शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:13 AM

1 / 15
१ मे २०२४ रोजी दुपारी १२:५६ वाजता गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. अन्य ग्रहस्थिती अशी शुक्र, रवि आणि हर्षल मेष राशीत आहेत. गुरु वृषभ राशीत जाईल. केतू कन्येत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत तर मंगळ, बुध, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीतून राहील. ४ मे रोजी वरुथिनी एकादशी आहे. गुरुवारी रात्री ८.११ पासून पंचक आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी पूर्ण वेळ पंचक राहील. सोमवारी सायंकाळी ५.४३ पर्यंत पंचक राहील.
3 / 15
गुरुचे गोचर हे यंदाच्या वर्षीचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे राशीपरिवर्तन मानले जात आहे. त्याचा अनेकविध राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, तर काही राशींना आगामी काही काळ संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल आगामी काळ, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. पैश्यांची बचत कशी करावी हे शिकून घ्याल. त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. आर्थिक बचत करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील, परंतु काही मित्र त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल. तेथे अनेक जणांची भेट होईल.
5 / 15
वृषभ: वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांकडून धनलाभ होईल. आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र, वाढीव खर्च करण्याची तयारी असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी मेहनत करण्याचा काळ आहे. वरिष्ठ खुश झाल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. एखाद्या मंत्राच्या मदतीने प्रगती करू शकाल. मनःशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ व्यतीत कराल.
6 / 15
मिथुन: प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुखद क्षणांचा उपभोग घेतील. जोडीदाराच्या प्रगतीने ते खुश झाल्याचे दिसून येईल. खर्च वाढले तरी प्राप्ती वाढेल. पूर्वी कोठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा लाभ होईल. व्यापारात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढला तरी कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागणार नाही. स्पर्धेसाठी विशेष अनुकूल काळ नाही. मित्रांच्या मदतीने प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील.
7 / 15
कर्क: आर्थिक स्थिती चांगली असण्याची संभावना आहे. खर्चात कपात होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती खूपच विचारपूर्वक करावी. व्यापाऱ्यांना थोडी गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांचे स्थान परिवर्तन संभवते. विद्यार्थी मन लावून अध्ययन करत असल्याचे दिसून येईल. स्पर्धेत यश प्राप्तीची संभावना आहे. आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यां कडून आपल्यावर एखादी जवाबदारी सोपविण्यात येईल, जी सहजपणे पूर्ण करू शकाल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातेचा सहवास व सहकार्य लाभेल.
8 / 15
सिंह: प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. एकमेकांप्रती विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. आर्थिकदृष्ट्या मध्यम फलदायी काळ आहे. प्राप्ती ठीक राहील. एखाद्या प्रॉपर्टीसाठी पैसा खर्च कराल. शासकीय नोकरी करत असलेल्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करतील. गुरुजनांची मदत मिळेल. जे घरून काम करतात त्यांना खूप मोठा लाभ होईल. व्यापारी त्यांच्या व्यवसायास पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तेथे थोडा वेळ घालवल्याने आपणास मनःशांती लाभेल.
9 / 15
कन्या: कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन कराल. वैवाहिक जीवनात सर्वकाही आलबेल असेल. आर्थिकदृष्ट्या काळ खर्चिक आहे. एखादी गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल, ज्यात यशस्वी व्हाल. अचानकपणे एखादा खर्च उभा झाल्याने त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना व्यवसायात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात खूपच व्यस्त राहतील. कार्यालयीन कामासाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक बनविल्यास ते त्यांच्या हिताचे होईल. वडिलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. एखाद्या मित्राच्या मदतीने प्राप्तीची नवीन स्रोत उपलब्ध होतील. मुलांचे सहकार्य मिळेल.
10 / 15
तूळ: वैवाहिक जीवनात अत्यंत खुश असल्याचे दिसून येईल. मुलांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. रोजच्या प्राप्तीत वृद्धी होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो. व्यापारानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. घर, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची जी योजना आखत होता त्यात यशस्वी व्हाल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
11 / 15
वृश्चिक: वैवाहिक जोडीदार आपल्यासाठी एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकेल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करतील. पैतृक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या व्यवसायात थोडा बदल करतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. माता - पित्याचे सानिध्य व सहकार्य लाभेल. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. सर्वजण मिळून एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन कराल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. ज्या व्यक्ती समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यापारींसाठी प्रवास लाभदायी ठरतील. एखादी मनीषा पूर्ण होईल.
12 / 15
धनु: आर्थिक दृष्ट्या हा काळ चांगला आहे. खर्चात कपात होऊन प्राप्तीत वृद्धी होईल. व्यापाऱ्यांना थोडी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. मित्रांच्या मदतीने नवीन कंत्राट मिळतील. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढेल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस मनातील विचार सांगू शकतात. माता - पिता मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतील. एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर ती खरेदी करू शकता. व्यस्त कार्यक्रमातून स्वतःसाठी थोडा वेळ काढून आवडीची कामे कराल.
13 / 15
मकर: विवाहितांसाठी अत्यंत चांगला आहे. जोडीदाराच्या प्रगतीने खुश झाल्याचे दिसून येईल. कुटुंबीय एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन करतील. मुलांच्या भवितव्यासाठी थोडी आर्थिक गुंतवणूक कराल. जुने मित्र भेटतील. मित्रांमुळे प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. कुटुंबियांसाठी थोडी खरेदी कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन कंत्राट मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील कामगिरी उत्तम होईल. आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. आजूबाजूला होत असलेल्या वादविवादापासून दूर राहावे.
14 / 15
कुंभ: वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या कुवतीनुसार पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना एखादी सरकारी ऑर्डर मिळू शकते. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. स्पर्धेसाठी तयारी करत असणाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल. थकबाकी मिळेल.
15 / 15
मीन: प्रेमीजन प्रेमिकेस मनातील विचार सांगून विवाहाची मागणी घालू शकतील. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. काही खर्च आपणास त्रस्त करू शकतात. बचतीची रक्कम मोडावी लागेल. प्रत्येक खर्च सावधपणे करावेत. व्यापाऱ्यांना नवीन काम मिळेल. व्यापारानिमित्तचे प्रवास लाभदायी ठरतील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रचित्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. थकबाकी मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याचे जे आयोजन करत होता त्यात यशस्वी व्हाल. एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य