शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ; नवीन संधी मिळणार, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 7:20 AM

1 / 15
सध्या पितृपक्ष सुरु आहे. कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत शुक्र सिंहेत, रवी आणि बुध कन्येत मंगळ आणि केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील. या सप्ताहात मंगळवारी इंदिरा एकादशी, गुरुवारी प्रदोष, तर शनिवारी सर्वपित्री अमावास्या आहे. रविवार, दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी भाद्रपद कृष्ण नवमी (सकाळी १०:१३ पर्यंत) आहे.
3 / 15
दुसया दिवशी उत्तर रात्री २:४५ पर्यंत पुष्य, तर त्यानंतर आश्लेषा नक्षत्र राहील. रास कर्क आहे. आज चांगला दिवस आहे. पितृपक्षातील दशमी श्राद्ध तिथी आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा. ]
4 / 15
मेष- नवीन संधी मिळेल : सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. नवनवीन संधी चालून येतील. नवीन शिकण्यासाठी वेळ द्याल. ओळखीचे फायदे होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. कलाकार मंडळींना अनुकूल वातावरण राहील. काहींना पुरस्कार जाहीर होतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. यशाच्या शिखरावर जाताना लोकांशी वैर घेऊ नका. संयमाने वागा. आरोग्याची हेळसांड करू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
5 / 15
वृषभ- धनलाभ होईल : व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. घराच्या देखभालीकडे लक्ष द्याल. गृहसौख्य चांगले राहील. नोकरीत मोठी संधी मिळेल. काहींना मनासारखी बदली मिळेल. सुखसोयी वाढवून मिळतील. पगारवाढ मिळेल. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या उपद्व्यापाकडे लक्ष द्या. फार अचाट साहस करु नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
6 / 15
मिथुन- ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. एखाद्या कार्यक्रमानिमित्त घरी लोकांची ये जा चालू राहील. दगदग धावपळ होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या सुवार्ता कानी पडतील... कार्यक्षेत्रात कामाचा ताण राहील. अनपेक्षित बदल होतील. प्रेम प्रकरणात सावध पावले टाका. अचाट साहस करणे टाळा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
7 / 15
कर्क- धनलक्ष्मीची कृपा राहील या सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून येतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळेल. भेटवस्तू मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात दगदग होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी गैरसमज होतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
8 / 15
सिंह- प्रेमात सफलता मिळेल : सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काहींना प्रवास घडून येईल. मात्र, अल्पावधीतच परिस्थिती अतिशय अनुकूल होईल. आवडत्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे. चांगले प्रस्ताव समोर येतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण बदल होतील. नावलौकीक वाढेल. आर्थिक बाजू बळकट राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
9 / 15
कन्या- मौजमजा कराल : आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. काहींना प्रवास घडून येईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांच्यासमवेत मौजमजा कराल. एखाद्या उलाढालीत नुसताच वेळ वाया जाऊ शकतो. व्यवसायात तुमचा एखादा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मोठे आर्थिक निर्णय घेताना खबरदारी घेतली पाहिजे. कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.
10 / 15
तूळ- उत्साहात होईल. नवीन संधी तुमच्या समोर येतील. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. ते तुमच्या फायद्याचे ठरतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. घरी पाहुणे मंडळी येतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. तुमच्या एखाद्या प्रकल्पात अनेकांची साथ मिळून सफलता मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भेटवस्तू प्राप्त होतील. सप्ताहाच्या उत्तरार्धात दगदग होईल अशी कामे करू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
11 / 15
वृश्चिक- भाग्य साथ देईल : भाग्याची चांगली साथ या सप्ताहात आपल्याला मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. पगारवाढ, विविध प्रकारच्या सुखसोयी मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तू खरेदी कराल. त्यासाठी बराच पैसा खर्च होईल. व्यवसायात फायदेशीर व्यवहार होतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
12 / 15
धनू- मान वाढेल या सप्ताहात आपण सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. अचानक धनलाभ होऊ शकतो. सप्ताहाच्या सुरुवातीला वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मौजमजा करण्याच्या निमित्ताने फिरणे होईल. मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांच्याशी चांगला संवाद व समन्वय राहील. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. समाजात तुमचा मान वाढेल. भेटवस्तू, पुरस्कार मिळतील. कार्यक्षेत्रात दगदग होईल. काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. घरी लोकांची ये जा चालू राहील. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.
13 / 15
मकर- अचानक धनलाभ होईल : व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत दगदग धावपळ करावी लागेल. मात्र, अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यात तुमचा फायदा होईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जीवनसाथीची काळजी घ्या. सामाजिक कार्य करताना लोकांना नाराज करू नका. वादविवादापासून दूर राहा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला आणि आशीर्वाद घ्या. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचा. टीप-रविवार, सोमवार, गुरुवार चांगले दिवस.
14 / 15
कुंभ- संमिश्र ग्रहमान: हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा असेल. मनात काही शंका असतील. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. काही कामे रखडली जातील. काही प्रश्न सुटतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
15 / 15
मीन- जपून व्यवहार करा : सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला चांगल्या बातम्या कळतील. मुलांना यश मिळेल. मात्र, त्यांच्यावर अपेक्षांचे अवास्तव ओझे टाकू नका. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. व्यवसायात कामाचा ताण राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. कुणी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. लगेच हुरळून जाऊ नका. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद )
टॅग्स :Astrologyफलज्योतिष