शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 7:07 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात मंगळाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरु, हर्षल आणि मंगळ वृषभ राशीत आहे. २६ रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. बुध कर्क राशीत, रवी सिंह राशीत आहे. केतु आणि शुक्र कन्या राशीत आहे. प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील, २६ रोजी श्रीकृष्ण जयंती, संत ज्ञानेश्वर महाराज जयंती, तर २७ रोजी गोपाळकाला, २९ रोजी अजा एकादशी तर ३१ शनि रोजी प्रदोष आहे. मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत होत असलेला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यासह श्रावणी सोमवारी जुळून आलेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा योग अनन्य साधारण मानला गेला आहे.
3 / 15
या दिवशी अनेक दुर्मिळ, अद्भूत योग जुळून येत आहेत. या दिवशी रोहिणी नक्षत्र, सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत, तर चंद्र वृषभ राशीत असेल. वृषभ राशीत गुरु असल्याने गजकेसरी योग जुळून येत आहे. शुक्रादित्य, शश राजयोग, वृषभ राशीमध्ये चंद्र उच्च स्थान आहे. तसेच या दिवशी जयंती योग तयार होत आहे. कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...
4 / 15
मेष: एखादी चांगली बातमी किंवा अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्या कामाची जवाबदारी घ्याल त्या उत्तम प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे भरपूर सहकार्य मिळेल. विचारपूर्वक पैसा खर्च करणे हितावह होईल, अन्यथा महिना अखेरीस कोणाकडून उसने पैसे घेण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. धन प्राप्ती झाली तरी खर्चात वाढ होईल. ऋतुजन्य आजारांपासून दूर राहावे. दांपत्य जीवन सुखद होईल.
5 / 15
वृषभ: सामान्यतः उन्नतीदायक काळ आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींना बाजारात अडकलेला पैसा अप्रत्यक्षपणे मिळेल. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होईल. सरकार दरबारी खोळंबलेली कामे एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पूर्णत्वास जातील. असे असले तरी व्यापारात किंवा एखाद्या योजनेत नव्याने आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहून निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा शुभचिंतकाचा सल्ला जरूर घ्यावा. विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्याची संभावना आहे. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात दूरवरचा किंवा जवळचा प्रवास संभवतो. परदेशात व्यापार किंवा कारकीर्द घडविण्यास प्रयत्नरत असणाऱ्या व्यक्तींच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.
6 / 15
मिथुन: हा कालावधी अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. कामाच्या जबाबदारीचे ओझे राहिल्याने मानसिक ताण येऊ शकतो. अशा वेळी कोणतेही काम पूर्ण करताना धीर धरणे हितावह राहील. कार्यक्षेत्री ज्या व्यक्ती आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यापाऱ्यांना उत्तरार्ध अधिक शुभ फलदायी व लाभदायी होईल. प्रेमिकेच्या सहवासात भरपूर वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होईल. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास शुभ फलदायी होतील. आर्थिक बाबतीत संथ गतीने का होईना, परंतु प्रगती होईल.
7 / 15
कर्क: काही कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जमीन-घराशी संबंधित वाद त्रासास कारणीभूत होऊ शकतात. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय अजाणतेपणाने घेऊ नये. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ काहीसा दिलासादायक आहे. प्रेमिकेच्या भावनांना दुर्लक्षित करू नका. कार्यक्षेत्री असलेले त्रास निवळू लागतील. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
8 / 15
सिंह: अत्यंत शुभ फलदायी कालावधी आहे. दीर्घ काळापासून एखादा मोठा प्रकल्प मिळण्याची प्रतीक्षा करत होते त्यांची मनोकामना पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने अनेक दिवसांपासून खोळंबलेले काम पूर्ण होऊन दिलासा मिळेल. कार्यक्षेत्री कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ आपल्यावर एखादी मोठी जवाबदारी सोपवू शकतात. प्रेमात उत्तम समन्वय साधला जाईल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत संथ गतीने का होईना, प्रगती होत असल्याचे दिसून येईल. भौतिक सुख-समृद्धीत वृद्धी होईल. एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. एखादी तीर्थयात्रा संभवते.
9 / 15
कन्या: जीवनात मोठे सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येईल. दीर्घ काळापासून इच्छित ठिकाणी बदली होण्याची मनोकामना पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षितपणे एखादी महत्वाची जवाबदारी मिळू शकते. प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील. संचित धनाची वाढ होईल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. कामानिमित्त परदेशवारी संभवते. जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आहारावर विशेष नियंत्रण ठेवावे. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागतील.
10 / 15
तूळ: हा काळ मिश्र फलदायी आहे. प्रकृती विषयक समस्यांचा प्रभाव आपल्या कामावर होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. अपेक्षित यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करण्याचा एकमेव पर्याय राहील. व्यापाऱ्यांना स्पर्धकांच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. बाजारातील मंदी त्रासास कारणीभूत ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी व कनिष्ठांशी उत्तम समन्वय साधावा लागेल. प्रेम संबंध दृढ करण्यात घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार पाठीशी ढाल बनून उभा राहील.
11 / 15
वृश्चिक: मिश्र फलदायी कालावधी आहे. एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण होण्याची संभावना आहे. अचानकपणे काही धन प्राप्त झाल्याने अडचण सहजपणे दूर होईल. कार्यक्षेत्री नियोजनबद्ध काम केल्यास लाभ होईल. व्यवसायाचा विस्तार करू इच्छित असाल तर क्षमतेनुसारच व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न करावा. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. शासनाशी संबंधित एखाद्या बाबीमुळे खूप धावपळ करावी लागू शकते. एखाद्या प्रभावी व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्यास कारणीभूत ठरेल.
12 / 15
धनु: जीवनाशी संबंधित समस्या दूर होत असल्याचे दिसून येईल. एखाद्या मित्राच्या मदतीने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. संततीशी संबंधित एखादी सुखद बातमी प्रामुख्याने कुटुंबाच्या आनंदास कारणीभूत ठरेल. कारकीर्द-व्यवसाय किंवा व्यक्तिगत कामानिमित्त दूरवरचा किंवा जवळचा एखादा प्रवास संभवतो. घर दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी खिशातून जास्त पैसा खर्च करावा लागल्याने अंदाजपत्र कोलमडू शकते. मित्रांच्या व हितचिंतकांच्या मदतीने आपली सर्व कामे योग्य रीतीने व वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विवाहेच्छुकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल.
13 / 15
मकर: आगामी कालावधी अनुकूल आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींना रोजगाराची संधी मिळू शकेल. एखाद्या मित्राच्या मदतीने कारकीर्द-व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. कार्यक्षेत्री परिस्थिती पूर्वीच्या मानाने चांगली होईल. वरिष्ठांची कृपा होईल, तर कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. पूर्वी केलेल्या एखाद्या योजनेतील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. जमीन-जुमल्याशी संबंधित वादात निर्णय बाजूने लागू शकतो. पती-पत्नी दरम्यान भावनिक ओढ वाढल्याने दांपत्य जीवन सुखद होईल. एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादी तीर्थयात्रा संभवते.
14 / 15
कुंभ: आळस व अभिमान दूर ठेवावा लागेल. कोणतेही काम उद्यावर ढकलण्याची सवय नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरी व कार्यक्षेत्री सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करा. वैवाहिक जीवन सुखद व्हावे म्हणून जोडीदारास थोडा वेळ द्यावा. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व त्यांच्या भावना दुर्लक्षित करू नका. अचानक एखादी मोठी जवाबदारी येऊ शकते, जी पूर्ण करण्यास अतिरिक्त प्रयत्न व परिश्रम करावे लागतील. परीक्षेची - स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते.
15 / 15
मीन: निश्चित केलेली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम व धावपळ करावी लागेल. एकंदरीत वेळेचे व ऊर्जेचे योग्य नियोजन करूनच अपेक्षित यश प्राप्त होईल. पगारवाढ किंवा पदोन्नतीची प्रतीक्षा संपुष्टात येईल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या ठिकाणाहून मोठी ऑफर येऊ शकते. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. प्रेमीजनांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमिकेकडून एखादी आश्चर्यचकित करणारी भेटवस्तू मिळाल्याने मन प्रसन्न होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीची नवीन साधने मिळू शकतील. असे असले तरी प्राप्तीच्या जोडीने खर्च वाढतील. जमीन-घर यांच्या खरेदी-विक्रीत घाई करू नये. कोणत्याही प्रकारचा सौदा करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यShravan Specialश्रावण स्पेशलJanmashtamiजन्माष्टमीDahi Handiदहीहंडीchaturmasचातुर्मासAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य