शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०९ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी दूर होतील; धनलक्ष्मी प्रसन्न राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 9:12 AM

1 / 15
एप्रिल महिन्याच्या या आठवड्याची सुरुवात संकष्ट चतुर्थीने होत आहे. श्रीगणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थी सर्वोच्च आणि शुभ फलदायी मानली गेली आहे. तसेच या आठवड्यात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
2 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात नवग्रहांचा राजा सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष ही रविची उच्च रास आहे. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला मेष संक्रांती असेही संबोधले जाते. मेष राशीतील सूर्याच्या प्रवेशानंतर बुधासोबतच्या युतीने बुधादित्य योग आणि सूर्य, बुध तसेच राहु यांचा त्रिग्रही योग जुळून येईल.
3 / 15
एकूण ग्रहस्थिती आणि ज्योतिषीय अंदाजानुसार, कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा आगामी काळ अत्यंत शुभ, लाभदायी ठरू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागू शकेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी असतील. मनात काळजीचे विचार राहतील. मात्र, मध्यावधीत आपल्या बाजूने ग्रहमान राहील. अडचणी दूर होतील. आरोग्याच्या तक्रारी राहणार नाहीत. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. मनात आनंदी विचार राहतील. सामाजिक कार्यात तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी राहील. ती तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. जुनी येणी वसूल होतील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.
5 / 15
वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. चांगल्या बातम्या कळतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. प्रेमात सफलता मिळेल. भेटवस्तू मिळतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. वाहने जपून चालवा, व्यवसायात भरभराट होईल. तुमचे आडाखे बरोबर ठरतील. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. प्रवासात सतर्क राहा. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
6 / 15
मिथुन: सप्ताहात तुमचे अंदाज चुकू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करा. फार घाई करू नका. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका, व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांशी संवाद ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करणे टाळा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
7 / 15
कर्क: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळतील. नोकरी व्यवसायात काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. मात्र, ही स्थिती फार काळ टिकून राहणार नाही. आपण त्यातून सहजपणे मार्ग काढाल. शैक्षणिक क्षेत्रात असणायांना चांगला काळ आहे. प्रगती होईल. मुलांना योग्य संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. हितशत्रूंना टीका करण्याची संधी देऊ नका. आपली कामे चोखपणे पूर्ण करा. वेळेचा अपव्यय करू नका. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस.
8 / 15
सिंह: अतिशय अनुकूल काळ आहे. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन नोकरीच्या संधी' मिळतील. काहींना बढती, पगारवाढ, बदली मिळू शकते. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. कामाचा ताण कमी राहील. कामे आटोक्यात येतील. त्यामुळे मनोरंजन, समाजसेवा यासाठी वेळ द्याल. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. ग्राहकी वाढेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या योजना व प्रगती इतरांना सांगत बसू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
9 / 15
कन्या: या सप्ताहात ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी सुसंवाद राहील. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरु राहील. हाती पैसा राहील. मात्र, बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घेतली पाहिजे. नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाचे स्वरूप बदलेल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांना काय हवे नको ते विचारा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
10 / 15
तूळ: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. मित्र, भावंडांची भेट होईल. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. नवीन जबाबदारीचा ताण राहील. कामांची यादी बनवून कामे करा. घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. मुलांची काळजी घ्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
11 / 15
वृश्चिक: आपल्या अनेक छोट्या-मोठ्या अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रेमात सफलता मिळेल. भेटवस्तू मिळतील. विवाहेच्छूंचा विवाह ठरेल. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात. मुलांची प्रगती होईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
12 / 15
धनु: आठवड्याची सुरुवात अडखळत होईल. काही अडचणी असतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. मध्यावधीत आपल्या अडचणी दूर होतील. लोकांची साथ मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळलेला बरा. किरकोळ कारणावरून रागाऊ नका. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र, सहकारी वर्गाला कठोर बोलून दुखावू नका. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
13 / 15
मकर: सप्ताहाची सुरुवात उत्साहवर्धक घटनांनी होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. अन्यथा कितीही पैसे मिळूनही शिल्लक काही राहणार नाही. महत्त्वाची कामे सुरुवातीलाच करून घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मुलांचे कौतुक होईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
14 / 15
कुंभ: नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन कामात ताण कमी राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. वाहनसुख मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. भेटवस्तू मिळतील. अनोळखी लोकांपासून सावध राहा. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. मिठाई आणली जाईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
15 / 15
मीन: अनुकूल कालखंड आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. अपेक्षित यश मिळेल. नोकरीत मोठी संधी मिळेल. काहींच्या बदलीची शक्यता आहे. सहकारी वर्गाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद )
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य