शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना उत्तम काळ, आयात-निर्यातीत यश; सरकारी लाभ, पुरस्काराचा योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 1:53 PM

1 / 15
या सप्ताहाच्या शेवटी रवि वृश्चिक राशीतून धनू राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, शुक्र तुळेत, रवी आणि मंगळ वृश्चिकेत, शनिवारी रवी धनूत बुधाशी युती करेल. प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशीतून राहील. रविवारी प्रदोष, सोमवारी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, मंगळवारी दर्श अमावास्या, मार्गशीर्ष मासारंभ, देव दीपावली आहे. बुधवारपासून खंडोबाचे नवरात्र सुरु होत आहे. शनिवारी विनायकी चतुर्थी आहे.
3 / 15
डिसेंबर महिन्याच्या या आठवड्यात सूर्याने धनु राशीत प्रवेश केल्यानंतर धनु संक्रांती सुरू होईल. हा महिन्याभराचा कालावधी खरमास म्हणूनही संबोधला जातो. सूर्य धनु राशीत विराजमान झाल्यानंतर बुधादित्य आणि राजलक्षण असे दोन राजयोग जुळून येत आहेत. आगामी आठवडा मेष ते मीन या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवन खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. आयात-निर्यातीच्या कामात मोठे यश प्राप्त होईल. व्यापार जलद गतीने प्रगती करेल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात असाल तर तो मिळू शकेल. थोडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांचे काम चांगले होईल. कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. मोठेपणा दाखविण्यासाठी एखाद्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन करू शकाल. विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला आहे. त्यांचे परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल. त्याचे निर्मूलन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जोडीदाराशी भांडण सुद्धा होऊ शकते. तेव्हा सतर्क राहा. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेशी जवळीक साधू शकतील. विरोधक त्रास देण्याच्या विविध क्लुप्त्या करू शकतील. खर्चात वाढ होईल. असे असले तरी प्राप्ती चांगली होईल. तितकासा त्रास जाणवणार नाही. तरी खर्चांवर लक्ष ठेवावेच लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात प्रबळ राहतील. व्यापारात यश प्राप्त होईल. विद्यार्थी अध्ययन चांगले व्हावे म्हणून खूप परिश्रम करतील. एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
6 / 15
मिथुन: हा आठवडा उत्तम आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अत्यंत रोमँटिक आहे. एखादे चित्र काढण्यासाठी किंवा रंगविण्यासाठी वेळ घालवाल. त्यामुळे मन हलके करण्यास मदतच होईल. तणाव दूर होईल. विरोधकांवर मात कराल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम संबंध राहील. जोडीदाराच्या सहकार्याने एखादा जोड व्यवसाय करण्याची संधी मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात थोडी कपात होईल. सासुरवाडीकडून फायदा होईल. व्यावसायिक बैठक पुढच्या आठवड्यावर ढकला. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर योग्य दिशेने अध्ययन केले तर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
7 / 15
कर्क: हा आठवडा अनुकूल आहे. घरात एखादी खूपच चांगली बातमी येईल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा मोठा सोहळा होऊ शकतो, ज्यात अनेक लोक सहभागी होतील. आपले मन हलके होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीसे त्रासलेले दिसले तरी जोडीदाराची सहकार्य करण्याची वृत्ती अनुकूल असेल. आर्थिक प्राप्तीसाठी अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आता बरे वाटू लागेल. कामाचा आनंद घेऊन मनापासून काम करू शकतील. व्यापारासाठी हा आठवडा अनुकूल आहे. परिश्रम यशस्वी होतील. विरोधक शांत होतील. कामात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. परिश्रम करूनच त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातून काहीतरी शिकून जोडीदाराच्या हृदयात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करतील. प्रेमीजन एकमेकांशी जवळीक साधतील. मित्रांच्या सहवासात गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवू शकाल. आनंदाचे भरपूर क्षण येतील. व्यक्तिगत जीवनाचा आनंद घेऊ शकाल. घरात एखादे नूतनीकरणाचे काम होऊ शकते. शासनाकडून एखादा लाभ होऊ शकतो किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घरासाठी होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी खूपच जास्त परिश्रम करावे लागतील. काही लोकांच्या नाराजीस सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना अत्यंत विचारपूर्वक काम करावे लागेल. काही लोक षडयंत्र रचत आहेत, अर्थात त्यांच्यावर मात करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूपच अनुकूल आहे. मन लावून अभ्यास करतील, ज्याचे चांगले परिणाम मिळतील. जास्त मसालेदार पदार्थ टाळावेत.
9 / 15
कन्या: हा आठवडा चांगला आहे. घरात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येईल. कुटुंबीय एकमेकांशी प्रेमाने वागतील. घरातील वातावरण सुखावह राहिल्याने आपणास आनंद होईल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या सासुरवाडीकडील लोक पाठिंबा देतील. गरज भासल्यास मार्गदर्शन करतील. आत्मविश्वासामुळे नोकरीत व व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. व्यापारात काही नवीन लोकांची ओळख फायदेशीर सौदा करू शकते. मित्रांच्या सहवासात बराचसा वेळ घालवू शकता. विद्यार्थी सध्या स्पर्धेसाठी भरपूर परिश्रम करतील, परंतु त्यांना अधून-मधून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
10 / 15
तूळ: हा आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम संबंध दृढ होतील. जोडीदारास रोमांसाच्या बरोबरीने प्रेमाचे धडे द्याल. दांपत्य जीवन सुखद होईल. काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. नवीन मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, नामांकित कंपनीचे कपडे किंवा गॉगल खरेदी करण्यात स्वारस्य दाखवाल. भरपूर पैसा खर्च होईल. पूर्णतः आपल्या ऐश आरामासाठी पैसा खर्च कराल. खर्चात वाढ होईल. नोकरीत सुखद परिणाम मिळतील. यशस्वी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. चांगले परिणाम मिळतील.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती राहील. खूप परिश्रम कराल. चांगले परिणाम मिळतील. एखादा पुरस्कार किंवा मान-सन्मान मिळण्याची संभावना आहे. खर्च जलद गतीने वाढतील, ज्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापाऱ्यांना यश प्राप्त होईल. पूर्वी केलेले परिश्रम फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना स्थिती प्रबळ असल्याचे जाणवेल. अभ्यासात लाभ होईल. असे असले तरी स्पर्धेसाठी आळस सोडावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. एखाद्या कलात्मक कार्यासाठी पुरस्कृत केले जाऊ शकते किंवा एखादा पुरस्कार मिळू शकतो. सध्या किरकोळ खर्च होतील, परंतु काही त्रास होणार नाही. सामाजिक वर्तुळ मजबूत होईल. मित्रांच्या सहवासात मौज-मजा करण्याची संधी मिळेल. नोकरीतील स्थिती चांगली होईल. खूप परिश्रम करावे लागतील. ही वेळ आव्हाने स्वीकारून पुढे जाण्याची आहे, ज्यामुळे स्थिती मजबूत होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. उच्च शिक्षणासाठी विदेश गमन होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
13 / 15
मकर: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विनाकारण भांडण - तंटा संभवतो. कामाच्या ठिकाणी मौज-मजा कराल. एखाद्या अधिकृत उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. संवाद कौशल्याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकाल. वरिष्ठांशी जवळीक वाढू शकते, जी आपणास वेळोवेळी अनुकूल झाल्याने नोकरीतील स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर थोडे लक्ष ठेवावे लागेल. मागण्या वेळेवर पूर्ण कराव्या लागतील. विद्यार्थ्यांना लक्ष विचलित करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील.
14 / 15
कुंभ: हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. कोणत्याही कारणाने जोडीदाराशी वाद न घालता त्यांच्या सहवासात वेळ घालवा. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कामात यशस्वी व्हाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. खर्चात कपात झाल्याने बऱ्याचशा चिंता दूर होतील. व्यापारासाठी आठवडा चढ-उतारांचा आहे. परंतु थोड्याशा प्रयत्नाने यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. परिश्रम यशस्वी होऊन चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. शिष्यवृत्ती मिळू शकते. फक्त आळस सोडल्यास बरीचशी कामे करू शकाल.
15 / 15
मीन: हा आठवडा चांगला आहे. संततीवर खूप प्रेम कराल. त्यांच्या भविष्यावर लक्ष द्याल. वैवाहिक जीवन तणावग्रस्त होऊ शकते. शांत राहणे आपल्या हिताचे होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. कामे पूजा समजून कराल व त्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण होईल. लोक प्रशंसा करतील. व्यापाऱ्यांना कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. आर्थिक लाभ होईल. ज्या व्यक्ती प्रवासाशी संबंधित व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल असून ते कामात प्रगती करतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते मनापासून अभ्यास करतील, ज्याचे चांगले परिणाम मिळतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य