शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना नोकरीत अपार यश, व्यापारात फायदा; अत्यंत चांगला आठवडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 7:57 AM

1 / 15
या सप्ताहात शनिवारी बुध वृषभेतून मिथुनेत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषे, बुध वृषर्भत, व मिथुन राशीत असून, शनिवारी त्याची बुधाशी युती होईल.
2 / 15
मंगळ आणि शुक्र कर्क राशीत, केतू तूळ राशीत, प्लूटो मकरेत, शेनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील. सोमवारपासून आषाढ सुरु होत आहे. बुधवारपासून दक्षिणायन सुरु होत आहे.
3 / 15
गुरुवारी विनायक चतुर्थी आहे. सप्ताहातील एकंदरीत ग्रहमान आणि अन्य घडामोडी पाहता आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना शुभ-लाभ, करिअर, नोकरी, व्यापार-व्यवसायात यश प्रगती साध्य करता येऊ शकेल? कोणत्या राशींना आगामी आठवडा काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीस स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती उत्तम प्रकारे करून यश प्राप्त करतील. कामगिरीत सुधारणा होऊन त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतील. व्यापाऱ्यांना या आठवड्यात चांगला लाभ होऊ शकतो. सरकारी क्षेत्राद्वारा एखादा मोठा लाभ संभवतो. आर्थिक स्थिती प्रबळ असेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला. अखेरचे दोन दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीपासूनच एखादा मोठा लाभ होऊ शकतो. जीवनात आनंद पसरेल. व्यवसाय वृद्धीची मोठी संधी मिळेल. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याची गरज असल्याने ते प्रगती करण्याचा भरपूर प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा व्यस्त राहण्याचा आहे. खूप धावपळ करावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. असे असले तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक वातावरण संतुलित राहील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात तरबेज होतील. व्यापाऱ्यांना अपेक्षेहून जास्त फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 15
कर्क: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस काही खर्च होईल. एखादा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. काहीजणांना परदेशात जाण्याची सुवर्ण संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या अनुभवचा फायदा घेऊन आपली कामगिरी उंचावतील. वरिष्ठांशी सलोखा असल्याने फायदा होऊन प्राप्तीत वाढ होईल. परदेशातून आपणास धनप्राप्ती होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना चांगला लाभ संभवतो. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमेल. प्रकृती चांगली राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
8 / 15
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही नवीन कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आपण कराल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. सध्या प्राप्तीत वाढ होईल, ज्याचा आपणास फायदा होईल. कार्यक्षेत्री स्थिती मजबूत असेल. सन्मान मिळू शकतो. व्यापारी क्षेत्रात केलेले प्रयत्न सार्थक होतील. विद्यार्थ्यांना मेहनत करण्यावर जोर द्यावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यायामाच्या निमित्ताने जास्त वजन उचलू नका. ताप किंवा अंगदुखी किंवा डोकेदुखीचा त्रास संभवतो.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. नात्यातील प्रेम टिकून राहील. एकमेकांच्या सहवासात वेळ चांगला घालवू शकाल. नशिबाची साथ मिळेल. सर्व कामे वेळेवर व उत्तमरित्या पार पडतील. आपली प्रतिमा उजळेल. कार्यक्षेत्री प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीकारक आहे. नवीन ओळखी होतील, ज्या भविष्यात मोठा लाभ मिळवून देण्याची दालने उघडतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी ठरणारा आहे. वडिलांशी सलोखा ठेवा. आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या दूरवरच्या प्रवासाची योजना ठरू शकते. मित्रांसह फिरावयास जाण्याची व मौजमजा करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्याशी भांडण टाळणे हितावह होईल. व्यापारासाठी आठवडा फायदेशीर आहे. आपल्या योजना आपणास प्रगतीपथावर नेऊ शकतील. व्यापारवृद्धीसाठी काही नवीन लोकांची भेट सुद्धा घेऊ शकता. निष्काळजीपणा केल्यास समस्या निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे.
11 / 15
वृश्चिक: आठवड्याच्या सुरुवातीस काही त्रास होऊ शकतो. परंतु त्या नंतरचे दिवस चांगले आहेत. विवाहितांना वैवाहिक जीवनात काही चांगले अनुभव येतील. चांगला लाभ होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने कामात यशस्वी व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. सर्व योजना यशस्वी होऊन चांगला लाभ होईल. या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नका. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. मान टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तसेच काम चोख करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
12 / 15
धनु: हा आठवडा चढ-उतारांचा आहे. सासुरवाडीकडील संबंधात चढ - उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत असेल. कामगिरी उत्तम करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने सावध राहून वाटचाल करावी. गुंतवणूक करावयाची असेल तर विचारपूर्वक करावी. संततीस आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकतात. या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.
13 / 15
मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. एखाद्या विरोधकामुळे त्रास होईल, परंतु आपण त्यावर मात करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या स्थितीत सुधारणा होऊन ती हळूहळू मजबूत होऊ लागेल. विरोधक चकित झाल्याचे जाणवेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली मेहनत व कामाची पद्धत आपणास इतरांहून वेगळे करून व्यापारात यश प्रदान करेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. स्पर्धेत यशप्राप्ती होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चांगला आहे. संततीची प्रगती बघून आपण खुश व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. कार्यालयात कोणाशीही गैर वर्तणूक करणे नुकसानदायी ठरू शकते, तेव्हा काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. योजना फलद्रुप होऊन व्यापारात चांगला लाभ होईल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या मिश्र फलदायी आहे. खर्च होतील, त्याच बरोबर प्राप्ती सुद्धा चांगली होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष जास्त केंद्रित करावे लागेल. प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
15 / 15
मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष देऊ शकाल, व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. निव्वळ कामासाठीच नाही तर कुटुंबासाठी वेळ देणे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला व शांतीचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. परंतु एखाद्याचे बोलणे मनास लागून त्याची तक्रार करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य