शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२३ ते १८ फेब्रुवारी २०२३: ‘या’ ४ राशींना आठवडा चांगला, धनलाभाची उत्तम संधी; व्हेलेंटाइन डे कसा असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 1:43 PM

1 / 15
फेब्रुवारी महिन्याचा आगामी आठवडा अनेकार्थाने विशेष ठरू शकणारा आहे. या आठवड्यात प्रेमीजनांसाठीचा व्हेलेंटाइन डे साजरा होत आहे. तसेच ज्योतिषीय दृष्टीने दोन महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करत आहेत. या दोन ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्व बारा राशींवर परिणाम होऊ शकेल.
2 / 15
या आठवड्याच्या सुरुवातीला १३ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. आगामी महिनाभर सूर्य कुंभ राशीत विराजमान असेल. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल.
3 / 15
या आठवड्यातील ग्रह गोचराचा सर्व राशींवर प्रभाव दिसू शकेल. आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या राशींना हा आठवडा, उत्तम, मिश्र फलदायी किंवा मध्यम फलदायी ठरू शकेल, ते जाणून घ्या...
4 / 15
मेष: आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक तणाव राहील. वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागेल. किरकोळ खर्च होत राहतील. प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करत असलेल्या ठिकाणी रुबाब वाढेल. आपल्या मान-सन्मानात वाढ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
5 / 15
वृषभ: मोठे बदल होत असल्याचे दिसून येईल. प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकता. विरोधकांपासून खूप सतर्क राहावे लागेल. खर्चात वाढ होण्याची संभावना आहे. प्राप्ती कमी होईल. कामामुळे ते चांगले नांव व प्रतिष्ठा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करतील. कामाचा भार वाढू शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. दिनचर्येत नियमितपणा ठेवावा.
6 / 15
मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस ऊर्जेतील कमतरता जाणवेल. कोणत्याही कामात आपले लक्ष लागणार नाही. खर्चात वाढ होईल. प्राप्तीत वाढ करण्याचे प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी आपण इमानदारीत कामे कराल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. विद्यार्थी आपल्या मेहनतीने स्वतःची प्रगती करू शकतील.
7 / 15
कर्क: आठवड्याची सुरवात आपल्यासाठी काहीशी नाजूकच असेल. मानसिक तणावाखाली वावरत असाल. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाच्या बाबतीत वेळेचे बंधन पाळावे लागेल. व्यापारासाठी हा आठवडा चांगला आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या व्यवसायाची वृद्धी करु शकाल. त्याचा फायदा होईल. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपणास आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे.
8 / 15
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांनी भरलेला आहे. घरातील वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्न कराल. प्रणयी जीवन सुखावह होईल. काही चांगले अनुभव येतील. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मित्रांच्या बाबतीत काही समस्या वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांशी चांगला समन्वय साधावा लागेल. अन्यथा ते त्रास देऊ शकतील. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. स्पर्धेत यशस्वी होण्याची संधी मिळेल.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांना या आठवड्यात यश मिळेल. आपल्या प्रेमिकेची बुद्धिमत्ता व बौद्धयांक समजून घेण्याची संधी मिळेल. ती आपणास एखादा उपयुक्त असा सल्ला देऊ शकते. व्यापार करत असाल तर थोडे सावध राहावे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असली तरी आपल्या मनात नोकरी बदलण्याचे विचार येण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ज्ञानवृद्धी होईल.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक परिस्थितीवर आपले लक्ष राहील. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत चढ-उतार येतील. गुप्तपणे धन मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना आपल्या कामात मजबुती जाणवेल. व्यापाराची वृद्धी होईल. आपणास चांगल्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. खर्चात वाढ व प्राप्ती सामान्यच होईल. संतती सौख्य मिळेल. दांपत्य जीवन आनंदित राहील. मनातील भावना प्रेमिकेसमोर व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. सहकारी सहकार्य करतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. एखादे नवीन काम मिळण्याची संभावना आहे, जे आव्हानात्मक असू शकते. प्रतिभा व कार्यकुशलता दिसून येईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.
12 / 15
धनु: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असल्याने आपण खुश व्हाल. जोडीदाराशी सलोखा राहील. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काही खास करण्याचा प्रयत्न कराल. परंतु, घाईघाईत असे कोणतेही कृत्य करू नका की ज्यामुळे आपल्या हातून एखादी चूक होऊन संबंध दृढ होण्याऐवजी कटू होतील. येणारा पैसा काही कारणाने अडकू शकतो. प्राप्तीच्या बाबतीत थोडा त्रास संभवतो. परंतु धीर धरा. काही वेळ लागला तरी पैसा परत मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मजबूत होतील. व्यापाऱ्यांना काही चढ - उतारांचा सामना करावा लागेल.
13 / 15
मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. काही कारणाने जोडीदाराशी वाद संभवतो. आपण जर आपल्या प्रेमिकेवर मनापासून प्रेम करत असाल तर तिचे लाड पुरविण्यासाठी तयार राहा. आपली बुद्धिमत्ता चोहोबाजूने आपणास यशस्वी करेल. मग आपण नोकरी करत असा किंवा व्यापार. दोन्हीकडे आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा फायदा आपणास मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. नोकरीशी संबंधित सर्व कामे तीव्र गतीने प्रगती करतील. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता आल्याने व प्राप्तीत वाढ झाल्याने खुश व्हाल. विद्यार्थ्यांना आपल्या तीव्र बुद्धिमत्तेचा लाभ होईल. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
14 / 15
कुंभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. प्रेमिकेस मनातील भावना मोकळेपणाने सांगू शकतील. आठवड्याच्या सुरुवातीस आपण काही मानसिक तणावाखाली वावरत असाल, परंतु कालांतराने हाच तणाव आपणास यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल. अचानकपणे एखादी चांगली बातमी येऊ शकेल. आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण जितके कष्ट करू शकाल तितके करा, त्याचा लाभ होईल. व्यापारी आपल्या व्यवसायात यशस्वी होतील.
15 / 15
मीन: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. एखाद्या गोष्टीमुळे प्रेमिकेशी भांडण होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. कोणत्याही प्रकारे मानसिक ताण घेऊ नये. व्यापाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळून ते आपल्या कामात प्रगती करतील. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. विद्यार्थी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ घेतील. आरोग्याची काळजी घेणे हितावह होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य