शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना सर्वोत्तम, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; धनप्राप्ती, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 8:43 AM

1 / 15
या सप्ताहात कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत रवी मिथुनेत, बुध कर्केत, मंगळ आणि शुक्र सिंहेत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शेनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. या सप्ताहात गुरुवारी कामिका एकादशी, तर शनिवारी प्रदोष आहे. रविवार पूर्ण काळ पंचक असून, सोमवारी सायंकाळी ६:५९ पर्यंत पंचक राहील.
3 / 15
या आठवड्याचे एकूण ग्रहमान पाहता आगामी सप्ताह आपल्यासाठी कसा असेल? करिअर, नोकरी, शिक्षण, व्यवसाय, कुटुंब याबाबत कोणत्या राशींना लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. जोडीदाराने केलेल्या कामात लाभ होऊन त्यांची प्रगती होईल. आठवड्याची सुरुवात खर्चाने होईल. तेव्हा आपणास सावध राहावे लागेल. आपण आपल्या परीने प्राप्तीत वाढ करण्याचा शक्य तितका प्रयत्न कराल. भावंडांचे सहकार्य मिळाले तरी त्यांना काही समस्या असू शकतात. नोकरी करणाऱ्यांना आठवडा खूपच अनुकूल आहे. कामगिरी अधिक चांगली होईल. कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन व्यापारी सौद्याचा फायदा होऊ शकतो. एखाद्या नवीन व्यक्तीच्या ओळखीमुळे आपणास व्यापारात चांगला नफा होणे अपेक्षित आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
5 / 15
वृषभ: हा आठवडा उत्तम आहे. कौटुंबिक जीवन सुखावह होईल. घरात एखादा सोहळा होऊ शकतो. घरात फेरबदल करू शकाल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. अचानकपणे धनप्राप्ती झाल्याने आर्थिक आव्हाने कमी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची धावपळ होईल. कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. चांगला लाभ होईल. खर्च वाढतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांची मेहनत यशस्वी होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
6 / 15
मिथुन: हा आठवडा उत्तम फलदायी आहे. आठवड्याची सुरुवात मित्रांसह मौजमजा करण्याने होईल. मित्र कामात सहकार्य करून व समस्यांचे निराकरण करून उत्तम मैत्रीची प्रचिती देतील. नोकरी करणाऱ्यांना आठवडा चांगला आहे. नशिबाची साथ मिळेल. पगारवाढ संभवते. फक्त हातून चुका होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांना काही वजनदार व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्याने एखादा नवीन व्यापारी सौदा होऊ शकतो. विद्यार्थी बऱ्याच नवीन गोष्टी शिकतील. त्यांना अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे समज वृद्धिंगत होऊन विषयांवरील पकड मजबूत होईल.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या बाबतीत असुरक्षितता जाणवेल. नोकरी गमावून बसणार तर नाही ना असे सारखे वाटत राहील. काही विरोधाभास जाणवल्याने त्यांना असे वाटत राहणे स्वाभाविक असले तरी हे काही क्षणांपुरतेच असेल. काम नेटाने करत राहावे, आपणास नोकरी गमवावी लागणार नाही. नोकरी चालूच राहील व भविष्यात अचानकपणे काही लाभ होतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. ते आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून काही नवीन योजना हाती घेतील व व्यापारात चांगली वृद्धी होताना दिसून येईल. हा आठवडा विद्यार्थ्यांनी मेहनत करण्याचा आहे. चांगला फायदा होईल.
8 / 15
सिंह: आठवड्याची सुरुवात काहीशी प्रतिकूलतेने झाली तरी हळूहळू परिस्थितीत बदल होऊन अनुकुल वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येईल. दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव काही अंशी कमी होईल. इतरांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. कामात स्वतःला पुढे केल्याने व्यापाराची गती वाढेल. नोकरी करणाऱ्यांना काहीसे सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
9 / 15
कन्या: हा आठवडा काही नवीन परिणाम घेऊन येणारा आहे. व्यक्तिगत संबंधात खूप व्यस्त असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामानिमित्त खूप धावपळ करावी लागेल. प्राप्ती उत्तम असल्याने निश्चितपणे यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना कामाच्या बाबतीत काही चिंता सतावतील. स्वतःहून कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. हा आठवडा विद्यार्थ्यांना चांगला आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
10 / 15
तूळ: आठवडा चढ - उताराने भरलेला आहे. एखाद्या गोष्टीमुळे तणावग्रत झालात तरी आठवड्याच्या मध्यास परिस्थिती अनुकूल होईल. चांगला धनलाभ होण्याची संभावना आहे. बॅंकेचे कर्ज फेडण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. नशिबाच्या प्राबल्यामुळे पदोन्नती संभवते. अधिकार क्षेत्रात सुद्धा वाढ होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा यशदायी आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. प्रकृतीची काळजी घ्या.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. संतती संबंधी थोडी काळजी वाटली तरी जोडीदाराने समजूत घातल्यावर काळजी दूर होईल. कार्यालयीन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल असला तरी कार्यालयात एखाद्याशी गैरवर्तणूक करणे आपणास महागात पडेल. तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. थोडी मेहनत वाढवल्यास आपल्या योजना यशस्वी होतील. वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयांचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल. व्यापाऱ्यांना चांगले यश प्राप्त होईल. सरकारी क्षेत्राकडून मोठा फायदा होण्याची संभावना असल्याने संधीचा पूर्ण लाभ घ्यावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कामामुळे समाधान न झाल्याने कामात काही गडबड होण्याची संभावना आहे. कामात चुका होऊ देऊ नका, अन्यथा समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकतील. उच्च शिक्षणात यश प्राप्त होईल.
13 / 15
मकर: हा आठवडा खुश करणारा आहे. मित्रांसह फिरावयास जाऊ शकता. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. घरात स्वादिष्ट भोजन करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे जीवन सुखावह होईल. कामाचा आनंद घेऊ शकाल. ज्याचे सुखद परिणाम मिळतील. हा आठवडा व्यापारासाठी चांगला आहे. बुद्धीचा वापर करून कार्यक्षेत्रात चांगली प्रगती कराल. विरोधकांवर मात कराल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस वगळता इतर सर्व दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगले आहेत.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्त होतील. मित्रांसह मौजमजा करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. कुटुंबियांच्या सहवासात वेळ मजेत घालवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. मेहनत यशस्वी होऊन ती प्रगतीसाठी महत्वाची ठरेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. व्यावसायिक भागीदाराशी सलोखा राहील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा यशदायी आहे. मेहनतीचा पूर्ण लाभ होईल.
15 / 15
मीन: हा आठवडा खूपच चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. आठवड्याच्या सुरुवातीसच प्राप्तीत तेजी येईल. मोठ्या चिंता कमी होतील. खर्च कमी होतील. मनातील इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. काही नवीन योजनांवर काम कराल. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. वरिष्ठ काही नवीन कामाची जवाबदारी देतील, जे आव्हानात्मक असेल, परंतु आव्हाने आपण सहजपणे परतवू शकाल. त्यामुळे प्रतिमा उंचावेल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. आपली कामगिरी बघून काही नवीन लोक आपल्याशी हात मिळवणी करण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. असे असले तरी ते स्वतःच्या मेहनतीने त्यावर मात करू शकतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य