शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोव्हेंबरचा शेवट शुभ: ९ राशींना अनुकूल, लॉटरी, शेअर बाजारातून फायदा; धनलाभ योग, येणी मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 8:59 AM

1 / 15
नोव्हेंबर महिन्याची सांगता होत असताना, बुध, राहू, केतू आणि शुक्र यांचे राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरु आणि हर्षल मेषेत, केतु, शुक्र कन्येत असून, २९ रोजी शुक्र तूळ राशीत जाईल. रवि, मंगळ आणि बुध वृश्चिक राशीत असून, २६ रोजी बुध धनु राशीत जाईल. प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील. त्रिपुरारी पौर्णिमा व कार्तिक स्वामी दर्शन योग, ३० नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी आहे. दिवाळी, कार्तिकी एकादशी, चातुर्मास समाप्ती यांसह अनेकार्थाने नोव्हेंबर महिना विशेष ठरला. आता यानंतर इंग्रजी वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू होईल.
3 / 15
नोव्हेंबर महिन्याची सांगता आणि डिसेंबर महिन्याची सुरुवात आगामी काळात होत आहे. कोणत्या राशींना आगामी काळ अनुकूल ठरू शकेल, कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल, नोव्हेंबर महिन्याची सांगता होत असताना आर्थिक आघाडी, नोकरी, करिअर, व्यवसाय, व्यापार, कुटुंब, वैवाहिक जीवन या आघाड्यांवर काळ कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: वैवाहिक जीवनात व्यक्तिगत सामंजस्य वाढेल. संततीसाठी काळ उन्नतीदायक आहे. संबंधात सुधारणा होईल. प्रेमिकेशी असलेला दुरावा कमी होईल. आर्थिक स्थिती चांगली असेल. जलदगतीने विचार कराल. एखादे नवीन काम करण्याचा प्रयत्न कराल. प्राप्तीत वृद्धी होईल. खर्च झाला तरी आपणास तो जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला असला तरी वायफळ गोष्टींपासून दूर राहावे. स्थिती बिघडेल किंवा मानहानी होईल असे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नका. यापाऱ्यांसाठी लाभदायी काळ आहे. यशाचे शिखर गाठू शकतील. विद्यार्थ्यांना अध्ययनावर जास्त लक्ष द्यावे लागेल. एखाद्या मार्गदर्शकाच्या भेटीने समस्या दूर होऊ शकते.
5 / 15
वृषभ: आगामी काळ सामान्यच आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. त्रस्त व्हाल. घरापासून दूर एखाद्या तीर्थस्थानी किंवा धार्मिक स्थळी जाऊ शकता. तेथे जाऊन साधना करण्याचा प्रयत्न कराल व त्याने मनःशांती लाभेल. बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात व्यस्त राहतील. खूप धावपळ होईल. व्यापाऱ्यांना परिश्रमाचे खूप चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक भागीदार खूप मेहनत करतील. यापार जलदगतीने प्रगती करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत गंभीर व्हावे लागेल. एखाद्या बुद्धिमान व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यास चांगले यश प्राप्त होईल.
6 / 15
मिथुन: वैवाहिक जीवन उत्तम राहील. नोव्हेंबरची सांगता खर्चिक असू शकेल. प्राप्तीतील कमतरता जाणवू शकेल. सतर्क राहा. विरोधकांपासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. नशिबाची साथ मिळाल्याने यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी थोडा तणाव राहील. व्यापारात खर्च वाढण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दूर जावे लागू शकते. घरापासून दूर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतील.
7 / 15
कर्क: अनेक दिवसांपासून आपल्या वैवाहिक जीवनात जी नीरसता आली होती, ती दूर करून जोडीदाराशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न आपण कराल. यशस्वी व्हाल. अचानकपणे धनप्राप्ती झाल्याने आपले मन हर्षित होईल. एखाद्या ठिकाणाहून थकबाकीचे पैसे सुद्धा येऊ शकतात. लॉटरी किंवा शेअर्स बाजारातून चांगला फायदा होण्याची संभावना आहे. सरकारी क्षेत्राकडून पैसे मिळू शकतात. व्यावसायिक भागीदारीत घवघवीत यश मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. एखादा नवीन प्रयोग करू शकता. गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ आहे. परिश्रम यशस्वी होतील. उत्तम कामगिरीचा फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. काही समस्या आल्या तरी ते युक्तिपूर्वक त्या दूर करू शकतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे.
8 / 15
सिंह: वैवाहिक जीवनातील तणाव दूर होऊन नाते अधिक दृढ होईल. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. कुटुंबियांसह फिरावयास जाल. मनोबल दृढ असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला आहे. कष्टाचे चीज होईल. त्याचा चांगला फायदा होत असल्याचे दिसेल. कदाचित एखादे मोठे बक्षीस मिळेल. व्यापाऱ्यांना एखाद्या अशा व्यक्तीवर अवलंबून राहावे लागेल की, जी विश्वसनीय नसेल. सतर्क राहावे. विद्यार्थ्यांना काळ अनुकूल आहे.
9 / 15
कन्या: वैवाहिक जीवन सुखद असल्याचे जाणवेल. जीवनातील समस्या कमी होऊ लागतील. मित्रांच्या सहवासात बराच वेळ घालवाल. अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. सासुरवाडीकडून सहकार्य मिळेल. एखाद्या महत्वाच्या कार्यात कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. थकबाकी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. परिश्रम करतच राहावे. त्याचे फळ नक्कीच मिळेल. व्यापारासाठी चांगला आठवडा आहे. एखादे नवीन तंत्र वापरून प्रोत्साहित व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. काही नवीन पुस्तके खरेदी करावी लागतील. फायदा होईल. अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील.
10 / 15
तूळ: विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगू शकतील. एखादा मोठा फायदा होऊ शकतो. मग तो व्यापारातून असेल किंवा वैवाहिक जोडीदारामुळे असेल. ह्या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकाल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च तर होतीलच. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील. स्थान बळकट होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.
11 / 15
वृश्चिक: विवाहितांना वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. स्वतःवर नियंत्रण ठेवा. चिंतातुर असल्याचे बघून कुटुंबीय काही प्रमाणात त्रस्त होतील. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. प्राप्तीत वाढ कशी करावयाची ह्याचा विचार करत बसाल. नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. व्यापाऱ्यांना काही प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. त्या व्यवसायात पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकतील. संपत्तीशी संबंधित बाबी आकर्षित करू शकतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात थोडा खंड पडत असल्याचे जाणवेल, तेव्हा काळजी घ्यावी. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याची गरज भासू शकते. तणावापासून दूर राहावे लागेल.
12 / 15
धनु: आगामी काळ खूपच चांगला आहे. घरासाठी काहीतरी चांगले करू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समस्या असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. कौटुंबिक जीवन काहीसे अशांत असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी स्वतःला सिद्ध करून दाखवणारा काळ असेल. व्यापाऱ्यांना कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. विरोधकांपासून सावध राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल.
13 / 15
मकर: खुश राहाल. घरात एखादे मंगल कार्य होईल. घरात लोकांची वर्दळ वाढून वातावरण आनंदमय होईल. सर्वजण एकोप्याने राहतील. सामंजस्य बळकट होईल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना कामात काही शक्कल लढवावी लागेल. काम अधिक चांगले करण्याची इच्छा असून ते आजवर तसे कधी करू शकत नव्हते. व्यापारी मिळालेल्या संधीचा फायदा घेतील. प्रवास लाभदायी होऊन व्यापारात लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतील, परंतु काही घटना त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील.
14 / 15
कुंभ: एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळाल्याने मन आनंदून जाईल. नोकरी करणाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होईल. कामाचे समाधान मिळेल. व्यापाऱ्यांना काही नवीन योजनांसह काम करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याचे दिसेल. परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची एखादी किरकोळ समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
15 / 15
मीन: काळ खूपच चांगला आहे. स्वतःवर लक्ष देऊन जबाबदाऱ्या ओळखाल. व्यवहारात झालेल्या बदलामुळे आपणास आनंद व आश्चर्य वाटेल. वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यास तयार व्हाल व त्याचे सकारात्मक परिणाम मिळताना दिसून येईल. एखाद्या सोहळ्यात सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कालावधी त्रासदायी असू शकतो. कामातून योग्य लाभ होत नसल्याचे जाणवल्याने काहीसे उदास होतील. अशा स्थितीत शांत राहून व धीराने काम करणे हितावह ठरेल. प्राप्ती चांगली असेल. व्यापाऱ्यांना कामातून लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला कालावधी आहे. अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. चांगले परिणाम मिळतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य