शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: नेते मंडळींची भेट, राजकारणात यश; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 8:15 AM

1 / 15
या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, प्लूटो मकरेत, मंगळ, शुक्र आणि शनी कुंभेत आहे. रवी, बुध, राहु आणि नेपच्यून मीन राशीत असून, २५ रोजी बुध मेष राशीत जाईल.
2 / 15
चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. २४ रोजी होळी, धूलिवंदन व कर, २७ रोजी संत तुकाराम महाराज बीज, २८ रोजी संकष्टी चतुर्थी, ३० रोजी रंगपंचमी आहे.
3 / 15
आगामी आठवडा सांस्कृतिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून विविधांगी, विविधरंगी आहे. एकूणच ग्रहस्थिती पाहता तुमच्यासाठी आगामी आठवड्याचा कालावधी कसा असेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: वैवाहिक जीवन सौख्यदायी होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या नवीन नोकरीची ऑफर आली तरी त्यांनी सध्याची नोकरी चालू ठेवणे त्यांच्या हिताचे राहील. भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यात लाभ होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरपूर लाभ मिळेल. प्राप्ती उत्तम राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. कोणत्याही प्रकारची नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यतीचा सल्ला घ्यावा. मातेचे सानिध्य लाभेल.
5 / 15
वृषभ: हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मिश्र फलदायी आहे. काही मित्र त्यांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. जीवनात चढ-उतार येतील. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस मनातील विचार सांगू शकतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सर्व जण एकत्रित होऊन एखाद्या पार्टीत सहभागी होतील. जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण त्रस्त करेल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. मित्रास आर्थिक मदत कराल. एखादी चांगली संधी मिळून मोठा धनलाभ होईल.
6 / 15
मिथुन: या आठवड्यात विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. कामात प्रगती करण्यासाठी एखादी योजना तयार कराल. विवाहेच्छुकांसाठी चांगले स्थळ येईल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. मित्रांसह सुख-दुःखाच्या गोष्टी करत असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ज्या व्यक्ती प्रॉपर्टीची देवाण-घेवाण करण्याच्या व्यवसायात आहेत, त्यांना चांगली संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी होतील. सरकारी क्षेत्राकडून आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.
7 / 15
कर्क: या आठवड्यात प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. एकमेकांना आपल्या मनातील विचार सांगू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकत्रितपणे काम करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांसह थोडा वेळ व्यतीत करून पैश्यांची बचत कशी करावी हे शिकून घ्याल. व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ मुलांसाठी काढाल. राजकारणात यश प्राप्त होईल. नेते मंडळींशी भेट संभवते. विद्यार्थी स्पर्धेसाठी खूप मेहनत करत असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. स्वतःसाठी काही खरेदी कराल. नोकरी करणाऱ्यांना नकरीच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आत्मविश्वास उंचावेल. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा काहीसा प्रतिकूल असला तरी आपण आपल्या चांगल्या कृतीने त्यास अनुकूल करू शकता. कोणत्याही प्रकारे जास्त विचार न करता निव्वळ कष्ट करा व कुटुंबियांशी वाद टाळा. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. प्रेमिकेसाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमात खूप पुढे निघून जाल. प्रेमिकेवर विश्वास ठेवाल व त्यामुळे नाते अधिक दृढ होईल.
9 / 15
कन्या: या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप मन लावून अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळू शकतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. मित्रांद्वारा प्राप्तीची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना आहे. व्यवसायाची प्रगती साधण्यात यशस्वी होतील. आर्थिक स्थिती चांगली राहिली तरी काही खर्च होतील. मित्रांशी फोनवर जास्त वेळ बोलणे होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. मनःशांतीसाठी थोडा वेळ एखाद्या धार्मिक कार्यासाठी द्याल. राजकारणात यश प्राप्त होईल. नेते मंडळींची भेट संभवते. दिनचर्येत सकाळचे फिरणे,योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट केल्यास आपल्या हिताचे होईल.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी खास असेल. व्यवसायाची प्रगती करण्याचा जो प्रयत्न करत होता, त्यात यशस्वी व्हाल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात सुख - शांतता नांदेल. विद्यार्थी खूप मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. इच्छा नसताना काही खर्च आपणास अचानकपणे करावे लागतील. नवीन वाहनाचे सुख लाभेल. थकबाकी मिळेल. प्रलंबित कामे होतील. कर्जफेड करू शकाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. मनःशांतीसाठी आपण थोडा वेळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल. घरातील वडील मंडळींचा आशीर्वाद घ्यावा.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. परिश्रम यशस्वी होतील. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील समन्वय टिकवून ठेवतील. जोडीदाराच्या साथीने कुटुंबाच्या भल्यासाठी कार्य करतील. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल,जी आपण अवश्य पार पाडू शकाल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल.
12 / 15
धनु: या आठवड्यात विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. मुलास नोकरी लागल्याने त्याचे आई-वडील खुश झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारास पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांनी सध्याच्या नोकरीत टिकून राहणे त्यांच्या हिताचे होईल.
13 / 15
मकर: या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. सर्वांना मदत करण्यात आघाडीवर राहाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. त्यात पगार जास्त असेल. व्यापारी व्यापारातील स्थगित झालेल्या योजना पुन्हा सुरु करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्राप्तीत वृद्धी होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. मित्र सहकार्य करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. मान-सन्मान होईल. घराच्या दुरुस्तीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत.
14 / 15
कुंभ: या आठवड्यात वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकाल. प्राप्तीत वाढ होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. व्यापारी व्यापार वृद्धीसाठी काही लोकांचा समावेश करतील. नोकरीत दिलेले काम पूर्ण करतील. वरिष्ठांद्वारा प्रगतीची संधी मिळेल. आई-वडिलांना मनातील विचार सांगाल.
15 / 15
मीन: या आठवड्यात कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांच्या एखाद्या नवीन सौद्यावर शिक्कामोर्तब होईल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्णत्वास जातील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. सौख्यात वाढ होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य