शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ फलदायी, उन्नती-प्रगती वृद्धी; हरि-हराची अपार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 7:58 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात रवीचा राशीपालट आहे. अन्य कोणताही राशीपालट नाही. ग्रहस्थिती अशी मंगळ, गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, रवी कर्क राशीत असून, १६ ऑगस्ट रोजी तो सिंह राशीत प्रवेश करेल. तेथे त्याची युती बुध आणि शुक्र यांच्याशी होईल. केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धनू आणि मकर राशीतून राहील. ११ ऑगस्ट रोजी भानू सप्तमी व सीतला सप्तमी आहे. १२ रोजी दूसरा श्रावणी सोमवार, १३ रोजी दुसरी मंगळागौर, १५ रोजी स्वातंत्र्य दिन, १६ रोजी पुत्रदा एकादशी, १७ रोजी शनि प्रदोष आहे.
3 / 15
सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाने बुध आणि शुक्राशी युती होऊन बुधादित्य आणि शुक्रादित्य असे राजयोग जुळून येत आहेत. तसेच सूर्य आणि शनी एकमेकांसमोर सातव्या स्थानी आल्याने समसप्तक योग जुळून येत आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी आठवडा सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल? नोकरी, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, शिक्षण, वैवाहिक जीवन, आर्थिक आघाडीवर सूर्य गोचराचा कसा प्रभाव दिसून येऊ शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी एखाद्या गोष्टीने वाद होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आठवड्यात डोळसपणे कामे करावी लागतील, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. प्रेमिकेची भेट होण्यात अडचणी येऊ शकतात, व त्यामुळे मन बेचैन राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. अर्थात अडचणीचे दिवस फारकाळ टिकणार नाहीत. आठवड्याच्या उत्तरार्धात विवेकाच्या जोरावर व मित्रांच्या मदतीने जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ: हा आठवडा सामान्य व लाभदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या सिद्धतेमुळे मान-सन्मानात वाढ होईल. धार्मिक कार्य संपन्न होतील. पूर्वी एखाद्या योजनेत किंवा व्यापारात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आठवड्यात लाभ मिळण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा निर्णय घेऊ शकता. युवकांचा वेळ मौज-मजा करण्यात जाईल. संगीतात प्रती रुची वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. प्रेम संबंध दृढ व प्रगल्भ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्याना एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. आठवड्याच्या अखेरपर्यंत जमीन-घर खरेदी-विक्रीशी संबंधित स्वप्न साकार होईल. पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना आहे.
6 / 15
मिथुन: आठवड्याचा पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध जास्त सकारात्मक होणार आहे. कार्यालयाशी संबंधित कामाचा अतिरिक्त भार येण्याची संभावना आहे. प्रवासादरम्यान प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी. उत्तरार्धात एखाद्या प्रभावित व्यक्तीच्या मदतीने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळवू शकाल. प्रेमिकेप्रती आकर्षण वाढल्याने जास्तीत जास्त वेळ सहवासात घालविण्याची इच्छा होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह किंवा कुटुंबियांसह एखाद्या रमणीय ठिकाणाची सहल संभवते. एखादी तीर्थयात्रा सुद्धा संभवते.
7 / 15
कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. लोकांशी मिळून-मिसळून काम केल्याने लाभ होईल. इच्छित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यापारात निव्वळ लाभच होणार नाही तर त्याची वृद्धी होईल. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी झालेले मतभेद आपल्या तणावास कारणीभूत ठरेल. गैरसमज दूर करताना आपल्या वागण्यात नम्रता ठेवावी, अन्यथा होऊ घातलेली जवळीक दुराव्यात परिवर्तित होण्याची संभावना आहे. एखाद्या मंगल किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्याना एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. अपेक्षित यश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहात वृद्धी होईल.
8 / 15
सिंह: लहान-सहान समस्या वगळल्यास आठवडा लाभदायी होईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या कौटुंबिक समस्येचे निराकरण झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. विद्यार्थी अभ्यासात रमतील. ते पूर्ण मन लावून ध्येय पूर्तीची तयारी करत असल्याचे दिसून येईल. एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. हा प्रवास सुखद व लाभदायी होईल. प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. नवीन व मोठी जवाबदारी मिळाल्याने घर व कार्यक्षेत्रात समतोल साधणे अवघड होऊ शकते. हास्य-विनोद करताना कोणाचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
9 / 15
कन्या: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्राशी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे. घराची दुरुस्ती किंवा सुख-सोयींशी संबंधित वस्तू खरेदी करण्यात खिशातून जास्त पैसा खर्च झाल्याने अंदाजपत्र कोलमडू शकते. एखाद्या योजनेत पैसे गुंतविण्यापूर्वी आपल्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. प्रेमिकेच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची भरपूर संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. असे केल्याने कामे वेळेवर योग्य रीतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
10 / 15
तूळ: हा आठवडा लाभदायी व उन्नतीदायक आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांकडून मिळालेली शाबासकी व कनिष्ठांचे सहकार्य ऊर्जा निर्माण करेल. प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. एकमेकांप्रती विश्वास निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराशी संबंधातील माधुर्य टिकून राहील. वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. कार्यक्षेत्री कामगिरीचे गुणगान व योजनेचा खुलासा इतरांसमोर करणे टाळा, अन्यथा दृष्ट लागू शकते. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा काहीसा चढ-उतारांचा आहे. कोणी केलेल्या टीका-टिप्पणी ऐवजी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. त्याच बरोबर निव्वळ कार्यक्षेत्रीच नव्हे तर खाजगी जीवनात गुप्त शत्रुंपासून सावध राहावे. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी वाद-विवाद होऊ शकतात. प्रेम संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. कुटुंबियांच्या सहवासात एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. प्रवास सुखद व मनोरंजक होईल. सुख-सोयींशी संबंधित वस्तूंवर भरपूर पैसा खर्च करू शकता.
12 / 15
धनु: हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. एखाद्या मोठ्या जवाबदारीचा भार पडू शकतो. ती पार पाडण्यास अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायी होतील. प्रवासात एखाद्या प्रभावी व्यक्तीची ओळख होईल. ह्या ओळखीमुळे भविष्यात लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमिकेवरील प्रेम व विश्वास टिकून राहील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण होत असल्याचे दिसून येण्याची शक्यता आहे. कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलून वाटचाल करावी लागेल.
13 / 15
मकर: ईश्वराची पूर्ण कृपा होत असल्याचे दिसून येईल. कुटुंबाशी संबंधित समस्यांचे निराकरण झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. कार्यक्षेत्री सहकाऱ्यांशी समन्वय साधून कामे केली तर कामे सहजपणे वेळेवर पूर्ण करू शकाल. असे असले तरी कोणताही महत्वाचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. प्रेमिकेशी उत्तम समन्वय असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढेल. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास सुखद व लाभदायी होईल.
14 / 15
कुंभ: वाणी व व्यवहार ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षेत्री आपले वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघांना घेऊन वाटचाल करावी. आठवड्याच्या मध्यास कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. प्रकृती विषयक कोणत्याही लहान-सहान तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आपसातील विश्वास वाढेल. आपल्या कठीण प्रसंगात वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी उभा राहील. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व संशीधन कार्यात गुंतलेल्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी आहे. एखादी मोठी खुशखबर मिळाल्याने मन प्रसन्न होईल.
15 / 15
मीन: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी आहे. कामानिमित्त दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. ज्या व्यक्ती अनेक दिवसांपासून आपले नवीन काम सुरु करण्याच्या विचारात आहेत, त्यांना एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून ते सुरु करण्यासाठी मोठे सहकार्य मिळू शकते. जे आधीपासूनच एखादा व्यवसाय करत आहेत त्यांना अपेक्षित लाभ मिळेल. घर-जमीन यांच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊन लाभ प्राप्ती होईल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात व्यतीत होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबियांसह एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीस जाऊ शकाल. मित्रांच्या माध्यमातून लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास