शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, नोकरीत बढती; शेअर बाजारातून नफा, धनलाभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 7:44 AM

1 / 15
या सप्ताहात शुक्रवारी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत रवी आणि बुध मिथुन राशीत, शुक्र आणि मंगळ कर्क राशीत असून, दि. ३० जूनला मंगल सिंह राशीत प्रवेश करेल.
2 / 15
केतू तूळ राशीत प्लूटों मकर राशीत शनी कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. गुरुवारी आषाढी देवशयनी एकादशी आहे, चातुर्मास सुरु होत आहे. शनिवारी प्रदोष आहे.
3 / 15
या आठवड्याचे एकूण ग्रहमान आणि अन्य घडामोडी पाहता आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना शुभ-लाभ, करिअर, नोकरी, व्यापार-व्यवसायात यश प्रगती साध्य करता येऊ शकेल? कोणत्या राशींना आगामी आठवडा काहीसा संमिश्र ठरू शकेल? ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण कराल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होईल. अचानक धनलाभ किंवा इच्छापत्राद्वारा एखादा लाभ संभवतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत जागरूक राहून आपली कामगिरी उंचावण्यासाठी खूप मेहनत करतील. आपणास एखादे नवीन काम मिळण्याची संभावना आहे. वरिष्ठांशी प्रेमाने वागावयास लागेल. व्यापारी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एखादा मोठा सौदा करू शकतील. त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत मोठी प्रगती होत असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कौटुंबिक गरजांवर लक्ष द्याल. घरगुती कामात सहकार्य कराल. मातेशी विशेष स्नेहपूर्ण भेट व संवाद होईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाची प्रशंसा व सन्मान दोन्ही प्राप्त होण्याची संभावना आहे. पगारवाढ संभवते. व्यापार करत असाल तर प्रवासाच्या माध्यमातून आपल्या नव्याने काही ओळखी होतील, ज्या आपल्या उपयोगी येतील. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आठवडा आहे. स्पर्धेत यश संभवते. आहारावर नियंत्रण ठेवावे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. प्रवास फायदेशीर ठरतील. ह्या प्रवासामुळे व्यापाऱ्यांना लाभदायी सौद्यांची प्राप्ती होईल व त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मन आनंदून जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. आपला अनुभव व कौशल्य आपणास न्याय देईल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश असल्याचे दिसून येईल. खर्च जरी वाढले तरी प्राप्ती चांगली होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.
7 / 15
कर्क: हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन नात्यातील प्रेम वाढेल. आपली प्राप्ती उत्तम असेल व त्यामुळे घराच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत स्थिती सुधारून आपली बाजू भक्कम होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. पूर्वीच्या चुका समजून घेण्याची संधी मिळेल व त्यामुळे भविष्यातील स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
8 / 15
सिंह: आठवड्याची सुरुवात अनुकूल आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा तणावपूर्ण राहील. नवीन काम अत्यंत जोमाने सुरु कराल व त्यात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. नोकरी करणाऱ्यांना खूप धावपळ करावी लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्राप्तीत वृद्धी झाल्याने चेहेऱ्यावर आनंदाची लकेर पाहावयास मिळेल. मनात आनंदाची भावना वाढेल. व्यापारानिमित्ताने बरेच प्रवास करावे लागू शकतात. विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. आहारात नियमितपणा ठेवावा.
9 / 15
कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहित व्यक्ती जोडीदारासह एखाद्या रम्य ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवतील. खर्चात वाढ झाल्याने आपण चिंतीत व्हाल. परंतु त्याने त्रासून जाण्याची गरज नाही. धीर धरा, परिस्थितीत हळू हळू बदल होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण झाल्याने कळी फुलेल व आपण पूर्ण आत्मविश्वासाने प्रत्येक काम सहजपणे कराल. कोणाशीही चुकीचे बोलू नका, त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनावर होऊन नुकसान सोसावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. एखादे मोठे पद मिळण्याची संभावना असून आपले पद व प्रतिष्ठा उंचावेल. शासकीय नोकरी करणाऱ्यांना अजून जास्त लाभ होईल. नशीब प्रबळ असेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. प्राप्तीतील वाढ स्पष्टपणे दिसून येईल. व्यापारातील स्थिती चढ - उतारांसह वाटचाल करेल. नवीन संधींच्या शोधात असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल.
10 / 15
तूळ: हा आठवडा उमेदीने भरलेला आहे. आपल्या काही गुप्त योजना पूर्णत्वास गेल्याने आर्थिक लाभ होईल व आपली इच्छाशक्ती मजबूत होईल. आपल्या चेहेऱ्यावर आनंदाची लकेर असल्याचे दिसून येईल, व आपणास जवळ जवळ सर्वच क्षेत्रात लाभ होत राहील. नोकरीत आपण खूप मेहनत कराल. मनःस्थिती उत्तम असेल. व्यापारासाठी आठवडा उन्नतीदायक आहे. योजना यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा लागेल. त्याचा फायदा होईल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जोडीदार व संतती यांच्यासह फिरावयास जाण्याची दाट शक्यता आहे. निष्कारण आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसान होण्याची संभावना आहे. धनप्राप्ती झाल्याने मनास आनंद होईल. व्यापाऱ्यांना प्रवासामुळे लाभ होईल. परंतु सावध राहावे. ज्यांना भेटावयाचे त्यांच्या खेरीज इतरांशी व्यक्तिगत किंवा व्यापाराविषयी बोलणी करू नये, अन्यथा नुकसान संभवते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
12 / 15
धनु: हा आठवडा खूपच चांगला आहे. कामावर लक्ष केंद्रित कराल. त्यामुळे कामात चुका कमी होऊन कामाची प्रशंसा केली जाईल. पदोन्नती अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ती होण्याची संभावना आहे. आपला कार्यभार व पगारात वाढ होऊ शकते. व्यापारासाठी परिस्थिती अनुकूल असेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर स्थिती आणखीनच चांगली बनवू शकाल. व्यापाराची वृद्धी होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांना अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अतिरिक्त आहार किंवा जास्त पार्ट्या किंवा तेलकट-मसालेदार पदार्थ खाण्याने किंवा बाहेरील पदार्थ खाऊन आपली प्रकृती बिघडू शकते.
13 / 15
मकर: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जोडीदारासह एखादा प्रवास करू शकता. वैवाहिक जीवन सुखावह होईल. संततीपासून सुख मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कामगिरी उत्तम होईल. कामाच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. आठवडा आनंदात घालवू शकाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल असून त्यांनी त्याचा पूर्णतः उपयोग करून घ्यावा. प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता योग्य तो उपचार करावा.
14 / 15
कुंभ: हा आठवडा चांगला असला तरी सुरवातीस काही त्रास संभवतो. असे असले तरी हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसेल. कामाच्या ठिकाणी दबदबा राहिल्याने आपण नोकरीचा आनंद घेऊ शकाल. कामे खूप मेहनत करून पूर्ण कराल. व्यापारात चांगले यश संभवते. गुंतवणुकीपासून लाभ होईल. शेअर्स बाजारात फायदा संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासावर जास्त जोर लावावा लागेल. असे केल्यासच ते यशस्वी होऊ शकतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. थोडा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे.
15 / 15
मीन: हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घ्याल. घरगुती कामात सहभागी व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. नोकरी करणाऱ्यांना कामाचे चांगले परिणाम मिळतील. असे असले तरी आपणास खूप मेहनत करावी लागेल. तसेच दूरवरचे प्रवास करावे लागतील. त्यामुळे कामास बरकत येऊन प्रगती करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. कामास मजबुती येईल. प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य