शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: १० राशींना शुभ; आयात-निर्यात, शेअर बाजार-लॉटरीतून लाभ, येणी वसूल होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 8:07 AM

1 / 15
या सप्ताहात १ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करेल. याशिवाय अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, केतू कन्येत, मंगळ, शुक्र आणि बुध धनूत, रवी आणि प्लूटो मकरेत असून, १ १ तारखेला बुध मकरेत येईल. शनी कुंभेत, त तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे. रविवार, २८ जानेवारी २०२४ रोजी पौष कृष्ण तृतीया (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ६:११ पर्यंत) आहे.
3 / 15
जानेवारी महिन्याची सांगता होऊन आता फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात काही राशींना उत्तम ठरणार असून, आगामी आठवडा काही राशींना काहीसा संमिश्र ठरू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या, या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. नवीन घर खरेदी करावयाचे असेल तर लेखी व्यवहार विचारपूर्वक करावा. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापारात चांगला फायदा प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सध्याच्या नोकरीत टिकून राहणे हितावह होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे. ज्या व्यक्ती आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. घरून ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगली लाभप्राप्ती होणार नाही. अविवाहितांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. मंगल कार्यक्रमाचे आयोजन होईल.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. ज्यांना एखाद्या कार्यासाठी कर्ज काढावयाचे आहे त्यांना ते सहजपणे मिळू शकेल. गुंतवणुकीसाठी आठवडा अनुकूल आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. एखाद्या सौद्यात अचानकपणे खूप मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नोकरीत बदल करण्याचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष न लागल्याने परीक्षेत त्यांना चांगले परिणाम मिळविण्यात अपयश येईल. ते खेळांच्या स्पर्धेत सहभागी होतील, ज्यात ते यशस्वी सुद्धा होतील. रोजच्या दिनचर्येत योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट करावे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जोडीदाराशी अनेक दिवसांपासून सुरु असलेली कटुता संपुष्टात येऊन नात्यातील जवळीक वाढेल. घराच्या सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण विचारपूर्वक करणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी संवाद साधताना वाणीत गोडवा ठेवावा. नवीन नोकरीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. इतर गोष्टीत त्यांचे मन भरकटत जाण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीसाठी आठवडा अनुकूल आहे. मंगल कार्याचे आयोजन होईल.
7 / 15
कर्क: हा आठवडा खूपच चांगला आहे. प्रणयी जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण व्यतीत कराल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीचा पैसा खर्च करावा लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्राप्तीची संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असल्याचे दिसेल. रोजच्या दिनचर्येत बदल करणे हिताचे होईल. ज्या व्यक्ती घरापासून दूर राहून नोकरी करतात त्यांना कुटुंबीयांची आठवण सतावू शकते. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने थकबाकीची रक्कम प्राप्त होईल.
8 / 15
सिंह: हा आठवडा चांगला आहे. अविवाहितांसाठी योग्य प्रस्ताव येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकतील. वरिष्ठांशी संवाद साधताना वाणीत माधुर्य ठेवणे आपल्या हिताचे होईल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे सहकार्य मिळेल. एखादा नवीन विषय शिकण्याची त्यांची इच्छा पूर्ण होईल. मनःशांतीसाठी थोडा वेळ धार्मिक कार्यात सुद्धा व्यतीत कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. ज्यांना राजकारणात कारकीर्द घडवावयाची आहे त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे.
9 / 15
कन्या: हा आठवडा चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घरातील सर्वजण एकत्रितपणे काम करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी येईल. घराच्या दुरुस्तीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घ्यावे लागू शकेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व्यवसायाची वाढ करण्यासाठी खूप परिश्रम करत असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना विषयात काही बदल करावयाचा असेल तर त्यात त्यांनी जास्त विलंब करू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. पैतृक संपत्ती प्राप्त होईल.
10 / 15
तूळ: हा आठवडा चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण व्यतीत कराल. व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून मुलांच्या सहवासात व्यतीत कराल. मुलांसह एखाद्या सहलीस जाल, जेथे ते खूप मौज-मजा करताना दिसतील. कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. घरगुती गरजांसाठी काही खरेदी कराल. जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. थकीत रक्कम मिळेल. मित्रांच्या मदतीने बऱ्याच संधी प्राप्त होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. मनःशांतीसाठी काही वेळ आपण एकांतात व्यतीत कराल. नवीन कामे मिळतील, ज्यातून मोठा लाभ मिळवून आर्थिक स्थिती मजबूत कराल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. एखादी जमीन घ्यावयाची असेल तर आपण त्यात गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकाल. शेअर बाजारासाठी हा आठवडा खास असा नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर येईल. असे असले तरी सध्याच्या नोकरीत टिकून राहणे हितावह होईल. विद्यार्थी अभ्यास करण्याऐवजी मित्रांच्या सहवासात वेळ घालवतील. अभ्यासात अडथळे निर्माण होतील. काही व्यायाम व योगासन ह्यांचा समावेश दिनचर्येत केल्यास उत्तम. व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व्यवसायात खंडित झालेल्या योजना पुन्हा सुरु करण्यात यशस्वी होतील.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. खर्च जास्त होईल. एखादे नवीन घर खरेदी करू शकता. कोणतीही जोखीम असलेली गुंतवणूक करू नका. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय नुकसानदायी ठरू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीत विलंब होत असल्याचे जाणवेल व त्यामुळे ते घरापासून दूर जाऊन अभ्यास करत असल्याचे दिसून येईल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी करत असल्याचे दिसून येईल. व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ स्वतःसाठी काढून आवडीची कामे कराल.
13 / 15
मकर: हा आठवडा प्रणयी जीवनासाठी खूपच चांगला आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीची साधने वाढतील. धनप्राप्ती संभवते. व्यवसायात बदल करण्याचे विचार येतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजयी होतील. आरोग्यात सुधारणा करण्यासाठी दिनचर्येत सकाळचे फिरणे, योगासन व ध्यान-धारणा ह्यांचा समावेश कराल. एखाद्या चांगल्या व्यक्तीची भेट होईल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त झाल्याचे दिसून येईल. घर सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. नवीन घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. जमीन किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल. नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील व त्यामुळे ते परीक्षेत यशस्वी होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा चांगला आहे. जर दिनचर्येत योगासन व ध्यान - धारणा ह्यांचा समावेश केलात तर ते आपल्यासाठी हितावह होईल. मुलांच्या भविष्यासाठी आई-वडील आर्थिक गुंतवणूक करतील. मित्रांद्वारा प्राप्तीची संधी उपलब्ध होईल.
15 / 15
मीन: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती असल्याचे जाणवेल. बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते सहजपणे मिळू शकेल. शेअर बाजार व लॉटरीसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारी व्यक्तींनी परिश्रम वाढविले तरच ते व्यापारात यशस्वी होतील. नोकरीत बदल करण्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. सरकारी नोकरीसाठी आठवडा चांगला नाही. कोणताही बदल विचारपूर्वकच करावा. विद्यार्थ्यांना नवीन विषय निवडण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होऊन ते त्यात विजयी होतील. गुरुजनांचे सहकार्य मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य