शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:31 PM

1 / 15
या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी मंगळ मेषेत, गुरु आणि हर्षल वृषभेत, रवि, बुध आणि शुक्र मिथुनेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, शनी कुभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील.
2 / 15
रविवारी दशहरा समाप्ती, मंगळवारी निर्जला एकादशी, बुधवारी प्रदोष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. गुरुवारपासून शिवराज शक ३५१ चा प्रारंभ होत आहे. शुक्रवारी वटपौर्णिमा आहे.
3 / 15
आगामी आठवड्याचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींवर ग्रहस्थितीचा कसा प्रभाव पडू शकेल? मिथुन राशीत त्रिग्रही योग, बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग असे शुभ राजयोग जुळून येत असून, त्याचा कसा लाभ मिळू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आठवड्याची सुरुवात जीवनातील एखादी मोठी अडचण दूर होण्याने होईल. वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघांचेही सहकार्य मिळेल. हा आठवडा परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल व यशदायी असणार आहे. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीस अपेक्षित लाभ मिळेल. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादी चांगली बातमी मिळेल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात व्यतीत होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकिर्दीत व व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होईल. दांपत्य जीवनातील सौख्य टिकून राहील. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल.
5 / 15
वृषभ: आठवड्यात विनाकारण होणाऱ्या वादापासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस कार्यक्षेत्री विरोधक सक्रिय होऊन ध्येयापासून आपणास विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास घर दुरुस्तीत किंवा आवश्यक वस्तूंच्या खरेदीत जास्त पैसे खर्च होऊ शकतात. व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना खूप सावध राहावे लागेल. आठवड्यात आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात ऋतुजन्य विकार होण्याची संभावना आहे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा सुख-समृद्धी व यश देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. अनेक दिवसांपासून आवडत्या जागेवर बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना रोजगाराची उत्तम संधी मिळेल. कामाच्या व्यस्ततेबरोबरच आहारावर विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पैतृक संपत्तीशी संबंधित वादाचे निराकरण झाल्याने आनंदित व्हाल. सुखी वैवाहिक जीवनासाठी वैवाहिक जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्यासाठी थोडा वेळ अवश्य काढा.
7 / 15
कर्क: आठवड्याच्या सुरुवातीस कार्यक्षेत्री एखाद्या गोष्टीमुळे सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. आठवड्यात मन, वाणी व व्यवहार नियंत्रित ठेवावे लागतील. अन्यथा निष्कारण अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्ती नोकरीत बदल करण्याच्या विचारात आहेत त्यांना आठवड्यात चांगल्या संधी प्राप्त होण्याची संभावना आहे. सत्ता व शासनाशी संबंधित कोणत्याही बाबींचे निराकरण करताना आपली वाणी व व्यवहार नियंत्रित ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. त्यांचे लक्ष मौज-मजा करण्यावर असेल. प्रेमिकेचा दुरावा किंवा तिची भेट न झाल्याने मन व्यथित होईल.
8 / 15
सिंह: हा आठवडा यश व सौभाग्य देणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस कारकिर्दीसाठी व व्यवसायासाठी केलेले प्रवास अपेक्षित यश देणारे आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत उपब्ध होतील. समाजात मान-सन्मान उंचावेल. बाजारातील थकबाकी मिळेल. व्यापारवृद्धीची इच्छा पूर्ण होईल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात लाभास कारणीभूत होईल. युवकांचा बहुतांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. जमीन-घर इत्यादीच्या खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होईल. आठवड्यात मुलांशी संबंधित एखादे मोठे यश आनंद व सन्मान वाढवणारे होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. दांपत्य जीवन सुखद होईल. जोडीदाराकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळू शकते.
9 / 15
कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस कार्यक्षेत्राशी संबंधित काही समस्या काळजीस कारणीभूत होऊ शकतात. ध्येयपूर्तीसाठी अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना अजून प्रतीक्षा करावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास प्रकृतीवर व संबंधांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. आर्थिक नुकसान संभवते. जमीन-घर इत्यादीशी संबंधित बाबी काळजीस कारणीभूत होऊ शकतात. कठीण प्रसंगात आपला वैवाहिक जोडीदार पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील. आठवड्यात व्यक्तिगत जीवनात जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांना सामोरे जाणे किंवा त्यांचे निराकारण करणे हितावह होईल. प्रेमिकेचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधावा.
10 / 15
तूळ: आठवड्याच्या सुरुवातीस कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामाचा भार जास्तच असेल. कार्यक्षेत्राशी संबंधित समस्या असताना कुटुंबातील वातावरण एखाद्या गोष्टीने तणावाचे राहील. वैवाहिक जोडीदाराशी झालेल्या वादामुळे मन खिन्न होऊ शकते. पुन्हा एकदा नशीबची साथ मिळू लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक भागीदारीत असणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित लाभ मिळेल. ज्या व्यक्ती व्यवसाय वृद्धीचा विचार करत असतील त्यांची कामना पूर्ण होईल. एखादा मोठा निर्णय घेताना भावंडांसह कुटुंबियांचे समर्थन मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी धार्मिक यात्रा संभवते. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. उत्तम समन्वय साधला जाईल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. समस्यांना घाबरून पळून न जाता त्यांना सामोरे जाणे हितावह होईल. विशेष म्हणजे आव्हाने कार्यक्षेत्राशी संबंधित असोत किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असोत, बुद्धीचा व विवेकाचा वापर करून ती परतवून लावण्यात यशस्वी व्हाल. ज्या व्यक्ती परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करण्यात गुंतले असतील त्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास गुप्त शत्रू सक्रिय होण्याची शक्यता असल्याने खूप सावध राहावे लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. वैवाहिक जीवन सुखद होईल.
12 / 15
धनु: आठवड्याची सुरुवात दूरवरच्या किंवा जवळच्या प्रवासाने होईल. हा प्रवास सुखद व मनोरंजनात्मक होईल. आठवड्याच्या सुरुवातीस अपेक्षित पद प्राप्ती होऊ शकते. अनेक दिवसांपासून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा किंवा असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा विचार करत असाल तर आठवड्यात कामना पूर्ण होऊ शकते. मान-सन्मान उंचावेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात स्वजनांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीय प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
13 / 15
मकर: आठवड्यात इकडच्या-तिकडच्या गोष्टींवर लक्ष न देता ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जीवनाशी संबंधित समस्यांचे मन शांत ठेवून निराकरण करण्याचा प्रयत्न केलात तर त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा शुभचिंतकाचा सल्ला घेण्यास विसरू नका. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो. अंदाजपत्र कोलमडू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना समतोल साधण्यात काही समस्या येऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांनी समाज माध्यम इत्यादींवर प्रेमाचे प्रदर्शन करणे टाळावे.
14 / 15
कुंभ: हा आठवडा कारकिर्दीच्या व व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. अनेक दिवसांपासून व्यवसायवृद्धीचा विचार करत असाल तर मित्रांच्या मदतीने कामना पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत प्राप्त होतील. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आठवड्याच्या मध्यास जमीन किंवा घर खरेदी-विक्रीसाठी माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. एखाद्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली दिलीत तर त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जे पूर्वीपासून प्रेमात आहेत त्यांच्या प्रेम विवाहास कुटुंबिय मान्यता देऊ शकतात.
15 / 15
मीन: हा आठवडा शुभ फलदायी व यशदायी आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी मिळेल. सत्ता व शासनाशी संबंधित योजनांचा लाभ मिळेल. जर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर कदाचित आठवड्यात मनोकामना पूर्ण होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-जुमला किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित वाद किंवा अडथळे दूर होतील. आठवड्यात प्रकृतीची काळजी मात्र घ्यावीच लागेल. व्यवसायात अपेक्षित लाभ व प्रगती होत असल्याचे दिसून येईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य