शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा उंचावेल; दीपोत्सव शुभच ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 7:50 AM

1 / 15
दीपावली साजरी करणाच्या या सप्ताहात गुरुवारी मंगळ आणि रवी यांचे राशीपालट आहेत. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू, आणि हर्षल मेषेत शुक्र कन्येत, रवी, मंगळ आणि केतू तूळ राशीत आहे. बुध वृश्चिकेत असून, दि. १६ नोव्हेंबर रोजी रवी आणि मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करतील. प्लूटो मकरेते, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण तूळ, वृश्चिक, धन आणि मकर राशीतून राहील. या सप्ताहात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. दर्श सोमवती अमावास्या आहे. बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज आहे. विनायकी चतुर्थी पांडव पंचमी, कड पंचमी आहे.
3 / 15
दीपोत्सवाचा हा आठवडा काही राशींसाठी सर्वोत्तम ठरू शकतो. लक्ष्मी देवीसह कुबेर, गणपती यांचे शुभाशिर्वाद लाभू शकतात, असे सांगितले जात आहे. त्याचसह काही राशींना हा सप्ताह सामान्य किंवा संमिश्र ठरू शकतो. तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. समस्या कमी होतील. कार्यकौशल्य वृद्धिंगत होईल. काम अधिक चांगले करण्यास प्राधान्य द्याल. सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील. पुढे लाभ होईल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. मात्र त्यांनी एकदम कोणतीही गुंतवणूक करू नये. खूप मोठी गुंतवणूक करणे नुकसानदायी होऊ शकते. विरोधकांपासून थोडे सावध राहावे. एखादे नवीन कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करू शकता. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. त्यांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही व त्यामुळे अडचणी येतील.
5 / 15
वृषभ: हा आठवडा आनंददायी बातमी घेऊन येणारा आहे. एखाद्या दीर्घ पल्ल्याचा प्रवास करू शकाल. खुश व्हाल व नवी ऊर्जा निर्माण झाल्याची जाणीव होईल. जोडीदारास वेळ द्या व नाते सुधारण्याचा प्रयत्न करा. आठवडा व्यापारास अनुकूल आहे. योजना योग्य वेळेस योग्य कामे करतील व त्यामुळे फायदा होईल. शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमकुवत होण्याची संभावना आहे. काही मित्र व सवंगडी आपणास अभ्यासापासून दूर नेण्याची शक्यता आहे. तेव्हा काळजी घ्या.
6 / 15
मिथुन: आठवड्याची सुरुवात काहीशी चिंताजनक व आव्हानात्मक असेल. असे असले तरी परिस्थितीत सुधारणा होईल. नशिबाची साथ मिळेल. दीर्घ पल्ल्याचा प्रवास करू शकता. व्यापार अधिक सुस्थितीत येईल. काही संपर्कांचा लाभ होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. असे असले तरी खर्चात वाढ होईल. विरोधकांपासून थोडे सावध राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात जास्त लक्ष द्यावे लागेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खाण्या - पिण्यावर लक्ष द्यावे.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. विवाहितांनी वैवाहिक जीवन अधिक सुखद होण्यासाठी सोमवारी शेंडी असलेला नारळ शंकरास अर्पण करावा. आठवड्याच्या सुरुवातीस व्यापारासाठी खूप धडपड कराल. एखादी परदेशवारी होऊ शकते, जी आपल्या व्यापारात सुधारणा करण्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारकीर्द उंचावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल. चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
8 / 15
सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहित व्यक्ती जोडीदारासह फिरावयास जाऊ शकतात. कौटुंबिक वातावरण काहीसे तणावग्रस्त असू शकते. तेव्हा सतर्क राहावे. खूप मोठी समस्या होणार नाही इतकेच. आठवड्याची सुरुवात चांगली होईल व कामगिरीने खूपच खुश असल्याचे दिसून येईल. व्यापारात कष्टाचे फळ मिळेल. एकापेक्षा अधिक ठिकाणांहून चांगला लाभ होऊ शकतो. गुंतवणूक करण्यावर जोर लावाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामे मजबुतीने करतील. लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडी कमतरता जाणवेल व त्यावर मात करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
9 / 15
कन्या: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. जोडीदाराशी जवळीक वाढेल. जोडीदार आपणास प्रगतीसाठी एखादा महत्वाचा सल्ला देऊ शकेल, ज्याचे भरपूर कौतुक कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. आत्मविश्वास उंचावलेला असेल. व्यापारात अशा स्थितीमुळे मोठा फायदा होईल. विद्यार्थी खूप परिश्रम करतील, परंतु त्याचबरोबर त्यांना वेळेकडे लक्ष द्यावे लागेल. वेळेनुसार कार्य केल्यास चांगला लाभ होऊ शकेल. विनाकारण ताण घेऊ नका, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम आपल्या प्रकृतीवर होण्याची संभावना आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. सकाळच्या प्रहरी चालावयास जाण्याची संवय लावावी.
10 / 15
तूळ: कौटुंविक जीवनात ताण वाढत असल्याचे दिसून येईल. कुटुंबातील काही लोकांच्या वागणुकीचा त्रास होऊ शकतो. घरात भांडण होऊ शकते. तेव्हा सतर्क राहावे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील सर्व बारकावे समजून घेऊन जोडीदारास सुख देतील. खर्चात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न चांगले असतील. लाभ होईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. फायदा होईल. आरोग्यात चढ - उतार येण्याची संभावना आहे.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. मन आनंदित होईल. वागणुकीत बदल होईल. आपल्यात बराचसा अहंकार व क्रोध असू शकतो. जोडीदारास किंवा कुटुंबियांना काही उलट - सुलट बोलाल. त्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. हे टाळण्याचा प्रयत्न करा. वर्तनाचा विपरीत प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रावर होऊ शकतो. सावध राहिल्यास नोकरीच्या ठिकाणी स्थिती चांगली होईल. कामात प्रगती होईल. व्यापाऱ्यांना शासनाकडून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या सरकारी प्रकल्पाशी जोडले गेल्याने फायदा होऊ शकतो. प्रेमाने बोलून बरीचशी कामे होतील. विद्यार्थ्यांच्या स्थितीत सुधारणा होईल. ते तणावमुक्त होतील. फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. परंतु दोन गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल, त्यात एक आहे आपली प्रकृती व दुसरी आहे आपले खर्च. एकीकडे खर्चात वाढ होईल. लक्ष ठेवले नाहीत तर समस्या वाढू शकतात. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या मन विचलित होऊ शकते तेव्हा काळजी घ्यावी. व्यापारासाठी आठवडा चढ-उतारांचा आहे. काही विरोधक प्रबळ झाल्याने निष्कारण काही खर्च करावा लागेल. कुटुंबात सुख - शांती नांदेल. मित्रांचा पाठिंबा राहील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते खूप परिश्रम करतील. कामगिरी चांगली होईल.
13 / 15
मकर: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा खूपच फायदेशीर ठरणारा आहे. बदली संभवते. नोकरीत बदल होऊ शकतो. व्यापाऱ्यांना परिश्रमाच्या प्रमाणात परिणाम मिळतील. कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तरच ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चढ-उताराने भरलेला आहे. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांततेचे असू शकते. कार्यक्षेत्री उत्तम यश प्राप्त होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पद-प्रतिष्ठा उंचावेल. प्राप्तीत वाढ संभवते. व्यापारासाठी आठवडा उत्तम आहे. सरकारी क्षेत्राकडून लाभ घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव वाढू शकतो. पैसे कमविण्यासाठी आपण खूप प्रयत्न कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद पाठीशी असेल. विद्यार्थी खूप मेहनत करतील व परिणाम कामगिरीतून दिसून येतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणामुळे नुकसान संभवते.
15 / 15
मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे त्रासदायी होऊ शकते. काही नवीन गोष्टी समजून घेण्याची संधी मिळेल, जे कामासाठी समजून घेणे गरजेचे असेल. कामात अधिक चांगली सुधारणा करू शकाल. असे केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा लक्ष देण्याचा आहे. त्यांची आर्थिक गुंतवणूक चुकीच्या जागी झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात गुंतवणूक करणे धाडसीपणाचे ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमानुसार यथायोग्य फळ मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यDiwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी