साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना अत्यंत शुभ काळ, सूर्यकृपेचा लाभ; मकरसंक्राती भरभरून देईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 09:06 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात १४ रोजी मकर संक्रांतीला रवी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत आहे. रवी आणि बुध धनु राशीत आहेत. १४ रोजी रवी मकर राशीत जाईल. तेथे त्याची युती प्लूटोशी होईल. शुक्र आणि शनी कुंभ राशीत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. या सप्ताहात १३ जानेवारीपासून प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे कुंभमेळा सुरू होत आहे. शाकंभरी पौर्णिमा, भोगी, माघ स्नान प्रारंभ होईल. धनुर्मास समाप्ती होईल. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. १५ रोजी कर आहे. १७ रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 3 / 15जानेवारी महिन्याचा हा आठवडा सांस्कृतिक, धार्मिक आणि ग्रह गोचराच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि विशेष मानला जात आहे. पौर्णिमा, मकरसंक्रांती आणि २०२५ मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीचा योग जुळून येत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाकुंभमेळा सुरू होत आहे. सूर्याचे मकर राशीतील गोचर महत्त्वाचे मानले जात असून, मेष ते मीन या सर्व राशींवर एकूणच ग्रहस्थितीचा कसा प्रभाव असू शकतो, ते जाणून घेऊया...4 / 15मेष: हा आठवडा उत्तम आहे. मात्र, जे नोकरीतील कार्यक्षेत्रात बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी आठवडा अजिबात अनुकूल नसल्याचे दिसत आहे. अशा वेळी जेथे आहात तेथेच राहणे आपल्या हिताचे होऊ शकेल. व्यापारी अतिआत्मविश्वासात येऊन कामे करण्याची संभावना आहे. मात्र, अशा वेळी त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. ह्या आठवड्यात एखाद्या मानसिक तणावाचा त्रास होऊ शकतो. एकट्याने वेळ न घालवता कुटुंबियांशी गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवावा. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लाग शकतो. प्रेमीजनांच्या नात्यात काही तणाव असू शकतो. अशा वेळी धीर धरण्याचा शहाणपणा दाखवावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करूनच यशस्वी होता येईल. हा आठवडा अत्यंत खर्चिक असल्याचे दिसून येईल. त्यामुळे पैश्यांची बचत करणे अवघड होईल.5 / 15वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारे प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास ओटीपोटात काही त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात कामानिमित्त प्रवास करू शकतात. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतार पाहावयास लागू शकते. हा आठवडा प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळवून देणारा आहे. प्रेमिकेच्या सहवासात काही रोमँटिक क्षण घालवू शकतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. जमिनीशी संबंधित एखादी गुंतवणूक करावयाची असेल तर ती करून त्यात लाभ मिळवू शकता. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात.6 / 15मिथुन: हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ज्यांना नोकरीत बदल करावयाचा आहे त्यांच्यासाठी आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांनी ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. ह्या आठवड्यात आर्थिक आघाडीवर सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात एखाद्या बाहेरील वस्तूकडे आकर्षित होण्याची संभावना असून त्यात पैसा खर्च होऊन आपणास आर्थिक नुकसान होऊ शकते.7 / 15कर्क: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. प्रकृती जरी चांगली राहिली तरी ऋतू बदलामुळे आपण सर्दी, खोकला इत्यादीने त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात प्राप्तीत मोठी वाढ होण्याची संभावना असल्याने पैशांची कमतरता जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात कार्यालयीन राजकारणापासून थोडे सावध राहावे लागेल. व्यापाऱ्यांनी कोणताही निर्णय एखाद्या सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार घ्यावा. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकून राहील. ह्या आठवड्यात भेट एखाद्या अशा व्यक्तीशी होईल की, ज्यामुळे अत्यंत प्रभावित होऊन तिच्या प्रेमात पडाल. ज्या व्यक्ती काही काळापासून एखाद्या गोष्टीमुळे तणावात आहेत त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशक मदत करू शकेल.8 / 15सिंह: नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिक व्यक्ती अशा एखाद्या भव्य मेळाव्यात जाऊ शकतात, कि जो त्यांच्या व्यापारास प्रभावित करू शकेल. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर लाभ प्राप्ती होऊ शकते. परंतु आपण जर शेअर बाजार किंवा सट्टा बाजारात आर्थिक गुंतवणूक केलीत तर आर्थिक नुकसान होऊ शकते. दांपत्य जीवनात समस्या व तणाव असू शकतो. तेव्हा सावध राहावे. ह्या आठवड्यात एखाद्या मानसिक तणावाने त्रस्त होऊ शकता. 9 / 15कन्या: हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांची अशा एका व्यक्तीशी ओळख होईल की ज्याला बाजाराशी संबंधित भरपूर ज्ञान असेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ग्रहांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मन लावून व पूर्ण मेहनतीने कामे कराल. ह्या आठवड्यात प्राप्ती चांगली होईल. परंतु, त्याच्या जोडीला खर्च सुद्धा तितकेच जास्त होण्याची शक्यता आहे. प्रेमिकेवर कोणत्याही प्रकारे शंका न घेणे आपल्या हिताचे राहील. विवाहित व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील कोणतीही जुनी गोष्ट जो पर्यंत उगाळणार नाही तो पर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. ही गोष्ट कुटुंब कलहास कारणीभूत ठरू शकते. ह्या आठवड्याच्या सुरुवातीस प्रकृती काहीशी नरम असण्याची शक्यता आहे. अशा वेळी तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळचे फिरणे व योगासन ह्यांना जीवनातील एक भाग बनवावे.10 / 15तूळ: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थी मन लावून अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करतील. जर ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. व्यवहारातील आपला अहं नकारात्मक प्रभाव पाडू शकतो. व्यवहारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात विवाहित दांपत्य कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहिले तर बरे होईल. कोणतीही गोष्ट अति न ताणता आपसात प्रेमाने संवाद साधावा. कारकिर्दीत सावध राहून आपणास मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात डोळे व कान उघडे ठेवावे लागतील. जेणेकरून कोणी आपल्या योजनेत हस्तक्षेप करू शकणार नाही. आहारावर नियंत्रण ठेवावे.11 / 15वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. व्यापाराच्या प्रगतीस मदतरूप होऊ शकेल अशा काही नवीन लोकांशी ह्या आठवड्यात ओळख होईल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात मान-सन्मान व प्रतिष्ठा मिळू शकते. एखाद्या व्यक्तीने अनेक दिवसांपासून पैसे आपणास परत केले नसतील तर ती व्यक्ती ह्या आठवड्यात पैसे परत करू शकेल. प्रेमिकेस योग्य तितका वेळ व महत्व दिले तर गोडवा टिकून राहील. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असू शकतो, तेव्हा बोलताना थोडे सावध राहावे. ऋतू बदलामुळे ह्या आठवड्यात सर्दी, खोकला इत्यादींचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी अति थंड व उष्ण पदार्थ खाणे टाळावे.12 / 15धनु: हा आठवडा चांगला आहे. व्यावसायिकांचा संबंध एखाद्या परदेशी संस्थेशी होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम झाल्याने कार्यालयात त्यांची प्रशंसा होऊ शकते. विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यात ते यशस्वी होऊ शकतात. ह्या आठवड्यात प्रेमिकेशी असलेल्या नात्यात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील माधुर्य ह्या आठवड्यात टिकून राहील. ह्या आठवड्यात वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. ह्या आठवड्यात अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.13 / 15मकर: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी प्रशंसित होऊ शकतात. हा आठवडा व्यापारी वर्गासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात खूपच अशक्तपणा जाणवू शकतो. तेव्हा काम करताना अधून-मधून थोडी विश्रांती घेण्यासाठी वेळ काढावा. आर्थिक आघाडीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. उत्तम दैनिक प्राप्ती होईल. आपले मित्र आर्थिक मदत करू शकतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात. तसेच त्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात काही रोमँटिक क्षण घालवू शकतील.14 / 15कुंभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यालयात कार्यक्षमता प्राप्त होऊ शकते. त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची जास्त प्रशंसा होऊ शकते. ह्या आठवड्यात प्रकृती काहीशी नाजूक होण्याची शक्यता असल्याने संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा एखादे आजारपण येऊ शकते. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. पदोन्नती संभवते. ह्या आठवड्यात खर्चात वाढ होऊ शकते. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. अशा वेळी शक्य तितके शांत राहावे व जोडीदाराशी असलेले नात्यातील सामंजस्य टिकवून ठेवावे.15 / 15मीन: हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना यश प्राप्ती होऊ शकते. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांची कामगिरी उत्तम होईल. ते वरिष्ठ व सहकारी ह्यांच्याकडून प्रशंसित होऊ शकतात. काही कारणाने मानसिक तणावाचा त्रास आपणास होऊन आजारी पडू शकता. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेशी काही रोमँटिक क्षण घालवू शकतील. दांपत्य जीवनात जर काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल तर तो ह्या आठवड्यात कमी होऊ शकेल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या खूपच चांगला आहे. ह्या अगोदर कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात परत मिळू शकतील. त्यामुळे अत्यंत आनंदित व्हाल.