शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 10:52 AM

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी, बुध आणि केतू कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत, प्लूटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील.
2 / 15
२९ सप्टेंबर रोजी पितृ पक्षातील द्वादशी श्राद्ध राहील. ३० सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध व प्रदोष राहील. १ ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध, २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्या राहील. दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून, नवरात्र उत्सव सुरू होत आहे.
3 / 15
एकूणच ग्रहमान पाहता ऑक्टोबर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी ठरेल? नवरात्रोत्सवाचा प्रारंभ कोणत्या राशींना उत्तम फल देणारा ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा कार्यात यश व सहकार्य मिळवून देणारा आहे. वाणी भारदस्त व प्रभावशाली असल्याने इतर व्यक्ती प्रभावित होतील. कार्ये पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. एखादा मोठा निर्णय घ्याल, तेव्हा भावंडांचे व कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळेल. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे काही लाभ होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात मुलांसंबंधी आनंददायक बातमी मिळाल्याने घरातील वातावरण प्रसन्न होईल. भविष्यासाठी लाभदायी योजना बनविण्यास मदत होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. दांपत्य जीवनातील प्रेम व सामंजस्य टिकून राहील.
5 / 15
वृषभ: कार्यक्षेत्रात कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यास सुख-सोयींसाठी जास्त पैसा खर्च होण्याच्या शक्यतेमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या अखेरीस कोणताही निर्णय विचार करूनच घ्यावा. जमीन, घर व पैतृक संपत्ती ह्यांच्याशी संबंधित बाबी त्रासास कारणीभूत ठरू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहावे लागेल. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर त्याचे नियम व अटी नीट वाचून निर्णय घ्यावा, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात हास्य विनोदात वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
6 / 15
मिथुन: कारकिर्दीशी किंवा व्यापाराशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीचे नवीन स्रोत होऊ शकतात. असे असले तरी प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना चांगली संधी मिळेल. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी गैरसमज निर्माण होऊ शकतात. अशा वेळी वाद न घालता संवाद साधून ते दूर करावेत. भावनेच्या आहारी जाऊ नये तसेच क्रोधीत होऊ नये. विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. वादांचे निराकरण संवादाने करावे. भावनांवर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी संबंध दृढ करावेत. कुटुंबियांना आधार द्यावा. धीराने व सद्भावनेने कामे करावीत, ज्यामुळे आव्हानांना पार करू शकाल.
7 / 15
कर्क: आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित एखादी योजना किंवा व्यवसायातून लाभ होईल. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी सौदा करण्याचा विचार करत असाल तर त्यास संभाव्य स्वरूपात संपन्न करण्याचा प्रयत्न करावा. कारकिर्दीसाठी किंवा व्यापारासाठी केलेला प्रवास सुखद व यशस्वी होईल. परदेशात कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमीजनांना नशिबाची साथ मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात प्रवासाचा आनंद लुटू शकाल. कुटुंबियांसह आनंदाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा काही सकारात्मक घडामोडींचे संकेत देत आहे. कामे वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अपेक्षित बदली किंवा पदोन्नती मिळण्याची संभावना आहे. कारकिर्दीत किंवा व्यवसायात नवीन संधी मिळेल. मित्र कामात मदत व सहकार्य करतील. एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबियांचे समर्थन व सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात बहुतांश वेळ हा धार्मिक व सामाजिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. सन्मानित होऊ शकता. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
9 / 15
कन्या: आठवड्याची सुरुवात मार्गातील एखादा मोठा अडथळा दूर होण्याने होईल. आठवड्याचा पूर्वार्ध अत्यंत अनुकूल व शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य आपणास मिळेल. प्रवास व कार्य यशस्वी व लाभदायी होतील. प्रतिष्ठा निव्वळ कार्यक्षेत्रीच नाही तर कुटुंबात व समाजात उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक रुची वाढीस लागेल. कदाचित एखादी तीर्थयात्रा होऊ शकते. ऋतुजन्य किंवा जुनाट आजारांमुळे शारीरिक कष्ट होण्याची संभावना असल्याने प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमिकेसह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. जीवनातील समस्या सोडविण्यात प्रेमिका पूर्ण सहकार्य करेल. दांपत्य जीवन सुखद होईल. स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. समोतल आहार व नियमित व्यायाम आपले आरोग्य सुरक्षित ठेवेल.
10 / 15
तूळ: हा आठवडा कारकिर्दीत व व्यापारात प्रगतीच्या संधीसह प्रकृती व वेळेचा अभाव घेऊन येणारा आहे. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून प्रकृती व वेळेकडे योग्य तितके लक्ष देता येईल. प्रकृतीकडील दुर्लक्ष त्रासदायी होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. घर, जमीन इत्यादींशी संबंधित वाद संभवतात, जे काळजीस कारणीभूत होऊ शकतात. वैवाहिक जोडीदाराची मदत व सहकार्य मिळेल. जोडीदार नेहमी पाठीशी उभा राहील. समस्या सोडविण्यासाठी संयम व बुद्धीचातुर्य दाखवावे लागेल. प्रेमिकेचे कुटुंबियांशी एखादा वाद संभवतो. असे झाल्यामुळे एकटेपणा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत धैर्य व विवेकपूर्ण निर्णय घ्यावे लागतील, जेणेकरून त्रास कमी होऊ शकेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा सौभाग्यवर्धक आहे. जीवनातील कोणत्याही आव्हानांचा सामना करताना बुद्धी व विवेकाच्या जोरावर समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचा पूर्वार्ध अत्यंत शुभ फलदायी आहे. मनोकामना पूर्ण होऊन शासनाशी संबंधित एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. विरोधक समझोता करण्यासाठी समोरून येतील. परंतु, अशा वेळी विरोधक एखाद्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने ध्येयापासून विचलित होऊ नये. प्रेमिकेकडून एखादी मोठी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल.
12 / 15
धनु: हा आठवडा अनुकूल असण्याची संभावना असली तरी आळस व अहंकारापासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात कामे पूर्ण उत्कटतेने करण्यात नक्कीच यश प्राप्त होईल. ध्येयपूर्तीसाठी मित्र व कुटुंबियांचे समर्थन मिळेल. एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यासंबधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी प्रेमिकेच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढून जोडीदारास समर्पित करावा. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. आहार व दिनचर्येवर बारीक नजर ठेवावी.
13 / 15
मकर: हा आठवडा कार्यात अत्यंत व्यस्त राहण्याचा आहे. ज्यांना व्यापाराचा विस्तार करण्याची इच्छा आहे, त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते. दलाली क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी होऊ शकतो. अनेक दिवसांपासून घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. युवकांचा अधिकांश वेळ मौज-मजा करण्यात जाईल. व्यवसायाशी संबंधित निर्णय उत्साहाच्या भरात घेऊ नका, अन्यथा नंतर आपणास पश्चाताप होऊ शकतो. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी तसेच विश्वास वाढण्यासाठी प्रेमिकेच्या लहान-सहान गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही समस्येचे निराकरण करताना वाद न घालता संवाद साधणे उचित होईल. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. जोडीदाराचे सहकार्य पाउलोपाउली मिळेल.
14 / 15
कुंभ: नवीन ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे कामे उत्तम प्रकारे व वेळेवर करण्यास मदत होईल. कामगिरीची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. शासनाशी संबंधित व्यक्तींना महत्वाची जवाबदारी देण्यात येऊ शकते. अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळू शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांना लाभदायी होऊ शकतो. त्यांना मोठा धनलाभ संभवतो. आठवड्याच्या अखेरीस घराची दुरुस्ती किंवा सजावटीसाठी पैसा खर्च होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल.
15 / 15
मीन: हा आठवडा व्यावसायिक यशाचा व कौटुंबिक आनंदाचा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात, व्यवसायात व इतर क्षेत्रात मोठे यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे प्रगती व कौटुंबिक सुख-शांततेत वृद्धी होऊ शकते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने धनलाभ व यश मिळू शकते. कला, संगीत व पत्रकारितेशी संबंधित व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. व्यवसायात वाढ करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होऊ शकते. वरिष्ठांच्या मध्यस्थीने सर्व विवाद संपुष्टात येऊ शकतात. कुटुंबियांसह एखादा प्रवास करू शकता. कुटुंबियांच्या सहवासात मजेत वेळ घालविण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्राप्तीची अतिरिक्त साधने उपलब्ध होऊ शकतात. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. विश्वास वृद्धिंगत होईल. विवाहेच्छुकांचा विवाह ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यpitru pakshaपितृपक्षNavratriनवरात्रीchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक