शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणेशोत्सवारंभ: १० राशींना सर्वोत्तम, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ; गणपती प्रसन्न होईल, शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 8:38 AM

1 / 15
या सप्ताहात रविवारी रवी कन्येत जाईल. अन्य राशीपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कर्केत, बुध सिंहेत, मंगळ आणि रवी कन्येत, केतू तुळेत, प्लुटो मकरेत, शन कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहे, चंद्राचे भ्रमण कन्या, तुळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील.
2 / 15
१८ सप्टेंबर रोजी हरितालिका, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी (अंगारकी योग), २० सप्टेंबर रोजी ऋषि पंचमी, जैन संवत्सरी, २१ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन (महालक्ष्मी), २२ सप्टेंबर रोजी गौरी पूजन, २३ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे.
3 / 15
गणोशोत्सवाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? गणपती बाप्पाची कृपादृष्टी कोणत्या राशींवर असेल? आर्थिक आघाडी, करिअर, कुटुंब, व्यवसाय, बिझनेस, शिक्षण यांसाठी आगामी काळ कसा असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: आठवड्याच्या सुरुवातीस थोडे सावध राहावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील प्रेम वृद्धिंगत झाल्याने ते खुश होतील. नोकरीत स्थिती अनुकूल असेल. विरोधकांवर मात करू शकाल. खूप कष्ट कराल व त्यामुळे पदोन्नतीचा मार्ग सोपा होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. एकीकडे लाभ मिळू लागतील तर दुसरीकडे कामात काही अडथळे निर्माण होतील. खर्चात वाढ होणार असल्याने आर्थिक नियोजन करण्यावर भर द्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्तम अध्ययन करू शकतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चांगला असला तरी, संततीच्या प्रकृतीमुळे काळजी वाटू शकते. विवाहित व्यक्ती जोडीदाराच्या प्रगतीने खुश असल्याचे दिसून येईल. मन हर्षित होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापारात फायदा झाल्याने खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते कामाच्या ताणातून मुक्त होतील. असे असले तरी वरिष्ठांशी जुळवून घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. खर्च वाढतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकाग्रचित्त होण्यात अडथळे येऊ शकतात.
6 / 15
मिथुन: हा आठवडा चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यास थोडा जास्तच वेळ लागू शकतो. कुटुंबीय एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलणी करू शकतात. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत लाभ होऊ शकतो. एखादी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीत लाभ होऊ शकतो. व्यापारात स्थिती मजबूत होईल. सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना मित्रांची व सहकाऱ्यांची पुष्कळ मदत होईल. ते सहकार्य करतील व त्यामुळे नोकरीतील स्थिती अनुकूल होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनातील तणाव निवळतील. सासुरवाडीकडील लोक पाठीशी राहून आपणास समजून घेतील. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आशीर्वादाने एखादे खोळंबलेले काम होण्याची संभावना असल्याने घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नोकरीच्या ठिकाणी कष्ट व निष्ठा बघून प्रशंसा होईल व लोक आदर करतील. पगारवाढ संभवते. व्यापारासाठी आठवडा चढ - उतारांचा असला तरी हळूहळू स्थितीत सुधारणा होऊ लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीस अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळाल्याने ते खुश होतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात प्रयत्नांना अंकुर फुटतील.त्यामुळे काहीतरी नवीन करत असल्याचे दिसून येईल. एखादे साहस करण्याचा विचार कराल. काही मित्रांसह फिरावयास जाऊ शकता. खर्च जरी झाले तरी प्राप्ती सुद्धा चांगली झाल्याने काळजीस जागा उरणार नाही. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना काही त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.
9 / 15
कन्या: हा आठवडा फायदेशीर असल्याचे दिसत आहे. विवाहित व्यक्तींनी जर वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही चांगले होईल. प्रॉपर्टीत केलेल्या गुंतवणुकीतून लाभ झाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. किरकोळ खर्च झाले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. वरिष्ठ पाठीशी असल्याचे दिसून येईल व त्यामुळे चांगली कामगिरी करण्यास मदत होईल. व्यापाऱ्यांच्या हाती एखादी मोठी ऑर्डर लागू शकते व त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. भावाच्या मदतीने एखादे मोठे काम मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करताना दिसतील.
10 / 15
तूळ: या आठवड्यात विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद लुटतील. हा आठवडा खर्च करण्याचा आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींवर खर्च होऊ शकतो. परंतु त्याने खुश व्हाल. एखादे नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकता. त्यात यशस्वी व्हाल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात आनंद पसरेल. आई - वडिलांचे आशीर्वाद मिळतील. प्राप्तीत वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल व त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊन कामे होऊ लागतील. सरकारी क्षेत्राकडून लाभ होईल. नोकरी व व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कागिरी करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे. सध्या त्यांना एकाग्रता वाढवून लक्षपूर्वक अभ्यास करावा लागेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन ते आपल्या दांपत्य जीवनाचा आनंद लुटतील. अचानक धनलाभ संभवतो. हे धन खूप आनंद घेऊन येईल. कामे झाल्याने यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. पदोन्नती संभवते. नांव सार्थक कराल व खूप परिश्रम करून उत्तम परिणाम मिळवाल. व्यापारात यशस्वी होण्याची प्रबळ संधी मिळून प्रगती साधू शकाल. एखाद्या महिलेसह किंवा व्यापारी भागीदारासह काम केल्यास अधिक लाभ होण्याची संभावना आहे. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. त्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची संभावना आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी वाढलेला दुरावा कमी होईल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. एखादे मोठे पद मिळण्याची संभावना आहे. त्यामुळे पद-प्रतिष्ठेत वृद्धी होईल. प्राप्ती वाढेल. खुश व्हाल आनंदात कुटुंबियांना सहभागी करून त्यांना एखादी मोठी पार्टी सुद्धा देऊ शकाल. कामानिमित्त परदेशाशी चांगला संपर्क साधू शकाल किंवा मोठ्या पदाची नोकरी सुद्धा मिळू शकेल, जिचा स्वीकार करण्यात मागेपुढे काही पाहणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. वेळेचा फायदा उचलून व्यापार वृद्धी करावी. गुंतवणुक करून सुद्धा लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. उच्च शिक्षणात ते चांगले परिणाम प्राप्त करतील.
13 / 15
मकर: या आठवड्यात प्रगतीची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य व प्रेम ह्यामुळे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. प्राप्ती वाढेल व त्यामुळे आर्थिक आव्हानातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव कमी होतील. घरातील वातावरण सौख्यदायी असेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी लक्ष वेधून घेतील. धर्म कर्मात विश्वास वाढेल. नोकरीतील स्थितीत चढ - उतार येतील. नोकरीत बदली होण्याची संभावना आहे. व्यापारात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल. शिष्यवृत्ती मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तणावामुळे त्रास होऊ शकतो.
14 / 15
कुंभ: या आठवड्यात काही त्रास होऊ शकतो. पूर्णत्वास आलेल्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. परंतु धीर सोडू नका. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागेल विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. सासुरवाडीशी काही वाद होण्याची संभावना आहे. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. खूप मोठी गुंतवणूक कराल. व्यापार वृद्धीसाठी भांडवली गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. प्रतिष्ठा खंडित होईल असे कोणतेही कृत्य करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
15 / 15
मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या अखेरपर्यंत खर्च वाढत राहतील, त्यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. त्यासाठी आर्थिक नियोजन कौशल्यपूर्वक करावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. काही अडथळे येतील, परंतु भविष्यात हे अडथळेच लाभदायी ठरतील. नोकरी करणाऱ्यांनी अनुकूल वातावरणाचा फायदा उचलावयास हवा. वरिष्ठांच्या नजरेत उंचीवर जाण्याची संधी मिळेल. त्यासाठी खूप परिश्रम कराल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. अभ्यासात त्यांचे मन रमेल. एखाद्या स्पर्धेची तयारी करत असल्यास त्यांना यश प्राप्त होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य