शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 7:44 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात बुध आणि शुक्र यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी, केतू आणि बुध कन्या राशीत असून, १० रोजी बुध तूळ राशीत प्रवेश करेल. तेथे त्याची युती शुक्राशी होईल. मात्र, १२ रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहेत. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशीतून राहील. सध्या नवरात्र सुरु आहे. शुक्रवारी अष्टमी व नवमीचा उपवास आहे. शनिवारी महानवमी व विजयादशमी (दसरा) आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी विनायकी चतुर्थी आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००:११ पर्यंत विशाखा, तर त्यानंतर अनुराधा नक्षत्र राहील.
3 / 15
एकूणच ग्रहांची स्थिती आणि नवरात्रोत्सवाचा शुभ काळ कोणत्या राशींना सर्वोत्तम वरदानाचा ठरू शकेल? बुध आणि शुक्राचे गोचर तसेच विविध ग्रहांसोबत जुळून येत असलेल्या युती योगाचा प्रभाव कसा असेल? आठवड्याची सांगता विजयादशमी, दसरा साजरा करून होत असून, याचा लाभ कसा प्राप्त होऊ शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आठवड्याच्या सुरुवातीस जीवनाशी संबंधित एखादी अडचण दूर होत असल्याचे जाणवेल. वरिष्ठ व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. योग्य समर्थन असेल. परीक्षा व स्पर्धेच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी असून त्यांना यश प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या पूर्वार्धात अनुकूल परिणाम मिळून चांगला लाभ होईल. एखादी चांगली बातमी मिळेल, जी आपल्या आनंदास कारणीभूत ठरेल. युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजन व आनंदात व्यतीत होईल. कारकीर्द व व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना नवीन संधी मिळून ते स्थैर्य प्राप्त करतील. दांपत्य जीवन सुखद होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेशी आपले नाते दृढ होईल. तिच्या सहवासात सुखद क्षण घालवाल.
5 / 15
वृषभ: ह्या आठवड्यात विनाकारण विवाद होण्यापासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस कार्यक्षेत्री विरोधक सक्रिय होण्याची शक्यता असून ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. गैरसमज दूर करण्यासाठी वाद न घालता संवाद साधावा, अन्यथा गोष्टी अधिक चिघळू शकतात. घराची दुरुस्ती किंवा आवश्यक सामानाच्या खरेदीत अपेक्षेहून जास्त पैसा खर्च होऊ शकतो. व्यापारात आर्थिक देवाण-घेवाण करताना विशेष सावध राहावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
6 / 15
मिथुन: हा आठवडा सुख, समृद्धी व यश घेऊन येत आहे. परीक्षा व स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नतीची अपेक्षा बाळगून असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची चांगली संधी मिळेल. कामाबरोबरच आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पैतृक संपत्तीशी संबंधित विवादात समाधान होऊन दिलासा मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावना जपून त्यांच्या सहवासात काही वेळ घालवावा.
7 / 15
कर्क: ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री काही वाद संभवत असल्याने मन, वाणी व व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी मिळू शकते. सरकार व सत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींचे निराकरण करताना वाणी व व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामानिमित्त एखादा जवळचा किंवा लांबचा प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांचे मन मौज-मजा करण्यात गुंतण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही. प्रेमिकेपासून दूर राहावे लागल्याने किंवा तिची भेट होऊ न शकल्याने मन व्यथित होऊ शकते.
8 / 15
सिंह: हा आठवडा यश व सौभाग्य घेऊन येत आहे. कारकीर्द व व्यापाराशी संबंधित प्रवास अपेक्षित यश प्राप्त करून देतील. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त प्राप्तीचे स्रोत मिळून त्यांच्या सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. बाजारातून येणारा पैसा अनपेक्षितपणे मिळून व्यापार वृद्धीची मनोकामना पूर्ण होईल. एखाद्या वरिष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात लाभ मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल. युवकांचा बहुतांश वेळ मस्ती करण्यात व्यतीत होईल. जमीन व घर यांच्या खरेदी - विक्रीची कामना पूर्ण होईल. संततीशी संबंधित एखादी मोठी सिद्धी आनंद व सन्मान वृद्धिंगत करण्यास कारणीभूत ठरेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदाराकडून आपणास एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे.
9 / 15
कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित काही समस्या चिंतेचे मोठे कारण होऊ शकते, परंतु लक्ष्य गाठण्यासाठी अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना अजून थोडी वाट पाहावी लागल्याने थोडा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यास प्रकृती व संबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागू शकते. जमीन-घराशी संबंधित बाबी चिंतेस कारणीभूत होऊ शकतात. वैवाहिक जोडीदार वाद घालण्याची संभावना आहे. व्यक्तिगत जीवन व प्रेम संबंधात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद साधावा. प्रेमिकेशी होत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोकळेपणाने बोलणी करावीत.
10 / 15
तूळ: ह्या आठवड्याच्या सुरवातीस कारकीर्द व व्यापाराशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाचा भार वाढल्याने आपणास त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्राशी संबंधित समस्यांबरोबरच कुटुंबात एखाद्या गोष्टीने तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराशी वाद झाल्याने मन उदास राहू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात भागीदारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित लाभ होईल. व्यापाराची व्याप्ती वाढविण्याच्या विचारात आहेत, त्यांची मनोकामना पूर्ण होईल. एखादा मोठा निर्णय घेण्याच्या वेळी सर्व कुटुंबियांचे समर्थन मिळेल. एखादी तीर्थयात्रा संभवते. प्रेम संबंध प्रगल्भ होतील.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. समस्यांना न घाबरता धीटपणे सामोरे जावे लागेल. मग समस्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असो किंवा कार्यक्षेत्राशी. बुद्धी व विवेकपूर्वक सामोरे जाऊन त्याच्यावर मात करता येईल. विद्यार्थी परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. गुप्त शत्रू सक्रिय होण्याची संभावना असल्याने अत्यंत सावध राहावे लागेल. व्यापाराशी संबंधित एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.
12 / 15
धनु: ह्या आठवड्याची सुरुवात एखाद्या सुखद व मनोरंजक प्रवासाने होईल. अपेक्षित पद प्राप्त होऊ शकते. अनेक दिवसांपासून एखादा व्यवसाय सुरु करण्याचा किंवा असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असलात तर मनोकामना पूर्ण होऊ शकते. मान-सन्मानात वाढ होईल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. स्वकियांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मिक प्रेम वृद्धिंगत होईल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी फलदायी आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
13 / 15
मकर: ह्या आठवड्यात लक्ष्यांकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. जीवनातील समस्यांचे शांतिपूर्वक निराकरण करण्यासाठी एक एक करून प्रयत्न करावा. यामुळे यश प्राप्त होऊ शकेल. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शुभचिंतकांचा सल्ला चांगलाच असेल. घराची दुरुस्ती किंवा आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात जास्त खर्च करावा लागू शकतो. त्याचा प्रभाव आपल्या अंदाजपत्रावर पडू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यक्षेत्र ह्यात समन्वय साधण्यात काही त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. जीवनाचे प्रदर्शन कोणत्याही सामाजिक माध्यमावर किंवा इतर ठिकाणी करू नये.
14 / 15
कुंभ: कारकीर्द व व्यवसाय ह्यासाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. व्यवसाय वृद्धीचा विचार करत असाल तर त्यात मित्रांची मदत कामी येऊन मनोकामना पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या मध्यास घर-जमीन यांच्या खरेदी-विक्रीत माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा शुभ फलदायी आहे.
15 / 15
मीन: हा आठवडा यश व आनंद घेऊन येणारा आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी व सरकारी योजनांचा लाभ मिळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-घर व पैतृक संपत्तीशी संबंधित वादांचे व समस्यांचे निराकरण होईल. ऋतुजन्य आजार होण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. व्यापारात इच्छित लाभ व प्रगती प्राप्त होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक