शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : 6 ते 12 नोव्हेंबर 2022; 'या' राशीच्या मंडळींना भाग्योदयाचा योग, नात्यातही प्रेम वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 11:41 AM

1 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. कदाचित आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात वाढ होईल, परंतु हा आठवडा आपण अगदी आरामात घालवाल. काहीतरी नवीन प्रयत्न करण्याची इच्छा जरी झाली नाही तरी, जे काही चालले आहे त्यात आपण खुश राहाल. आपणास कुटुंबियांच्या व मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्यास आवडेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आशादायी असेल. आपण आपल्या प्रेमिकेशी मोकळेपणाने बोलाल ज्याचा ती स्वीकार करेल, व त्यामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे यथोचित फळ मिळेल. त्यांची बढती संभवते. बढती मिळाल्याने त्यांची कार्यक्षमता वाढेल. व्यापाऱ्यांना शासना कडून लाभ मिळण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
2 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या आशा पल्लवित होतील. आपण नवीन प्रयोग करण्याचा विचार कराल. व्यवसायात नवीन प्रयोग करणे आपल्याला आवडेल. त्याचे आपणास चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास कार्यालया कडून काही नवीन सुविधा मिळण्याची संभावना आहे. आपली कामगिरी लोकांच्या नजरेस येईल. ते आपल्या कामाची प्रशंसा सुद्धा करतील. आपणास चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. आपण जर बँके कडून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल तर त्यात आपण यशस्वी होऊ शकाल. खर्चात वाढ होणार असल्याने आपणास त्यावर लक्ष ठेवावे लागेल. प्रणयी जीवन सामान्य राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपली प्रकृती नरम - गरम राहील. आपल्या आहारावर लक्ष ठेवावे, तसेच थोडा व्यायाम सुद्धा करावा. प्राणायाम करून आपण यशस्वी सुद्धा व्हाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना सुखद परिणाम मिळतील.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण जे काम कराल त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायास तेजी येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात सुख - शांती नांदेल. आपण प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी सौदा करू शकाल. प्राप्तीत शीघ्र गतीने वाढ होईल. खर्च कमी होतील. त्यामुळे आपण खुश व्हाल. प्रकृती चांगली राहीली तरी पोटदुखीचा त्रास संभवतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजन एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्यास प्राधान्य देतील. ते फिरावयास किंवा एखाद्या पार्टीस दूरवरच्या ठिकाणी जाऊ शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपणास आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याची किंवा नवीन लोकांशी करारबद्ध होण्याची संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
4 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अद्भुत असेल. लांब पल्ल्याचे प्रवास होण्याची संभावना आहे. हा प्रवास आपणास मानसिक तजेला व जीवनात नावीन्य देणारा असेल. कामात आपल्याला खूप चांगले परिणाम मिळतील. आपण आपली नोकरी प्रामाणिक राहून कराल. व्यावसायिक हेतूने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपणास कामा निमित्त प्रवास सुद्धा करावा लागेल. त्यामुळे काही नवीन लोकांशी संपर्क स्थापित होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच असेल. ह्या आठवड्यात आपली आई आजारी पडण्याची शक्यता असल्याने तिची काळजी घ्यावी. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपले संबंध पुढे नेण्यासाठी प्रयत्न कराल. आपल्या प्रेमिके समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकाल. आपल्यात खूप बोलणे होईल. एकमेकांना अधिक चांगले समजू शकाल. त्यामुळे संबंधातील प्रेम वाढेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. प्रकृती चांगली राहिल्याने अनेक कामे पूर्ण करू शकाल. आपला उत्साह वृद्धिंगत होईल. आपणास मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. सासुरवाडी कडील लोकांशी सलोखा राहील. काही तणाव असले तरी सुद्धा विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना तणावास सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची त्यांच्या कामात प्रगती होईल. त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. ते आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. काही नवीन लोकांच्या मदतीने ते आपल्या कामास पुढे नेऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांनी सावध राहून आधी पासूनच तयारी करून ठेवावी. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण व्यवसाया निमित्त लांब पल्ल्याचा प्रवास करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या हाती काही सौदे लागतील, जे आपल्यासाठी फायदेशीर असतील. भागीदारी संबंधात सुधारणा होईल. प्रकृती चांगली राहिली तरी छातीत दुखणे, सर्दी, खोकला इत्यादींचा त्रास संभवतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असाल. आपल्या वैवाहिक जोडीदारासाठी बरेच काही करण्यास प्राधान्य द्याल. आपण नवीन पोलिसी सुद्धा खरेदी करू शकाल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात संबंधातील नावीन्य जाणवेल. ते आपल्या प्रेमिके समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकतील. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करून चांगले परिणाम मिळवतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात तटस्थ राहिल्याने तक्रारीस वाव राहणार नाही. आपली प्रकृती सुद्धा चांगली राहील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या आर्थिक स्थितीत चढ - उतार आल्याने आपणास भविष्यातील योजनांचा पुनर्विचार करावा लागेल. काही किरकोळ खर्चात सुद्धा वाढ होईल. आपण धार्मिक कार्यात सहभागी व्हाल ज्यामुळे आपणास मानसिक समाधान व शांतता लाभेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामात मेहनत व प्रगती कराल, व त्यामुळे आपणास सुखद परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांच्या कार्यास गती येईल. त्यांना ह्या आठवड्यात दूरवरच्या ठिकाणी व्यवसाय करण्याची नवीन संधी मिळेल. त्यांना परदेशातून सुद्धा थोडा लाभ होऊ शकतो. नफा वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपण आपले वैवाहिक संबंध दृढ करण्यासाठी व आपल्या वैवाहिक जोडीदारास खुश करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या संबंधात प्रगती होऊ शकेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रणयी जीवनात खूपच उत्साहित होऊन प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल किंवा एखाद्या रमणीय ठिकाणी खाण्याचा आनंद घेऊ शकाल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. त्यांच्या जीवनातील तणाव निवळू लागले तरी संबंध पूर्ववत होण्यास थोडा अवधी लागेल. आपल्या विरोधकांपासून सावध राहावे. ते आपले नुकसान करण्यासाठी प्रयत्न करतील. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. त्यामुळे आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपली कामगिरी उत्तम झाल्याने चोहोबाजूने आपली प्रशंसा होत राहील. व्यापाऱ्यांना गुंतवणुक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल असला तरी त्यांनी थोडे सावध राहावे. प्रकृतीत चढ - उतार येतील. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे. इतर दिवसात प्रवास केल्यास त्रास होऊ शकतो.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या कुटुंबियांवर आपला जीव ओवाळून टाकाल. त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या आईशी आपले संबंध दृढ होतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रोत्साहक आहे. आपली प्रेमिका आपल्यासाठी जीव देण्यास सुद्धा तयार होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यास मदत कराल. आपल्या दोघात समन्वय चांगला असल्यामुळे परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात ठाम राहिल्याने त्यांना चांगले परिणाम मिळतील. आपली कामगिरी वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. विद्यार्थ्यांना चढ - उतारांना सामोरे जावे लागेल. आपणास चांगले परिणाम मिळावेत म्हणून आपण अभ्यास करतच राहावे. असे केल्यानेच आपणास अभ्यासात चांगले गुण मिळू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. नोकरी मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. आपण आपल्या कार्यात प्रगती करू शकाल. शासना कडून आपणास एखादा मोठा लाभ मिळण्याची संभावना सुद्धा आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळण्याची शक्यता आहे. आपण आपले वैवाहिक जीवन मुक्तपणे जगाल. आपणास संबंधात तटस्थता व सत्य असल्याचे दिसून येईल. ह्या आठवड्यात कोणालाही उधारीवर पैसे देऊ नयेत, तसेच बँकेकडून कर्ज घेऊ नये. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात काहीसे निराश होण्याची शक्यता आहे. ह्याला कारणीभूत आपल्या प्रेमिकेची वागणूक असेल, ज्याची आपण कधीही अपेक्षा केली नसेल. परंतु, धीर धरावा. येणाऱ्या दिवसात सर्व काही सुरळीत होईल. प्रवासातून आपणास लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. पैश्यांची आवक वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च सुद्धा कमी होतील. आपली स्थिती खूप चांगली असल्याचे आपणास जाणवेल. नशिबाची साथ मिळाल्याने आपले शत्रू सुद्धा मित्र होतील. प्रत्येक कामात कमी प्रयत्नात यश प्राप्त होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूपच सक्रिय होतील. व्यापारी आपले काम पुढे रेटण्यात यशस्वी होतील. दूरवरच्या ठिकाणी व राज्यात काम केल्याचा खूप मोठा फायदा होईल. ह्या आठवड्यात विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखद परिणाम मिळतील. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण असेल. प्रेमीजन त्यांच्या प्रणयी जीवनातील तणाव वाढल्याने त्रासून जातील. त्यामुळे त्यांच्यात व प्रेमिकेत मध्यस्थी करू शकेल अशा एखाद्या व्यक्तीचा शोध ते घेतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडे गंभीर व्हावे लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना खूप चांगले परिणाम मिळतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
12 / 12
ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगली असेल. आपल्या मनात चांगले विचार येतील. आपण आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रात चांगल्या यश प्राप्तीसाठी स्वतःच्या अनुभवाचा लाभ घेऊ शकाल. परस्पर प्रेमामुळे विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण दोघेही वैवाहिक जोडीदाराचे कर्तव्य पार पाडून आपले वैवाहिक जीवन यशस्वी करू शकाल. प्रेमीजनांना थोडा दिलासा मिळेल. आपली प्रेमिका असे काही करेल, कि ज्यामुळे आपण खुश व्हाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही चढ - उतार येण्याची संभावना आहे. व्यावसायिकांना ह्या आठवड्यात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याच्या शक्यतेमुळे आपल्या कामासाठी तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासेल. कायदेशीर कारवाई पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंधित गोंधळ दूर होऊन ते सतत अभ्यास करू लागतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहेत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य