शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोव्हेंबरचा शुभारंभ शानदार! ५ राशींना सुखद, गुंतवणुकीत नफा; सरकारकडून लाभ, मालामाल व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 7:07 AM

1 / 15
आगामी काळात शुक्राचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र सिंहेत असून, २ नोव्हेंबर रोजी तो कन्येत जाईल. रवि, मंगळ, बुध आणि केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील. १ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. नक्षत्र दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री पहाटे ४:४२ पर्यंत भरणी, तर त्यानंतर कृतिका राहील.
3 / 15
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीतून वक्री चलनाने मीन आणि कन्या राशीत प्रवेश करत आहेत. या ग्रहस्थितीचा काही राशींना सकारात्मक लाभ मिळू शकतो, चांगला काळ राहू शकतो, तर काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो, जाणून घेऊया...
4 / 15
मेष: नवीन उमेद मिळू शकेल. व्यक्तिगत जीवनामुळे अत्यंत व्याकुळ व्हाल. वैवाहिक जीवनातील तणाव चिंतेस कारणीभूत ठरू शकते. संततीकडून सौख्य मिळाले तरी जोडीदाराशी असलेल्या संबंधात कटुता येऊ शकते. कटुता दूर करण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. चांगले काम करून स्वतःसाठी स्थान निर्माण करू शकतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागेल. काहीतरी चांगले करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील. एकाग्रता वृद्धिंगत होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.
5 / 15
वृषभ: मानसिक ताण वाढू शकतो. प्राप्ती सामान्यच असल्याने खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल. अन्यथा समस्या वाढतील. वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. जोडीदाराशी मतभेद झाल्यामुळे समस्या संभवतात, परंतु थोडा धीर धरा. येणारा काळ चांगला असेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. विनाकारण पैसा कोणाला देऊ नये. दिल्यास तो परत मिळण्याची अपेक्षा मनी बाळगू नये. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. खूप धावपळ करावी लागेल. व्यापारात खूप मोठी तेजी येऊ शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची संधी आहे.
6 / 15
मिथुन: पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. परंतु मार्गात बरीच आव्हाने येऊ शकतील. मात्र, न खचता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. प्राप्तीत खूप मोठी वाढ झाल्याने आत्मविश्वास उंचावेल. असे असले तरी रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. वरिष्ठांशी हुज्जत घालत बसू नका. व्यापारास अनुकूल काळ आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यात यशस्वी होऊ शकाल. घरगुती वातावरण सुखावह राहील. मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अतिरिक्त लक्ष देण्याची गरज भासेल.
7 / 15
कर्क: चांगली बातमी मिळू शकेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची संभावना आहे. कदाचित नोकरी बदलाल किंवा सध्याच्या नोकरीत बदली होऊ शकते, तेव्हा तयार राहावे. कामानिमित्त धावपळ वाढेल. कुटुंबियांना वेळ कमी दिल्याने कुटुंबात तणाव वाढू शकतो. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप संभवतात, तेव्हा सावध राहावे. व्यापारासाठी काळ अनुकूल आहे. अनेक योजना ज्या मंदावल्या होत्या त्या आता पूर्णत्वास जातील. त्यांचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करतील, परंतु काही समस्या त्यांना त्रस्त करू शकतात. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना मेहनतीस दुसरा पर्याय नाही.
8 / 15
सिंह: मिश्र फलदायी काळ आहे. एखादा दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला जावे लागू शकते. खर्च जास्त होईल. असे असले तरी काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. हीच लोक भविष्यात उपयोगी पडतील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल. मेहनत यशस्वी होईल. व्यापाऱ्यांना काही नवीन व वेगळा विचार करावा लागेल. असे केल्यासच ते त्यांच्या व्यापारात प्रगती करू शकतील. त्यावरच त्यांचा फायदा अवलंबून राहील. प्राप्ती सामान्यच राहील. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या चुका स्वीकारून जोडीदाराशी संवाद साधावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात त्रास होईल. एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल.
9 / 15
कन्या: एखाद्या गोष्टीने खूप तणावग्रस्त असू शकता. प्रकृती बिघडू शकते. यातून बाहेर पडण्यासाठी संधी व आत्मविश्वास दोन्ही प्राप्त होतील. व्यापाऱ्यांसाठी हे सर्व काहीसे आव्हानात्मक असू शकते. काही नवीन कामांवर लक्ष देण्याची गरज भासू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी अनुकूल आहे. प्रयत्न व काम करण्याची गती उत्तम असल्याने नोकरीत आपली स्थिती उंचावल्याचे जाणवेल. जोडीदाराशी तसेच कुटुंबियांशी, सासुरवाडीचे असे दोन्ही कुटुंबियां दरम्यान सामंजस्य वाढविण्याच्या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यशस्वी होण्याची दाट शक्यता असल्याने मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून खूप मेहनत करावी.
10 / 15
तूळ: मध्यम फलदायी कालावधी आहे. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ होईल. प्राप्ती चांगली होईल. योजना यशस्वी होतील. व्यवसायात यश प्राप्त होईल. व्यावसायिक भागीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. त्यांच्याशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत चढ - उतार येतील. कामावर लक्ष देऊ शकणार नाही. कामात काही त्रास होऊ शकतो. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे.
11 / 15
वृश्चिक: मध्यम फलदायी कालावधी आहे. खर्चात इतकी वाढ होईल की, त्यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. अन्यथा आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. काही शिल्लक खर्च होईल. परंतु हिंमत हारु नका. आगामी काळात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची धावपळ वाढेल. प्रवास करावे लागतील. हे प्रवास करून थकवा जाणवू शकतो. थोडे सावध राहावे. शुद्ध पाणी व सकस आहार घेणे अगत्याचे राहील. व्यापाऱ्यांसाठी काळ सामान्यच आहे. मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
12 / 15
धनु: आगामी काळ विरोधकांच्या पुढे घेऊन जाईल. व्यापारातील स्थिती जलद गतीने पुढे जाऊ लागेल. रणनीती व्यापारात प्रगती पथावर घेऊन जाईल. त्याचा मोठा फायदा होईल. सरकारी क्षेत्राकडून मोठा फायदा होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील. काम चांगले परिणाम मिळवून देईल. प्रकृतीतील बिघाड त्रस्त करू शकतो. कुटुंबीयांप्रती आपले कर्तव्य पार पाडाल. पूर्ण सहकार्य मिळवू शकाल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदारामुळे एखादा मोठा फायदा होऊ शकतो. व्यापारी व्यावसायिक भागीदारामुळे खूप मोठा लाभ मिळवू शकतील. विद्यार्थ्यांना मित्रांचे सहकार्य मिळेल. अभ्यास करून ते चांगले परिणाम मिळवू शकतील.
13 / 15
मकर: आगामी काळ अनुकूल आहे. संततीकडून एखादी सुखद बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी काळ उत्तम आहे. नात्यातील रोमांस टिकून राहील. सासुरवाडीकडील संबंध दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालावधी एखाद्या विशेष गोष्टीकडे लक्ष वेधत आहे. जर आपल्या पदोन्नतीची वेळ आली असेल तर ती होऊ शकते. पगारवाढ संभवते. अति आत्मविश्वासाने चुकीची कामे करू नयेत. प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतील.
14 / 15
कुंभ: आगामी काळ चांगला आहे. घरी पाहुण्यांची वर्दळ राहू शकते. नशिबाच्या प्राबल्याने व्यापारात उत्तम यश मिळू शकते. प्रतिष्ठेत व मान - सन्मानात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती हळू हळू नियंत्रणात येऊ लागेल. कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांचा एकमेकांवरील विश्वास द्विगुणित होईल. मित्रांच्या पाठिंब्यामुळे कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांसाठी कालाधी अनुकूल आहे. मेहनतीचे यथोचित फळ मिळेल.
15 / 15
मीन: आगामी काळ मध्यम फलदायी आहे. आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत असल्याने हात आखडता ठेऊनच गुंतवणूक करावी लागेल. कालांतराचे दिवस उत्तम आहेत. खर्चात कपात तर प्राप्तीत वाढ होईल. बँकेतील शिल्लक वाढवू शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांना किरकोळ वादांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य