शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७ राशींना उत्तम काळ, शासकीय निविदेतून लाभ शक्य; व्यापारात फायदा, कामात उत्तम यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 2:31 PM

1 / 15
या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कुन्येत, शुक्र तुळेत, मंगळ वृश्चिकेत, रवी आणि बुध धनूत, प्लूटो मकरेत, शनी कुंभँत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंदाचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील.
2 / 15
या सप्ताहात रविवारपासून पंचक सुरू झाले आहे. गुरुवारी रात्री १० वाजून ०९ मिनिटांपर्यंत पंचक राहील. चंपाषष्ठी, मोक्षदा स्मार्त एकादशी, गीता जयंती आहे. भागवत एकादशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आगामी काळ शुभ योगांचा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
नवग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत आहे. याच राशीत बुध वक्री आहे. काही दिवसांनी मंगळ धनु राशीत विराजमान होत आहे. तर शुक्र वृश्चिक राशीत येईल. एकूणच ग्रहस्थिती पाहता काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
4 / 15
मेष: काम लक्षपूर्वक कराल. कामात अत्यंत व्यस्त राहाल. नवनवीन विचार अवगत करावे असे आपणास वाटेल. आपल्या मनास ज्ञानी असल्याची जाणीव होईल. इतरांना सहकार्य कराल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतील. प्रेमीजनांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना खूपच अनुकूल काळ आहे. जे काही शिकण्याचा व शिकलेले लक्षात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल त्यात यशस्वी व्हाल. यशामुळे खुश झाल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना कामात उत्तम यश प्राप्त होईल.
5 / 15
वृषभ: नोकरीत विशेष लक्ष द्यावे लागेल. एकाचवेळी मनात अनेक विचार आल्याने कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. कामात चुका होण्याची संभावना आहे. प्राप्तीत खूप मोठी वाढ होईल. खर्च पूर्ण करण्यास मदतच होईल. असे असले तरी आपण कोणाकडून उसने पैसे घेऊ नये, तसेच कोणाला उधारीवर पैसे देऊ नये. व्यापारात यशस्वी व्हाल.एखादी शासकीय निविदा भरावयाची असेल तर ती वेळेवर भरावी. कोणतेही बेकायदेशीर काम केल्यास समस्या वाढतील. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत काहीसे बेफिकीर होण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाले तरी स्थिती जैसे थे अशीच राहील.
6 / 15
मिथुन: वडिलांशी मतभेद संभवतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा खूप मोठा फायदा देणारा असेल. कामाच्या जोरावर स्थान किती मजबूत केले हे समजू शकेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावामुळे काही महत्वाची कामे पूर्ण करू शकणार नाहीत. व्यापारात यश प्राप्त होईल. शासनाकडून मोठा फायदा होऊ शकतो. आपल्या व्यापाराची प्रगती होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल असला तरी त्यात दिखाऊपणाचा अतिरेक करणे टाळा. आपल्या प्रेमिकेस आपण जसे आहात तसेच आवडता. आणखी काही करण्याचा प्रयत्न करू नका. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 15
कर्क: कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. मानसिक तणाव घेऊ नका. घरात सुख - शांती व कौटुंबिक जीवनात समाधानाचा अभाव राहील. प्रकृतीत चढ - उतार येतील. व्यापारात काही सौदे हाती लागल्याने व्यापाराची गती जलद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात मजबूत होतील. शासनाकडून काही लाभ होऊ शकतो. विरोधकांवर मात करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर काही नवीन काम हाती घेण्याचा दबाव येऊ शकतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली वेळ शोधून आपल्या माणसाच्या हृदयात जागा मिळविण्याची कोणतीही संधी सोडणार नाही. त्या व्यक्तीस प्रेमाची कबुली देऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त असू शकते, ज्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.
8 / 15
सिंह: आगामी काळ चढ-उतारांचा आहे. वैवाहिक जीवनात किरकोळ तणाव असल्याचे दिसू शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम होऊन त्यांना चांगले गुण प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या बाबतीत खूपच हळवे होतील. व्यापाऱ्यांना नवीन योजनांवर विचार करण्याची आवश्यकता भासेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
9 / 15
कन्या: प्रेमिके समक्ष व्यक्त कराल. गैरसमज दूर होऊन एकमेकांशी जवळीक साधू शकाल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. जोडीदाराच्या काही मागण्या असू शकतात, ज्या पूर्ण कराव्या लागतील. कुटुंबासाठी एखादे वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकाल. एखादे कर्ज घेऊ शकता. प्रयत्न वाढवावेत, परंतु कोणतेही अवैध कृत्य करू नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी फायदे देणारा आहे. बुद्धिमत्तेच्या व परिश्रमाच्या जोरावर कामात आगळे - वेगळे स्थान निर्माण कराल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेत खुप परिश्रम करू शकतील.
10 / 15
तूळ: कौटुंबिक गरजांवर लक्ष द्याल. घरगुती खर्च कराल. कुटुंबियांसह बसून त्यांच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी कराल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांसाठी काळ खूपच उपयुक्त आहे. काही फायदे होण्याची संभावना आहे. सामंजस्य व व्यक्तींचे सहकार्य तसेच मित्रांमुळे व्यापारात कामगिरी उत्तम होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. योजना यशस्वी होतील. प्रतिमा उजळेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी अभ्यासात यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम करतील. स्पर्धेत यश संभवते.
11 / 15
वृश्चिक: आत्मबळ वाढल्याने कामात यश प्राप्त होईल. व्यापारात थोडी जोखीम पत्करून नवीन काही कामे करू शकता. खूपच आशावादी राहाल. किरकोळ खर्च होतील. परंतु ते चांगल्या कामासाठी झाल्याने आनंदित व्हाल. कौटुंबिक जीवन शांततामय व सौख्यदायी असेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराशी दुरावा कमी होईल. नाते दृढ होईल. विद्यार्थी नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतील. स्वअध्ययन करावे असे त्यांना वाटत राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. बँकेतील गंगाजळी वाढविण्यात यशस्वी होऊ शकता. एखाद्या योजनेत पैसे गुंतविले असल्यास चांगला परतावा मिळू शकेल.
12 / 15
धनु: वाणीतील माधुर्य लोकप्रिय करेल. मित्रांचा पाठिंबा व नातेवाईकांच्या मदतीने कामात प्रगती करू शकाल. व्यापारात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांनी थोडे लक्षपूर्वक काम करावे. कामात लक्ष न लागल्याने काही चुका होऊ शकतात. काळजी घ्यावी. एखादी इच्छा पूर्ण होईल. चांगला लाभ होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने खुश झाल्याचे दिसून येईल. असे असले तरी खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. आत्मविश्वासाचा अतिरेक व अहंकार टाळा. व्यक्तिगत जीवासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल.
13 / 15
मकर: खर्चात जलद गतीने वाढ होईल. चिंतीत होऊ शकता. खर्चाच्या जोडीने प्राप्तीत वाढ होईल. वाढीव खर्च सहजपणे करू शकाल. कामानिमित्त खूप धावपळ होईल. व्यापाऱ्यांना कामे होण्यासाठी काही नवीन लोकांची भेट घ्यावी लागेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मदतीसाठी एखाद्या मित्राची गरज भासेल.
14 / 15
कुंभ: सरकारी क्षेत्रातून एखादा मोठा फायदा होण्याची संभावना आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबी लक्ष वेधून घेतील. एखादी संपत्ती घेऊ शकाल. खर्च किरकोळच होतील. नोकरीत स्थिती चांगली राहील. अति आत्मविश्वास बाळगू नका. काम लक्षपूर्वक करा. व्यापारासाठी काळ खूप अनुकूल आहे. जितका जास्त फायदा घेता येईल तितका घ्यावा. आगामी काळात आपणास त्याचा उपयोग होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. सासुरवाडीस एखादा सोहळा असल्याने तिकडच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उच्च बुद्धिमत्तेचा लाभ होऊन विषयांवर पकड मजबूत करता येईल.
15 / 15
मीन: कामे लक्षपूर्वक कराल. कामगिरी उत्कृष्टच होईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उन्नतीदायक आहे. सामाजिक माध्यमातून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. प्राप्ती सामान्यच होईल. खर्च सामान्यच होतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक समाधान लाभेल. कुटुंबीय कामात सहकार्य करतील. सहकाऱ्यांकडून काही नवीन गोष्टी कळतील, ज्या आपल्यासाठी उन्नतीदायी असतील. प्रेमीजनांसाठी नात्यात प्रेम व रोमांस वाढेल. विवाहित व्यक्ती जोडीदारास खुश करतील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य