शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना शानदार काळ, बँकेतील बचत वाढेल; गुप्तधन मिळेल, शुभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 8:59 AM

1 / 15
या सप्ताहात शुक्र आणि मंगळ यांचे राशीपालट आहे, तर बुध वक्री होत आहे. २४ डिसेंबर रोजी शुक वृश्चिक राशीत जाईल. २७ डिसेंबर रोजी मंगळ धनू राशीत जाईल. २८ डिसेंबर रोजी बुध वक्री होईल.
2 / 15
ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, शुक्र वृश्चिकेत, मंगळ २७ पर्यंत वृश्चिकेत नव त्यानंतर धनूत, बुध, रवि आणि मंगळ धनूत, प्लुटो मकरेत, शनी कुंभेत तर राहू आणि नेपच्युन मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशींतून राहील.
3 / 15
रविवारी प्रदोष आहे. मंगळवारी दत्त जयंती, गुरुवारी गुरुपुष्यामृत तर शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. सन २०२३ या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. एकूण ग्रहस्थिती पाहता वर्षाचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ मिळतील? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: कुटुंबाकडे विशेष लक्ष द्याल. आर्थिक प्राप्तीत खूप मोठे यश मिळवू शकाल. बँकेतील शिल्लक वाढेल. किरकोळ खर्च कमी होतील. प्रयत्नाने पैश्यांची वाढ अनेक पटीत करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊन खुश होतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा निराशाजनक होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. व्यापाऱ्यांना उत्तम प्राप्ती होईल. परिश्रम यशस्वी होतील. एखादे शुभ कार्य करावयाचे असल्यास कुटुंबियांची मदत जरूर घ्यावी. कार्यास शोभा येईल.
5 / 15
वृषभ: आठवड्याची सुरुवात खूपच शानदार होईल. जे काही कार्य कराल त्यात यशस्वी व्हाल. आत्मविश्वास उंचावेल. विरोधकांवर मात करून चार पाऊले पुढेच जाल. प्राप्तीत वाढ करण्यासाठी एखादी संधी मिळेल, जी आपण सोडू नये. विद्यार्थ्यांना परिश्रम वाढवावे लागतील. असे केल्यासच त्यांचा अभ्यास योग्य पद्धतीने होऊ शकेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. सासुरवाडीशी असलेल्या संबंधात चढ-उतार येतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. परिश्रमाचे चीज होईल. व्यापारासाठी हा आठवडा यशदायी आहे.
6 / 15
मिथुन: आठवडा चढ-उताराने भरलेला आहे. किरकोळ खर्च होतील. प्राप्तीत वाढ होईल. आपण विरोधकांवर मात कराल. नोकरीत खुश राहाल. कामाचा आनंद घेऊ शकाल. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून वेळेची बचत करू शकाल. जोड व्यवसायावर लक्ष देऊ शकाल. आपण जर पूर्ण वेळ व्यवसाय करत असाल तर हा आठवडा बुद्धिमत्ता व कार्यशक्ती वाढविणारा असल्याचे दिसून येईल. हाती एखादा नवीन सौदा लागू शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस यांचा वर्षाव करतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल.
7 / 15
कर्क: आठवडा बरेच काही घेऊन येणारा आहे. प्राप्तीत जलद गतीने वाढ होताना दिसून येईल. चेहेऱ्यावर आनंदाची लकेर उमटेल. नोकरी असो किंवा कौटुंबिक जीवन दोन्ही ठिकाणी खूषच राहाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. लोक प्रगतीसाठी प्रेरित करतील. व्यापाऱ्यांना परदेशात प्रवास करून व परिश्रम वाढवून चांगले परिणाम मिळण्याची संभावना आहे. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. चांगला धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या परिश्रमाने प्रगती करतील.
8 / 15
सिंह: हा आठवडा अनुकूल आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित एखादी मोठी बाब आपले लक्ष वेधून घेईल. फायदा होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा आनंददायी ठरेल. कामात त्यांची प्रगती होईल. व्यापारी कामाच्या बाबतीत काहीसे त्रासलेले दिसू शकतात, परंतु थोडा धीर धरा. हे दिवस गेल्यावर फायदाच होईल. विद्यार्थ्यांना ज्ञानाचा लाभ होऊन ते अध्ययन उत्तम प्रकारे करू शकतील.
9 / 15
कन्या: हा आठवडा चांगला आहे. गुप्त धन मिळू शकते किंवा अचानकपणे वारसागत किंवा पैतृक संपत्ती प्राप्त होऊ शकते. जमीन-जुमल्याशी संबंधित बाबीत लाभ होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक स्थिती उत्तम राहील. खुश राहाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच अनुकूल आहे. ज्या पद्धतीने आपली कामे करत आहात तशीच ती करत राहा. पाठिंबा मिळेल. सहकारी मदत करतील. आत्मविश्वासाने मोठ-मोठी आव्हाने लीलया परतवून लावाल. व्यापारात काही नवीन योजना घेऊन याल, ज्याचा कालांतराने फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल.
10 / 15
तूळ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. फक्त आठवड्याचा पहिला दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने त्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम हाती घेऊ नका. तसेच कोठेही आर्थिक गुंतवणूक करू नका. त्या नंतरचे सर्व दिवस यशदायी आहेत. नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही ठिकाणी विजयाची पताका फडकवू शकाल. आत्मविश्वास उंचावेल. आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात करू शकाल. जमीन - जुमल्याशी संबंधित कामे रेंगाळू शकतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात रोमांस, आपसातील प्रेम, सौहार्दाची भावना, एकमेकांतील सामंजस्यव व नाते दृढ करून वाटचाल करतील. विद्यार्थी अभ्यासात अत्यंत कार्यरत राहून आनंद घेतील.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. मन पूर्णतः खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारासह दूरवरचा प्रवास करण्याचा बेत आखू शकता. व्यापाऱ्यांना मनाप्रमाणे व्यापार करूनच लाभ होईल. व्यापार यशस्वी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. वरिष्ठ आपल्या पाठीशी राहतील, त्यामुळे आनंदित व्हाल. आत्मविश्वास उंचावल्याने कामात यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.
12 / 15
धनु: हा आठवडा चढ-उताराने भरलेला आहे. मानसिक तणावासह आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. सावध राहावे. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती चांगली होईल. बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादा मोठा निर्णय घेऊन यशस्वी व्हाल. व्यापार वृद्धिंगत होईल. खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी प्रतिकूल असू शकते. आत्मविश्वासाने काम करावे लागेल, अन्यथा कामात चुका झाल्याचा त्रास होऊ शकतो. मित्र व भावंडांचा पाठिंबा प्रगती करण्यात मदतरूप होईल. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन मनमोकळेपणाने व्यतीत करतील. जोडीदाराच्या पाठिंब्याने सर्व जवाबदाऱ्या पूर्ण करू शकतील. मनास एक चांगला मोकळेपणा जाणवेल. विद्यार्थ्यांना आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात चांगली कामगिरी होईल.
13 / 15
मकर: हा आठवडा उत्तम आहे. कौटुंबिक गरजांवर लक्ष द्याल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात समतोल साधण्यात यशस्वी झाल्याने खुश असल्याचे दिसून येईल. प्राप्तीत वाढ झाल्याने मन हर्षित होईल. कुटुंबियांचे सहकार्य व समर्थन प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. किरकोळ खर्च होतील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापारात काही नवीन लोकांना भेटून एखादा नवीन सौदा करू शकतील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात सौख्य अनुभवतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे.
14 / 15
कुंभ: हा आठवडा खूपच चांगला आहे. प्रॉपर्टीचा सौदा करण्यात यश प्राप्त होऊन हाती एखादी मोठी प्रॉपर्टी लागू शकते. सरकारी क्षेत्राकडून चांगला लाभ संभवतो. स्वतःवर नियंत्रण ठेवा. अति आत्मविश्वासात न राहिल्यास सर्व कामे उत्कृष्ट होतील. नोकरीतील स्थिती अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या पाठीशी राहतील. व्यापाराच्या दृष्टीने आठवडा चढ - उतारांचा आहे. परंतु, कार्यकौशल्याच्या जोरावर परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणावातून बाहेर पडून जोडीदारासह फिरावयास जाण्याचा बेत ठरवतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
15 / 15
मीन: हा आठवडा खूपच चांगला आहे. आत्मचिंतन करून स्वतःच्या चुका शोधून काढाल. काय धडा घ्यावा ह्यावर विचार कराल. वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना कामात मोठा फायदा होऊन स्वतःचे स्थान निर्माण करू शकाल. व्यापारी ह्या आठवड्यात व्यापार मजबूत करण्यासाठी काही नवीन योजनांची मदत घेऊ शकतात. एखादी चांगली योजना अंमलात आणून ते व्यापारात प्रगती करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबातील लहानांचे सहकार्य कामात मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य