शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंचक योग: ४ राशींना शुभ-सौभाग्य काळ, अनपेक्षित धनलाभ; आत्मनिर्भर व्हा, अतिउत्साह टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 7:07 AM

1 / 15
Weekly Horoscope: चातुर्मास काळ सुरू झाला आहे. आषाढ महिना सुरू असून, जुलै महिन्याची काही दिवसांत सांगता होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवडाभराच्या कालावधीत कोणताही ग्रहपालट नाही. विद्यमान ग्रहस्थिती अशी की, मंगळ, गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, रवी आणि शुक्र कर्क राशीत, बुध सिंह राशीत, केतू कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. गुरुपौर्णिमेनंतर बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे. मंगळवारी सकाळी ९.२१ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवारी पूर्ण काळ पंचक आहे. शनिवारी दुपारी १ पर्यंत पंचक राहील.
3 / 15
आताच्या घडीला अनेकविध शुभ योग जुळून आले आहेत. या योगांचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. आगामी काळात कोणत्या राशींवर ग्रहांचा आणि ग्रहमानाचा कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी काळ लाभदायी आहे. अनेक अडथळे व समस्या असल्या तरी कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम संबंध दृढ होतील. मधुर वाणी स्थगित कामे पूर्ण करण्यास मदतरूप ठरेल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या परिस्थितीचा विचार अवश्य करावा. कार्यक्षेत्री संघर्षानंतरच कार्य सिद्धी होण्याची संभावना आहे. कुटुंबियांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. ईश्वर साधना-आराधना व त्यांच्या प्रति विश्वास व आस्था वाढेल. भावनेच्या भरात किंवा संकोचामुळे किंवा कोणाच्या दबावास बळी पडून एखादा निर्णय घेणे टाळावे.
5 / 15
वृषभ: घरात किंवा बाहेर लहान-सहान गोष्टींची तुलना करणे टाळावे. क्रोध व आवेशात येऊन कोणास अपशब्द बोलणे टाळावे. संपत्तीची खरेदी-विक्रीची कामना पूर्ण होऊ शकते. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे मिळू लागेल. प्रेमिकेशी कोणत्याही प्रकारे कटुता निर्माण झाली असेल तर प्रयत्न केल्यास सर्व गैरसमज दूर होऊ शकतील. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या प्रतिष्ठित किंवा वयस्कर व्यक्तीच्या मदतीने जमीन-जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होऊ शकेल.
6 / 15
मिथुन: जीवनाची गाडी संथ गतीने पुढे जात असल्याचे जाणवेल. अपेक्षित कामे वेळेवर न झाल्याने मन बेचैन होईल. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील. इतरांवर बिलकुल अवलंबून राहू नका, अन्यथा वेळेवर मदत न मिळाल्याने आपली निराशा होईल. अशा वेळी आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या खुशीसाठी थोडा जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो. आहारावर विशेष लक्ष द्यावे. एखादी आर्थिक समस्या असली तर ती दूर करण्याचा प्रयत्न करा. घर, वाहन यांच्या खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर तो तूर्तास स्थगित ठेवू शकता.
7 / 15
कर्क: आपल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून योग्य तितके अंतर ठेवणे हितावह होईल. प्रेम संबंधात सावध राहून पाऊल उचलणे हितावह होईल. कोणत्याही प्रकारे अतिउत्साहित होऊ नका. कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. परिस्थिती बघूनच एखादी मोठी जवाबदारी घेण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. वरिष्ठांच्या मदतीने कार्यक्षेत्री येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याची संभावना आहे.
8 / 15
सिंह: आगामी काळ शुभत्व व सौभाग्य घेऊन येणारा आहे. कारकीर्दीस व व्यवसायास प्रगती पथावर घेऊन जाण्याचे अपेक्षित स्वप्न पूर्ण होईल. दाम्पत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीत रुची वाढेल. जमीन, घर, वाहन इत्यादींच्या खरेदी-विक्रीची मनोकामना पूर्ण होऊ शकते. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काळ भाग्याचा असल्याचे जाणवेल. एखादी चांगली बातमी ऐकावयास मिळू शकते. मुलांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या सहवासात मौज-मजा करण्यात वेळ जाईल.
9 / 15
कन्या: हे दिवस काहीसे धावपळीचे ठरू शकतात. कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. दोन ठिकाणी पाय ठेवल्यास मोठ्या त्रासास सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्री कामाचा भार राहील. आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची व कनिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत योजनाबद्ध काम करणे लाभदायी होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. व्यापारात अपेक्षित लाभ न मिळाल्याने निराशेची भावना उत्पन्न होईल. परंतु सकारात्मक चिंतन करूनच उन्नती व प्रगती होते हे लक्षात ठेवावे. आहारावर विशेष लक्ष द्यावे.
10 / 15
तूळ: अनेक दिवसांपासून एखादे पद किंवा सन्मान प्राप्तीची प्रतीक्षा करत असाल तर कदाचित मनोकामना पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपादृष्टी असेल. प्राप्तीत वाढ होईल. प्रेमिकेच्या व्यक्तिगत आयुष्यात जरुरीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणे टाळावे. वैवाहिक जीवनातील सुख-सहकार्य टिकून राहील. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. अध्ययना प्रति त्यांची गोडी वाढेल. खरेदी-विक्रीशी संबंधित बाबीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. एखाद्या दूरवरच्या ठिकाणी संपत्तीची खरेदी होऊ शकते. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात व्यस्त राहावे लागेल. कुटुंबातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळू शकते.
11 / 15
वृश्चिक: आगामी कालावधी शुभ फलदायी व लाभदायी आहे. आर्थिक बाबतीत मोठे यश प्राप्त होईल. अनपेक्षितपणे व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे आशीर्वाद पाठीशी राहतील. मित्रांच्या माध्यमातून सामान्य लाभ होण्याची संभावना आहे. सुख-सुविधेशी संबंधित वस्तूंसाठी सढळहस्ते पैसा खर्च कराल. काळ लाभदायी व उन्नतिकारक आहे. आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी योजनाबद्ध काम करावे लागेल. धनलाभासह खर्च वाढण्याची संभावना आहे.
12 / 15
धनु: कोणत्याही क्षेत्रात विचारपूर्वक पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान बाबी दुर्लक्षित करा. अन्यथा पश्चातापास सामोरे जावे लागू शकते. आर्थिक क्षेत्रात विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करा. कोणाच्या प्रलोभनास बळी पडण्या ऐवजी विवेक बुद्धीने योग्य चिंतन करून मगच एखादा मोठा निर्णय घ्यावा. कुटुंबासंबंधी एखादा मोठा निर्णय घेणार असाल तर सर्व लहान-थोरांचा सल्ला घेणे हितावह होईल. विशेषतः संपत्तीशी संबंधित वादाचे निराकरण करताना ही बाब लक्षात ठेवावी. आपल्या सख्या भावंडांशी चांगले संबंध ठेवा. दाम्पत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. अडचणीच्या काळात जोडीदार पाठीशी सावली प्रमाणे राहील.
13 / 15
मकर: आपल्यामुळेच कामे होतील किंवा बिघडतील हे लक्षात ठेवावे लागेल. कार्य पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. वेळेवर मित्र व सहकाऱ्यांची मदत न मिळाल्याने मन काहीसे उदास व त्रस्त होईल. परिस्थितीनुसार महत्वाच्या कार्यात निर्णय घ्यावे लागतील. प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. कौटुंबिक जवाबदाऱ्यांकडे पाठ फिरविल्यास दांपत्य जीवनात कलह निर्माण होऊ शकतो. अति भावनाशील होऊ नका. व्यापारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची चूक करू नका.
14 / 15
कुंभ: कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणतीही जोखीम घेऊ नये. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी खूप विचार करावा. गरजा वाढू देऊ नका, अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांशी थट्टा-मस्करी करताना मान-प्रतिष्ठेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. हास्य उपहासात रूपांतरित होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा अनेक वर्षांपासुन असलेले संबंध एका झटक्यात तुटू शकतात. जमीन-घर खरेदी-विक्री करताना अधिक सावध राहावे. कागदपत्र नीट वाचून व समजून घेऊन मगच त्यावर हस्ताक्षर करावे. आयुष्यातील चढ-उतारांदरम्यान माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळत राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. प्रेम प्रसंगात खूपच सावध राहून वाटचाल करावी लागेल. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी वैवाहिक जोडीदारास वेळ देऊन त्यांच्या भावनांचा आदर करावा.
15 / 15
मीन: अत्यंत शुभ फलदायी व यशदायी काळ आहे. केलेल्या बहुतांशी प्रयत्नात यश व लाभ प्राप्त होईल. कारकिर्दीत व व्यवसायात उन्नती संभवते. मित्रांबरोबर योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षित लाभ होईल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. दाम्पत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा प्रवास करू शकता. नवीन जमीन किंवा घर घेण्याची संधी मिळेल. घरात एखादे धार्मिक किंवा मांगलिक कार्याचे आयोजन संभवते. भावंडांसह वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात हसत-खेळत वेळ जाईल. कुटुंबात सुख व सौहार्द वाढेल. माता-पित्यांशी सुख सामंजस्य टिकून राहील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य