शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ जानेवारी २०२३ ते ०४ फेब्रुवारी २०२३: ‘या’ ८ राशींना धनलाभ योग, नोकरीत प्रगती; जानेवारीची सांगता शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:32 PM

1 / 15
सन २०२३ सुरू होऊन आता अगदी जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आपण पोहोचलो आहोत. जानेवारी महिन्यात अनेकविध धार्मिक, सांस्कृतिक सण-उत्सव उत्साहात साजरे करण्यात आले. आता इंग्रजी नववर्षाचा दुसरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास फेब्रुवारी महिनाही खास असणार आहे.
2 / 15
फेब्रुवारी महिन्यात ४ महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. पैकी नवग्रहांचा राजकुमार बुध, नवग्रहांचा राजा सूर्य तसेच शुक्र ग्रह आपापली रास बदलून दुसऱ्या राशीत जाणार आहेत. याचा सर्व १२ राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे.
3 / 15
जानेवारी महिन्याची सांगता आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आपल्यासाठी कशी असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील? कोणत्या राशींना हा आगामी आठवडा संमिश्र ठरू शकेल, जाणून घेऊया, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य...
4 / 15
मेष: हा आठवडा खुशीने भरलेला असेल. घरात एखादे मंगल कार्य होईल. घरातील वातावरण प्रसन्न होईल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक आव्हानांतून बाहेर पडण्याची संधी मिळेल. मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न केलात तर जीवनात यशस्वी होऊ शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. व्यायाम व प्रवासासाठी पैसा व वेळ खर्च कराल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
5 / 15
वृषभ: कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. मान-सन्मानात वाढ होईल. एखादी व्यक्ती गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. प्राप्तीत वाढ होत असल्याने आत्मविश्वास द्विगुणित व मन हर्षित होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. विरोधकांपासून सावध राहावे. हा आठवडा विद्यार्थ्यांना चांगला असला तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभ्यासात अडथळा येण्याची संभावना आहे.
6 / 15
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. घरातील वातावरण सकारात्मक होईल. नशिबाची साथ मिळाल्याने खोळंबलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. नोकरी बदलण्यात सुद्धा आपण यशस्वी होऊ शकाल. अनुभव कामी येईल. व्यापाऱ्यांसाठी चांगला आठवडा आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला असला तरी आहारावर लक्ष ठेवावे.
7 / 15
कर्क: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला असल्याचे दिसून येईल. परंतु, सावध राहावे. कोणत्याही गोष्टीने वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदारांनी कामावर लक्ष देण्याची व मन लावून काम करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. एखाद्या मोठ्या संस्थेशी भागीदारी होण्याची संभावना आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा आपणास अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकाल व त्यात आपणास काही अंशी यश सुद्धा मिळू शकेल. व्यापार वृद्धीसाठी आपण एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. मोठा लाभ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांना खूपच अनुकूल आहे. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. सावध राहण्याची आवश्यकता आहे. नोकरीत आपली स्थिती मजबूत होईल. लोक आपल्या कामगिरीची प्रशंसा करतील. व्यापारात चांगली स्थिती येईल. आपल्या मेहनतीचे आपणास यथोचित यश प्राप्त होईल. विद्यार्थी अभ्यासास योग्य तितका वेळ देऊ शकतील. बाहेरील खाद्य पदार्थ टाळावेत. आठवड्याचा सुरुवातीचा व अखेरचा दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. घरगुती कार्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली कामगिरी उत्तम होऊन आपणास त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यापारी व्यक्ती मानसिक तणावामुळे कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकणार नाहीत. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने आपण काम करू शकाल. गुंतवणुकीवर लक्ष द्याल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. फिरावयास व खरेदी करण्यास जाऊ शकाल. आपले खर्च वाढल्याने व प्राप्ती सामान्यच राहिल्याने आर्थिकदृष्ट्या काहीसे त्रासल्याचे दिसून येईल. नोकरीत आपली स्थिती अनुकूल होईल. आपले सहकारी सुद्धा आपल्या कामगिरीची प्रशंसा करत असल्याचे दिसून येईल. विरोधकांपासून सावध राहा. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी खूप मेहनत करताना दिसतील. मानसिक तणावामुळे सुद्धा त्रास संभवतो.
12 / 15
धनु: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन अनुकूल असेल. सावध राहावे. मुलांची काळजी वाटू लागेल. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामाची प्रशस्ती मिळेल. व्यापारासाठी आठवडा फायद्याचा आहे. विद्यार्थ्यांना आपल्या संगतीकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अभ्यासात अडथळे निर्माण होतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेयुक्त पदार्थ टाळावेत.
13 / 15
मकर: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कुटुंबीय व घरगुती बाबींवर आपण अधिक लक्ष द्याल. काही घरगुती खर्च होतील. मनात धार्मिक विचार येतील. संततीशी संबंधित चिंता निर्माण होईल. व्यापार करणाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा आपले कार्यकौशल्य दाखविण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
14 / 15
कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकतील. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्त होईल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. नोकरीत स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. व्यापारातील स्थिती सुधारेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे.
15 / 15
मीन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. खर्चात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त धावपळ करावी लागेल. वरिष्ठांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करावा. आपणास त्याचा फायदा होईल. प्रवासामुळे व्यापारात चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य