शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope : आठवड्याचे राशीभविष्य : ११ ते १७ जून २०२३; 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा, नोकरी करणाऱ्यांनाही लाभ संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 8:36 AM

1 / 12
मेष - हा आठवडा आपल्यासाठी यशदायी आहे. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव काही अंशी कमी झाल्याचे जाणवेल. ते त्यांच्या जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखतील. त्यांच्यासह खरेदीस सुद्धा जातील व त्यामुळे त्यांचे दांपत्य जीवन पुन्हा थोडेसे बहरू लागेल. प्रणयी जीवनात काही तणाव असला तरी प्रेम टिकून राहील. आपण एकमेकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. एखादे नवीन वाहन खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी सुद्धा पूर्ण होतील व त्यात आपला लाभ होईल. आपल्या कामात वाढ होईल. एखाद्या नवीन प्रकल्पाची जवाबदारी आपल्यावर सोपविण्यात येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात नफा होईल. एखाद्या मित्राचे किंवा भावंडाचे सहकार्य मिळाल्याने व्यापार जलद गतीने प्रगती करेल.
2 / 12
वृषभ - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारा दरम्यान संघर्ष होऊ शकतो. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. आपली प्रेमिका आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करेल व आपण सुद्धा त्यास उत्तम प्रतिसाद द्याल. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती चांगली झाल्याने आपणास त्याची जाणीव होणार नाही. मानसिक तणाव कमी होईल. काम उत्तम व अधिक कौशल्यपूर्वक करण्यास आपण प्राधान्य द्याल. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या यश प्राप्तीची आपण अपेक्षा बाळगू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. त्यांना खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. आपण आपल्या कार्यकौशल्याच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर काही नवीन संधी प्राप्त करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
3 / 12
मिथुन - हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपले दांपत्य जीवन सुखद झाल्याने आपणास आनंद होईल. संतती प्राप्तीची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आपण एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी व्हाल व त्यामुळे काही समस्यांतून मुक्ती सुद्धा मिळवाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास कराल. आपल्या मित्रांसह गप्पागोष्टी करण्याची संधी आपणास मिळेल व त्यामुळे आपले मन खुश होईल. ह्या आठवड्यात आपण जुन्या चिंतेतून बाहेर पडाल. कौटुंबिक वातावरण सुद्धा सकारात्मक होईल. असे असले तरी चुकीच्या वेळेस चुकीचे वक्तव्य केल्याने आपले एखाद्याशी भांडण होऊ शकते. त्याची आपणास काळजी घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल. प्राप्तिकराची नोटीस सुद्धा येऊ शकते, तेव्हा वेळेवर कर भरणा करा. नोकरी करणाऱ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आपला अनुभवच आपला मार्गदर्शक होईल.
4 / 12
कर्क- हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम, रोमांस व आकर्षणा बरोबरच छोटा वाद होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांना त्यांच्या प्रणयी जीवनात सामंजस्य ठेवावे लागेल. आपण एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास समस्या कमी होतील. आठवड्याच्या सुरवातीस आपणास नशिबाची साथ मिळून आपली प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत अति आत्मविश्वासात येऊन शेखी मिरवायचा प्रयत्न करू नये, अन्यथा बाजी पलटू शकते. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल व आपणास पैसा कोठून येत आहे हे समजणार सुद्धा नाही. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. खर्च सुद्धा कमी होतील व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या काही मित्रांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी ह्या आठवड्यात खूप मेहनत करतील व त्यांची मेहनत यशस्वी सुद्धा होईल. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
5 / 12
सिंह- आठवड्याची सुरवात काहीशी प्रतिकूल असू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल व ते आपल्या जोडीदारास आपल्या मनातील भावना सांगू शकतील. आपल्या मनातील भावना जोडीदारास समजावण्याचा प्रयत्न करतील, कि जेणे करून वैवाहिक जीवनाचा गाडा योग्य मार्गाने वाटचाल करू शकेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्य आहे. आपण आपल्या नात्याचा आनंद घेऊ शकाल. सध्या आपला खर्च होत राहील ज्यामुळे आपण चिंतीत व्हाल. नशिबाची साथ सुद्धा अपेक्षेनुसार मिळणार नाही. त्यामुळे काही पूर्णत्वास येत असलेली कामे खोळंबु शकतात. तेव्हा कोणतेही मोठे काम आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न न करता थोडा वेळ घालवावा. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या कामास उत्तम प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकाल. व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामात चांगला फायदा होईल. भागीदारी व्यवसाय करत असल्यास आपल्या भागीदाराशी बोलताना काळजी घ्यावी. जर भांडण झाले तर शांत राहून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. ते नवीन काही शिकण्याचा प्रयत्न सुद्धा करतील.
6 / 12
कन्या- हा आठवडा आपल्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन येणारा आहे. आपण स्वतःचाच विचार करत बसाल. नवीन काही करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणावातून बाहेर पडतील व जोडीदाराच्या कुटुंबियांशी संपर्क वाढवतील. कौटुंबिक जीवन सुखशांतीने व्यतीत होईल, परंतु कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद मोकळेपणाने उपभोगू शकाल व आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रेमिकेस सांगाल. आपले नाते पुन्हा एकदा बहरून उठेल. नशिबाची साथ मिळाल्याने कामे होतील व आपली स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. आपली कार्यकुशलता आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. वरिष्ठांशी सुद्धा आपले संबंध सलोख्याचे राहतील, त्याचा आपणास फायदा होत राहील. व्यापारी आपल्या कामावर थोडे लक्ष केंद्रित करतील. त्यासाठी त्यांना काही प्रवास सुद्धा करावे लागू शकतात व त्यात त्यांचा फायदा सुद्धा होईल. आपण आपल्या विरोधकांवर मात कराल. कोर्ट - कचेरीच्या कामात यश प्राप्ती होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
7 / 12
तूळ ह्या आठवड्यात आपणास थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. त्याच बरोबर एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवू शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना फक्त आपसात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आपण आपल्या नोकरीच्या बाबतीत काहीसे चिंतातुर व्हाल. आपण कामाचा आनंद तर घेऊ शकाल, तरीही काहींना काही अडचणी येतीलच. तेव्हा सावध राहून काम करावे. वरिष्ठांना आपल्या विरोधात जाण्याची कोणतीही संधी देऊ नका. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात एखादे नवीन काम हाती घेण्याची संधी मिळेल. हा आठवडा गुंतवणूक करण्यास अनुकूल नसल्याने थोडे सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करू शकतील.
8 / 12
वृश्चिक - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यास काहीही कमी पडू देणार नाहीत. त्यात यश प्राप्ती सुद्धा होईल. वैवाहिक जोडीदाराशी स्पर्धा वाढेल. घरात आनंद पसरेल. आठवड्याच्या सुरवातीस आर्थिक स्तरावर सुद्धा एखादी आनंददायी घटना घडू शकते. प्रेमीजनांना सुखद क्षणांची प्राप्ती होईल. प्रेमिकेशी आपला समन्वय साधला गेल्यामुळे आपले नाते अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपली पदोन्नती संभवत असल्याने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा व कामगिरी उत्तम करावी. आपणास वरिष्ठांचा सुद्धा पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. त्यांची बुद्धिमत्ता व कौशल्य त्यांच्या प्रगतीस कारणीभूत ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे.
9 / 12
धनु - हा आठवडा आपल्यासाठी उन्नतीदायक आहे. कुटुंबात आनंद पसरेल. आपले आपल्या माते प्रती असलेले प्रेम विशेष रूपाने दिसून येईल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवू शकतो. जोडीदाराशी वाद होण्याची स्थिती संभवते. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस बाहेरगावी जाण्यात यश प्राप्ती होऊ शकते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. स्पर्धेत घवघवीत यश प्राप्तीची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना थोडे सावध होऊन व्यापार करावा लागेल. खर्चात वाढ होऊ शकते.
10 / 12
मकर हा आठवडा आपणास ज्ञानी बनवेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. आपसातील कलह दूर होऊन एकमेकांप्रती समर्पण भावना वृद्धिंगत होईल. असे झाल्यामुळे घरात आनंद पसरेल. आर्थिक स्तरावर हा आठवडा चांगला आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन असो किंवा प्रणयी जीवन असो, दोन्हीकडे आपणास चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपली बुद्धी विकसित होईल. आपले मन सुद्धा तीव्र गती घेईल, ज्यामुळे कामे यशस्वी होतील. नोकरीत स्थिती अनुकूल होईल. आपणास आपल्या कष्टाच्या प्रमाणात पदोन्नती सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे फळ मिळेल. त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. अभ्यासाच्या बाबतीत आपले प्रयत्न काही वेगळेच असतील, परंतु त्यामुळेच आपणास खूप चांगले परिणाम मिळतील.
11 / 12
कुंभ हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मात्र, एकटेपणाच्या भावनेतून आपणास बाहेर पडावे लागेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी तासनतास गप्पा मारत बसाल. तिच्यासह फिरावयास सुद्धा जाऊ शकता, तसेच खरेदीस सुद्धा जाऊ शकता. आठवड्याच्या मध्यास आपण आपल्या मित्रांना भेटाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व प्रकारचा आनंद आपण घेऊ शकाल. आपणास जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल, परंतु काळजी करू नका. आपली प्राप्ती सुद्धा त्याच प्रमाणात वाढणार आहे. आपण खर्चाचा सुद्धा आनंद घेऊ शकाल, कारण हे खर्च आपल्या सुखासाठीच होणारे आहेत. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. आपली मेहनत फलद्रुप होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या कामगिरीने आपले वरिष्ठ प्रभावित होतील. ते आपल्या पाठीशी राहतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे.
12 / 12
मीन - हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या समोर कौटुंबिक समस्या आल्याने त्याचा गुंता सोडविण्यासाठी आपणास चार हात करावे लागतील. कुटुंबियांशी संवाद साधताना आपली वाणी उग्र होईल. त्यामुळे कुटुंबीय एकमेकांपासून दुरावतील. हि परिस्थिती टाळण्यासाठी आपणास परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे लागेल. असे केल्याने परिस्थिती निवळू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल असल्याने त्यांनी ह्या अनुकूलतेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. हा आठवडा आपलाच आहे. ह्या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी घालू शकता. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचा लाभ होईल. व्यापाऱ्यांना अनुकूलतेचा फायदा घेण्यासाठी काही नवीन पद्धतीचा स्वीकार करावा लागेल. असे केल्यानेच त्यांना संपत्ती लाभ होऊ शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य