शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: संचित धनवृद्धी, उत्तम संधी; स्वप्नपूर्ती काळ, व्यापारी सौद्याचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 8:04 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात शुक्राचा राशीपालट आहे. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी मंगळ, गुरू आणि हर्षल वृषभेत, शुक्र आणि रवी कर्केत आहेत. दि. ३१ जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल, तेथे त्याची युती बुधाशी होईल, केतु कन्येत, प्लूटो मकरेत, तर शनि कुंभेत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून होईल. या सप्ताहात ३१ जुलै रोजी कामिका एकादशी, १ ऑगस्ट रोजी प्रदोष, २ ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज पुण्यतिथी, ३ ऑगस्ट रोजी संत सावता माळी पुण्यतिथी आहे.
3 / 15
शुक्राच्या सिंह राशीतील प्रवेशाने लक्ष्मी नारायण योग, तसेच शनी ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे. तुमची रास कोणती? शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा तसेच जुळून येत असलेल्या योगांचा कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: या आठवड्यात परिश्रम व प्रयत्नांचे मिश्र फळ मिळेल. कारकिर्दीसाठी-व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर संधी तर मिळतील, परंतु त्या आपल्या मनाप्रमाणे नसतील. असे असले तरी हाती आलेली संधी दवडू नका. व्यवसायात तात्कालिक फायदा करण्याच्या नादात दीर्घ कालीन नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोणतीही जोखीम घेण्याची चुक करू नका. आहार व दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावे. कठीण प्रसंगी वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहील. स्वतंत्र राहण्याची आपली इच्छा, संयमित न राहण्याची कामना, कुटुंब व नातेवाईकांपासून दूर घेऊन जाऊ शकते. द्विधा मनःस्थिती झाल्यास शुभचिंतकांचा सल्ला घ्यावा व कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी खूप विचार करावा.
5 / 15
वृषभ: हा आठवडा शुभ फलदायी व सौभाग्यदायी आहे. कारकीर्द व व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्यात एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपा होऊन आवडत्या ठिकाणी बदली किंवा जवाबदारी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या वयस्कर किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात लाभदायी ठरेल. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील. मन रमेल अशा ठिकाणी किंवा एखादा छंद व आवड, मुलांशी संबंधित गोष्टी आनंदाचे स्रोत असतील. प्रवृत्तींचा आवाका व विस्तार मोठा होईल. क्षमतेत, सहनशीलतेत मदत करण्याच्या इच्छेत वाढ झाल्याने लाभ होईल.
6 / 15
मिथुन: कामाचा व जवाबदारीचा खूप भार राहील. जीवनाशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येमुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला असाल तर त्रासून जाण्याऐवजी डोके शांत ठेवून समस्येवर इलाज शोधण्याचा प्रयत्न करा. व्यापारात थोडा लाभ होण्याची संभावना आहे. व्यापार वृद्धी करण्यासाठी किंवा कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हितावह होईल. कार्यक्षेत्री कोणाशी वाद घालण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या अखेरपर्यंत वैवाहिक जोडीदारासह एखादी धार्मिक यात्रा संभवते.
7 / 15
कर्क: हा आठवडा स्वप्नपूर्ती करणारा आहे. संपूर्ण आठवडाभर नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. पदोन्नतीची मनोकामना पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक बाबतीत अधिक वेळ व लक्ष द्यावे लागेल. असे असले तरी वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या उत्तम समन्वयामुळे समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. इतकेच नव्हे तर कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्यात यशस्वी व्हाल. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय ह्यात समन्वय साधण्यात थोडा त्रास होऊ शकतो. व्यापारानिमित्त परदेश प्रवास सुद्धा संभवतो.
8 / 15
सिंह: या आठवड्यात लहान-सहान गोष्टींना महत्व देण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करणे हितावह होईल. असे केल्याने समाधान व आत्मसाक्षात्कार झाल्याचा अनुभव होईल. कारकिर्दीत प्रगती कराल. कार्यक्षेत्री सहकारी वर्गाबरोबरच वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या व्यक्तीस विवाहासाठी मागणी घालू इच्छित असाल तर एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालवतील. दांपत्य जीवन सुखद होईल. मुलांकडून एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. ऋतू बदलात प्रकृतीची काळजी घ्यावी. स्वजनांच्या भावना दुर्लक्षित करू नका, अन्यथा समस्यांचे निराकरण करण्याचे यश मिळण्याऐवजी टीका होण्याची संभावना आहे.
9 / 15
कन्या: या आठवड्यात काही विवाद मानसिक त्रास वाढविण्यास कारणीभूत होऊ शकतात. आठवड्याच्या सुरवातीस आव्हानांप्रति क्रोध अनुभवास येऊ शकतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे मोठ्या समस्येस कारणीभूत होऊ शकते. आर्थिक नियोजन करा, अन्यथा आर्थिक संकट त्रासांचे मोठे कारण होऊ शकते. कोणाच्या प्रलोभनास बळी पडून कोणतेही पाऊल उचलू नका. उत्तरार्धात परिस्थितीत बदल होत असल्याचे दिसून येईल. प्रेमिका किंवा वैवाहिक जोडीदाराशी जवळीक व नात्यातील दृढता जाणवेल. प्रेमिका किंवा वैवाहिक जोडीदार कठीण आव्हानांचा सामना करणे सोपे करेल व जीवनाचा अर्थ विस्तारित करेल. ऋतू बदल होत असल्याने कोणत्याही प्रकारे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष लक्ष द्यावे.
10 / 15
तूळ: नवीन ओळखी करण्यात व स्वकियांच्या भेटीगाठी वाढविण्यात बराचसा वेळ जाईल. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने अनेक दिवसांपासून स्थगित असलेले काम त्वरित झाल्याने मन प्रसन्न होईल. कारकीर्द-व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखद होऊन उन्नतीस कारणीभूत होतील. जमीन-घराच्या खरेदी-विक्रीत मोठा लाभ संभवतो. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तन व मन सुदृढ ठेवण्यासाठी ध्यान-धारणा व योगासने केलीत तर ते जास्त हितावह होईल. मुलांशी संबंधित गोष्टी व त्यात सुद्धा बेचैनी व तणाव कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जाईल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. बदलत्या ऋतूत प्रकृतीची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीस मागणी घालू इच्छित असाल किंवा रुसलेल्या जोडीदारास खुश करण्याचा विचार करत असाल तर एखादी लहानशी भेटवस्तू देऊन तसे करू शकता. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी प्राप्त होईल. बुद्धिपूर्वक व सावध राहून केलेली आर्थिक गुंतवणूक आपली स्वप्नपूर्ती करण्यास मदतरूप होऊ शकते. परंतु कोणत्याही जोखीम असलेल्या कामात नुकसान सोसावे लागू शकते, हे ध्यानात ठेवावे.
12 / 15
धनु: हा आठवडा जीवनात नवीन संधी घेऊन येणारा आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठ आपल्या कामाने खुश होऊन मोठी जवाबदारी किंवा पद सोपविण्याची संभावना आहे. एकंदरीत कारकिर्दीत व व्यवसायात अशा दोन्ही ठिकाणी उन्नती होण्याची संभावना आहे. व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात. व्यवसायात मागील काही दिवसांपासून नुकसान सोसावे लागले असले तर या आठवड्यात होणाऱ्या एखाद्या मोठ्या सौद्याने त्याची भरपाई होऊ शकेल. पदोन्नती संभवते. प्रेम संबंध दृढ होतील. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. एखाद्या शुभचिंतकाच्या किंवा मित्राच्या मदतीने प्राप्तीचे नवीन स्रोत मिळून संचित धनाची वृद्धी होईल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होऊ शकते.
13 / 15
मकर: या आठवड्यात तात्कालिक फायद्याच्या नादात दूरवरचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्री कामात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नका, अन्यथा वरिष्ठांच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यास घर किंवा कुटुंबीय यांच्यात सामंजस्य निर्माण करण्यासाठी काम, आपला व्यवसाय यांच्याबरोबरीने वास्तविक स्वभावाचा समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे जाणवेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. जे काळजी घेतात अशा लोकांची अवहेलना करू नये. वैवाहिक जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात व सामाजिक जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ आपण घालवू नये.
14 / 15
कुंभ: हा आठवडा अनुकूल आहे. निष्ठा, भरंवसा व चांगल्या संबंधांवर आधारित भागीदारी होण्याची संभावना आहे. ही भागीदारी एक सुखद भविष्य निर्माण करण्यास मदतरूप होईल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. अनेक दिवसांपासून कुटुंबियांकडून प्रेमाची व स्नेहाची गरज होती, त्याची प्राप्ती स्वजनांकडून होईल. ज्या कामात किंवा सौद्यात जोखीम घ्याल त्यात लाभान्वित व्हाल. एखाद्या मोठ्या कर्जातून किंवा समस्येतून मुक्त होऊ शकता. ध्यान-धारणेत व धर्मात आपली रुची वाढेल. एखादी धार्मिक यात्रा संभवते.सुख-सोयींशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसा खर्च होईल. जीवनाशी संबंधित चांगल्या वस्तू व सामाजिकतेचा आनंद घेऊ शकाल.
15 / 15
मीन: या आठवड्यात कार्यालयीन कामाचा थोडा जास्त भार राहील. कामातील व्यस्ततेमुळे कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यात थोडा त्रास होऊ शकतो. व्यक्तिगत व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारचे लाभ प्राप्त कराल. असे असून आर्थिक बाबतीत समाधान होणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात रोजगाराच्या क्षेत्रात विशेष यश प्राप्त होण्याची संभावना आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यात पत्नी विशेष भूमिका बजावेल. गैरसमज दूर झाल्याने दिलासा मिळेल. प्रकृती सामान्यच राहील. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने सरकारी लाभ प्राप्त करण्यात आपण यशस्वी व्हाल. हा आठवडा भावी योजना बनविण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य