शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 6:38 AM

1 / 15
Weekly Horoscope: सप्ताहाच्या सुरुवातीला २० रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेतून कर्केत, केतु कन्येत, रवी आणि बुध तुळेत, शुक्र वृश्चिकेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून होईल.
2 / 15
रविवारी चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. गुरुवारी पूर्ण दिवसभर गुरुपुष्यामृत आहे. काही मान्यतांनुसार, अश्विन दाशरथी करक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ५ राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
3 / 15
संकष्ट चतुर्थीला शश राजयोग, गजकेसरी योग, महालक्ष्मी राजयोग, बुधादित्य राजयोग आणि गुरु-शुक्र ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहेत. उत्तम योगातील संकष्ट चतुर्थीसह पुढील आठवडाभराचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव दिसू शकेल? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ मिळू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: विवाहेच्छुकांना विवाह प्रस्ताव येण्याची संभावना असल्याने, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या त्रयस्थाच्या हस्तक्षेपामुळे विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावपूर्ण स्थितीत राहू शकतात. आर्थिक स्थिती ठीक राहिली तरी खर्चांवर लक्ष ठेवावे लागेल. पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा आपणास फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांद्वारा चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील. हा आठवडा उच्च शिक्षणास अनुकूल असल्याने अशा विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता वाढवावी लागेल. सर्व कामात कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. मित्रांसह बाहेर फिरावयास जाल. नवीन कामासाठी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न कराल. बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन कर्ज घेऊ नये.
5 / 15
वृषभ: हा आठवडा अत्यंत चांगला असू शकतो. प्रेमिकेच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात आर्थिक विषयांवर चर्चा केल्याने आर्थिक बचतीबाबत महत्त्वाचे शिकावयास मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात नवीन ओळखी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. काही मित्रांमुळे त्याचे लक्ष विचलित होऊ शकते. भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. घर दुरुस्ती व सजावट करण्यावर पैसा खर्च कराल.
6 / 15
मिथुन: विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक नियोजन करावे लागेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सशक्त होऊन प्रगती करण्याचे संकेत देत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असू शकतो. ते मन लावून अध्ययन करतील. जीवनात बरेचसे प्राप्त होत असल्याचा अनुभव होऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आवडत्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळू शकते. विश्रांतीची गरज भासेल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. भविष्याची तरतूद म्हणून आर्थिक गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
7 / 15
कर्क: कुटुंबासाठी एकांतात व सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळवून देऊ शकतो. कुटुंबियांसह तीर्थाटन करण्याची योजना आखू शकता. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल व कौटुंबिक संबंध दृढ होतील. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या अनुकूल आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोंदणीकृत कामांना पूर्ण करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक होण्याची संभावना असल्याने कामात त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांना हा आठवडा वृद्धी करण्यात यश देऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. त्यांना एखादे मोठे यश मिळू शकते. त्यांना आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासात नवीन मित्रांची मदत होऊ शकते.
8 / 15
सिंह: हा आठवडा विवाहितांसाठी सुखद व आनंदमय असेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. त्यामुळे नाते दृढ होईल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा व्यापारावर प्रतिकूल प्रभाव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांची विभिन्न ठिकाणी बदली होऊ शकते. जवळचे व दूरवरचे प्रवास संभवतात. व्यावसायिक भागीदाराशी संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासात न राहता अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे. थोड्या प्रमाणात आरोग्य विषयक त्रास होण्याची संभावना असल्याने नियमित तपासणीची व स्वस्थ जीवनशैलीची अंमलबजावणी करावी लागेल.
9 / 15
कन्या: हा आठवडा सुखद आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. त्याचा आनंद उपभोगू शकाल. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळेल. व्यापारवृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत बदल होण्याची संभावना आहे. स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात यश प्राप्त होऊ शकते. मन विचलित होऊ देऊ नये. भावंडात असलेले गैरसमज दूर होतील. मुलांना वाईट संगतीत पाहून त्रास होऊ शकतो, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण कराल. मुलांसह बागेत किंवा सहलीस जाण्याचा आनंद घ्याल.
10 / 15
तूळ: काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या वागणुकीत थोडा बदल दिसू शकतो. संयमात राहावे लागू शकते. आर्थिक स्थिती मिश्र फलदायी राहील. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात खूप वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरीत बदल संभवतो. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सजग व सक्रिय असल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. कुटुंबाच्या कल्याणासाठी वैवाहिक जोडीदाराबरोबर काम करत असल्याचे दिसू शकते. लहान व्यापाऱ्यांना व्यापारात अपेक्षित लाभ होऊ शकतो. घरात पूजा-पाठ इत्यादींचे आयोजन होऊ शकते. घरी लोकांची ये - जा होईल. कितीही समस्या आल्या तरी सकारात्मक व स्थिर राहून ध्येयाकडे प्रगती करावी लागेल. धैर्य व मेहनत करून अशा परिस्थितीस तोंड देऊन लक्ष्य प्राप्ती करू शकता.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. सरकारी क्षेत्राकडून आपणास मोठ्या लाभाची अपेक्षा असू शकते. व्यापाऱ्यांना योजनेत यश प्राप्ती होईल. नवीन ओळख होण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचे अध्ययन जोरात होऊ शकेल. दिनचर्येत सकाळचे फिरणे, योगासन, ध्यान-धारणा इत्यादी प्रवृत्तींना समाविष्ट करावे लागेल. विचार मोकळेपणाने वडिलांसमोर व्यक्त करून सल्ला घ्यावा.
12 / 15
धनु: एखाद्या विषयामुळे गैरसमज होऊन वाद निर्माण होऊ शकतो. विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात समस्या असल्याची जाणीव होऊ शकते. जोडीदार एखाद्या नवीन कार्याची सुरवात करेल, ज्यास पूर्ण समर्थन असेल. आर्थिकदृष्ट्या उत्तमच काळ आहे. प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना विशेष अनुकूल नाही. अभ्यासात लक्ष लागणार नाही. उच्च शिक्षणासाठी मात्र आठवडा अनुकूल आहे. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात कुटुंबीय सहभागी होतील. सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने मानसिक शांतता मिळेल. भावाचे सहकार्य मिळेल.
13 / 15
मकर: विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तणाव जाणवेल. सौख्य मिळेल. वडिलांजवळ मन मोकळे कराल. ज्या व्यक्ती वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत त्या व्यक्ती व्यवसायात काही बदल करून प्राप्तीत वाढ करू शकतील. असे एखादे स्रोत असेल कि ज्यामुळे आपल्या प्राप्तीत दररोज वाढ होत जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते स्पर्धेत यशस्वी होतील. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होऊ शकतील. घरात एखाद्या मंगल कार्यक्रमाचे आयोजन होईल, ज्यात कुटुंबीयांची भेट होईल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा अत्यंत उत्साहवर्धक आहे. ऊर्जावान असल्याचे जाणवेल. सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सक्रिय व्हाल. प्रेमिकेसह फिरावयास जाऊन प्रेमळ संवाद साधू शकाल. कुटुंबात सलोखा राहील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. दोघे मिळून कुटुंबाच्या सुखासाठी काम कराल. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल, ज्या आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. घरातून बाहेर पडताना कुटुंबातील वयस्कर लोकांचे आशीर्वाद घेतल्याने सर्व कामे यशस्वी होतील. आथिर्क स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक भागीदारामुळे लाभ होईल. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्या लोकांना प्रवासातून लाभ होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.
15 / 15
मीन: हा आठवडा चांगले परिणाम देण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचे समर्थन मिळेल. भावंडांशी असलेले मतभेद संपुष्टात येण्याची संभावना आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकीत पैसा प्राप्त होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. मुलांचे सहकार्य मिळेल. हा आठवडा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे. प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागतील. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ आवडत्या कार्यासाठी काढावा लागेल.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक