शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:44 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात शनिवारी रवी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ग्रहस्थिती अशी- गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, रवी तूळ राशीत असून, शनिवारी तो वृश्चिक राशीत बुधाशी युती करेल. शुक्र धनू राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून राहील. १२ रोजी प्रबोधिनी एकादशी एकादशी आहे. १३ रोजी चातुर्मास समाप्ती, प्रदोष व तुळशी विवाह प्रारंभ होईल. १४ रोजी वैकुंठ चतुर्दशी, १५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशी विवाह समाप्ती व गुरू नानकदेव जयंती आहे.
3 / 15
रवीचे होणारे राशी परिवर्तन, वृश्चिक संक्रांतीचा काळ तसेच कार्तिकी एकादशी, चातुर्मास समाप्ती, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा शुभ काळ कोणत्या राशींना कसा ठरू शकेल? मेष ते मीन या राशींवरील प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा मिश्र फले देणारा आहे. कामात व्यस्त राहाल. अचानक कामाचा अतिरिक्त भार येऊ शकतो. ती पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आठवडा आव्हानात्मक असू शकतो. व्यावसायिकांना स्पर्धकांशी कडवी झुंज द्यावी लागण्याची संभावना आहे. आरोग्य काहीसे नरम-गरम राहण्याची शक्यता असल्याने दिनचर्येवर व आहारावर लक्ष ठेवावे लागेल. परदेशात कारकीर्द घडवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा दुर्लक्षित करू नका. सावध राहावे लागेल. कार्यात सर्तक राहावे लागेल.
5 / 15
वृषभ: हा आठवडा विविधतेने भरलेला आहे. व्यापारी वर्गास त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. अचानक एखादा प्रवास करावा लागू शकतो व त्यामुळे कार्यक्षेत्रापासून दूर राहावे लागेल. कारकिर्दीसाठी दृढपणे प्रयत्न करत असाल तर लक्ष्यांक गाठण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सहकारी व वरिष्ठ ह्यांच्याशी मिळून-मिसळून कामे करावी लागतील. प्रवासादरम्यान सामानाची व प्रकृतीची काळजी घ्यावी. परीक्षा - स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम करूनच यशस्वी होता येईल.
6 / 15
मिथुन: आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर दीर्घ काळापासून स्थगित असलेले एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते. सत्ता व शासनाशी संबंधित व्यक्तींचे पूर्ण सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्री सावध राहावे लागेल. जमीन किंवा घराशी संबंधित वाद संपुष्टात येतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आर्थिक बाबींची स्पष्टता करूनच वाटचाल करावी लागेल. परीक्षा - स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांना खुशखबर मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी शुभचिंतकांचा सल्ला घ्यावा लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
7 / 15
कर्क: आठवड्याच्या सुरवातीस एखादे मोठे यश मिळण्याची संभावना आहे. धनसंचयात भरघोस वाढ होऊ शकेल. यशाने उत्साहित होऊन अहंकारीत होणे टाळावे. कोणत्याही जोखीम असलेल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा भविष्यात मोठे नुकसान सोसावे लागू शकते. पदोन्नती किंवा अपेक्षित ठिकाणी बदली होण्याची कामना पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ कामगिरीची प्रशंसा करतील. जमीन-घर खरेदी - विक्रीत लाभ होईल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेणार असाल तेव्हा आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य व समर्थन प्राप्त होईल. परदेशात कारकीर्द घडविण्याचा किंवा व्यापार करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल. मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचा कार्यक्रम आखू शकता. प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
8 / 15
सिंह: ह्या आठवड्यात प्रकृतीवर व संबंधांवर लक्ष ठेवावे लागेल. प्रकृती बिघडल्यास त्याचा प्रभाव आपल्या कामगिरीवर होऊ शकतो. एखादी मोठी संधी हातातून निसटून जाण्याचा धोका असू शकतो. एखाद्या लहानशा चुकीमुळे प्रतिमा मलीन होऊ शकते. विरोधकांपासून सावध राहावे लागेल. जमीन-घर ह्यांच्याशी संबंधित एखादी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री सतर्क राहावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर राखावा. व्यक्तिगत जीवनात घाईघाई किंवा आवश्यकतेहून जास्त हस्तक्षेप केल्यास संबंध बिघडू शकतात.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी व सौभाग्यदायी आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या कामामुळे सन्मानित केले जाऊ शकते. बाजारातील तेजीचा लाभ घेऊ शकता. प्रतिष्ठा उंचावेल. यापारासाठी सुद्धा अनुकूल आहे. दीर्घ काळापासून व्यापार विस्तार करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीत बदल करू इच्छितात त्यांना एखादी मोठी ऑफर मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील.
10 / 15
तूळ: लहान भावंडांशी झालेल्या वादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे हितावह होईल. कारकीर्द व व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. कोणासमोर आपले प्रेम व्यक्त करू इच्छित असाल तर घाई करू नका. योग्य वेळ आली की ते व्यक्त करा. वैवाहिक जीवन सुखद होईल.
11 / 15
वृश्चिक: पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे व परिश्रमांचे सुखद परिणाम बघण्याची संधी मिळू शकते. कारकीर्द किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्री विरोधकांपासून सतर्क राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा उबग येऊ शकतो. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असले तर त्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित परिणाम मिळू शकेल. आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखू शकता.
12 / 15
धनु: वेळ व ऊर्जेचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालात तर यश व लाभ प्राप्त होऊ शकतो. प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांना एखादे महत्वाचे यश मिळू शकते. कुटुंबात सन्मान वाढू शकतो. विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेम संबंध दृढ होऊ शकतात.
13 / 15
मकर: हा आठवडा काहीसा आव्हानात्मक व अडथळ्यांचा असू शकतो. जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जास्त धावपळ व परिश्रम करावे लागू शकतात. अधिक व्यस्त राहावे लागू शकते. आर्थिक स्थितीस मोठाले खर्च आव्हान देऊ शकतात. नोकरीच्या किंवा रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर अजून काही दिवस धीर धरावा लागू शकतो. कामाचा भार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ देऊ नका. प्रकृती चांगली राहावी म्हणून आहार, संवयी व व्यायाम ह्यावर लक्ष केंद्रित करावे. वेळोवेळी विश्रांती घ्या. मानसिक स्थिती संतुलित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा.
14 / 15
कुंभ: आळस व अहंकार झटकून टाकावा लागेल. जमीन किंवा घराशी संबंधित एखादा वाद आपसात बोलणी करून संपुष्टात आणता येत असेल तर तसे करावे. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. एखाद्या योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी, अन्यथा नंतर नुकसान सोसावे लागू शकते. प्रवासादरम्यान आपल्या सामानाची व प्रकृतीची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.
15 / 15
मीन: हा आठवडा कठोर परिश्रम व प्रयत्नानंतरच अपेक्षित यश देणारा आहे. कामात स्वतःला समर्पित करावे लागेल. इतरांवर अवलंबून राहू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत शोधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अपेक्षित लाभ मिळू शकेल. बाजारातील तेजीचा लाभ घेण्यात आपण यशस्वी व्हाल. संचित धनात वाढ होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी