वी व्हाल. वेळोवेळी प्राणायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आपली कामे पूजा समजून केल्यास ते यशस्वी होतील. मेहनत करून आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार करत असाल तर व्यापार खोऱ्याने पैसा खेचून मोठा फायदा मिळवून देईल. व्यावसायिक भागीदार आनंदास कारणीभूत होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात कराल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य