शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:02 PM

1 / 15
आगामी कालावधीत शनिवारी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. अन्य कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी-मंगळ मेषेत, गुरू आणि हर्षल वृषभेत, रवी आणि शुक्र मिथुन राशीत आहे. शनिवारी शुक्र कर्क राशीत जाईल. तेथे तो बुधाशी युती करेल. केतू कन्येत, प्लूटो मकरेंत, शनी कुंभेत, तर राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून राहील मंगळवारी योगिनी एकादशी आहे. बुधवारी प्रदोष आहे. शुक्रवारी दर्श अमावास्या आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यात्रा आहे. संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी आहे. गुरुवारी शिवरात्रि आहे. शुक्रवारी सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश होणार आहे.
3 / 15
एकूणच ज्योतिषशास्त्र, धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या आगामी कालावधी विशेष आहे. जुलै महिन्यात आषाढी एकादशी आहे. चातुर्मास सुरू होत आहे. तत्पूर्वीचा हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? तुमच्या राशीवर ग्रहस्थितीचा कसा प्रभाव पडेल? कोणत्या राशींना काय लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींनी काहीसे सावध असावे? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी कालावधी अनुकूल आहे. प्रेमिकेसह बाहेर फिरावयास किंवा एखादा चित्रपट बघावयास जाऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होऊन एकमेकांवरील विश्वास वृद्धिंगत होईल. घरगुती खर्चात आपला वाटा राहील. प्राप्तीत वाढ होईल. जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडून कामावर लक्ष द्याल. असे झाल्याने कुटुंबात सुंदरसा समन्वय असल्याचे दिसून येईल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा उजळून उठेल व कामासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. वरिष्ठांकडून एखादी विशेष सुविधा मिळू शकते. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. प्रकृतीच्या बाबतीत मात्र थोडे सतर्क राहावे लागेल.
5 / 15
वृषभ: हा काळ सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांना चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरीत बदली होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ उन्नतीदायक आहे. वडिलांना मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. आर्थिक गुंतवणूक करावयाचीच असेल तर काही दिवसांनी करावी. एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. नशिबाची साथ मिळाल्याने अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. भाग्य उजळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल.
6 / 15
मिथुन: आगामी कालावधी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना नात्यात प्रगतीची संधी मिळेल. वैवाहिक जीवन प्रेमाने भिजून जाईल. नोकरी करणाऱ्यांना काम करण्यात मजा येईल, परंतु काही लोक षडयंत्र रचण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी आनंददायी काळ आहे. कामात प्रगती होईल. चांगली प्राप्ती होईल. खर्चात थोडी कपात होईल. असे झाल्याने संतुष्ट व्हाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. विषयांवरील त्यांची पकड मजबूत होईल.
7 / 15
कर्क: हा कालावधी अनुकूल आहे. प्रेमीजनांना मात्र लहान - सहान समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असू शकते. असे असले तरी नात्यातील प्रेम टिकून राहील. मित्रांसह फिरावयास जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. व्यापाऱ्यांना आव्हानांना सामोरे जाऊन प्रगती करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी कालावधी चांगला आहे.
8 / 15
सिंह: आगामी काळ चांगला आहे. प्रेमीजनांसाठी नवीन काहीतरी घेऊन येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नाते दृढ होईल. एखाद्या कामानिमित्त मित्रांशी बोलणी झाल्याने मन हलके होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर काम वेळेवर पूर्ण करणे हितावह होईल. पगारवाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना व्यापारा संबंधी नवीन कल्पना सुचतील, ज्याचा लाभ भविष्यात होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात मोठे यश प्राप्त होईल.
9 / 15
कन्या: हा काळ मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना नात्यात थोडी नीरसता जाणवू शकते. एकमेकांच्या सहवासात अधिक वेळ घालवावा लागेल. वैवाहिक जीवनात अत्यंत आनंदात राहू शकाल. प्रेम वृद्धिंगत होईल. आध्यात्मिक उन्नती होईल. वैवाहिक जोडीदार धार्मिक विचाराने ओतप्रोत होईल व आपणास अनेक कामात सल्ला देईल. नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ सावध राहण्याचा आहे. काही लोक आपल्यातील कच्च्या दुवांचा गैरफायदा घेऊन एखादे षडयंत्र रचू शकतात. तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धेत यश प्राप्त होईल.
10 / 15
तूळ: आगामी कालावधी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांच्या नात्यात वाद-विवाद संभवतात. सावध राहावे. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या बाबतीत थोडे सावधच राहतील. विरोधक सक्रिय होऊन आपणास नुकसान करण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांसाठी काळ सामान्यच आहे. खर्चात थोडी वाढ होईल, परंतु प्राप्ती ठीक राहील. विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात चांगले यश मिळाले तरी इतर विद्यार्थ्यांना काही अडथळे येऊ शकतात.
11 / 15
वृश्चिक: हा कालावधी अनुकूल आहे. प्रेमीजनांसाठी सुखावह आहे. प्रेमिकेसह दूरवर फिरावयास किंवा रात्री भोजनास जाण्यासाठी वेळ मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यातील प्रेम व रोमांस वृद्धिंगत होईल. नात्यात जी नीरसता आली होती ती आता दूर होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ काहीसा प्रतिकूल आहे. कामात चढ-उतार येऊ शकतात किंवा विरोधात एखादी व्यक्ती षडयंत्र रचू शकते. व्यापाऱ्यांसाठी उत्तम काळ आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर व्यापारास गती देण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात एखाद्या गोष्टीने समस्या निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
12 / 15
धनु: आगामी काळ सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांनी सावध राहावे. वैवाहिक जीवन आता थोडे सामान्य राहील. समस्या काही प्रमाणात कमी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. बढती मिळू शकते. तसेच नवीन टीमची जवाबदारी सोपविली जाऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत उन्नतीदायक आहे. व्यवसायास पुढे नेतील व त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतील. कुटुंबास खूप महत्व द्याल व कुटुंबियांसाठी काहीसे भावनाशील व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चढ-उतारांचा आहे. तेव्हा सावध राहावे.
13 / 15
मकर: हा काळ मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांना थोडा तणाव सहन करावा लागेल. वैवाहिक जीवन प्रेम व रोमांसाचा आधार घेऊन वाटचाल करेल. नात्यात एकमेकांना समजून घेतल्याने प्रेमाची भावना अजून वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला असला तरी आपले मन एखाद्या कारणाने विचलित होऊ शकते. तेव्हा कोणत्या समस्येमुळे त्रास होत आहे त्यावर विचार करून ती समस्या सोडवावी लागेल. व्यापारानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सरकारी यंत्रणेकडून एखादी समस्या निर्माण होऊ शकते. कोणतेही अवैध काम करू नका. खर्च वाढतील व त्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. असे केल्यासच वाढीव खर्च टाळू शकाल. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करू नका. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे.
14 / 15
कुंभ: आगामी कालावधी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन खूप मजा करतील. नात्यात भरपूर प्रेम व रोमांस भरलेला असेल. सासुरवाडीकडील लोकांची भेट झाल्यावर त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामचुकारपणामुळे गोत्यात येऊ शकतात, तेव्हा सावध राहावे. तसेच काम व्यवस्थित करावे. व्यापाऱ्यांना व्यापारास गती देण्यासाठी काही नवीन योजनांवर कार्यरत राहावे लागेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील.
15 / 15
मीन: हा कालावधी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन नात्यातील एकनिष्ठपणा दाखवतील. एकमेकांवरील विश्वास द्विगुणित होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनास उत्तम प्रकारे पुढे नेतील. कुटुंब व काम ह्यात समतोल साधाल. दोन्ही ठिकाणी सुखद परिणाम प्राप्त होतील. नोकरीत प्रतिष्ठा उंचावेल. व्यापाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकतात. व्यवसाय प्रगती करेल. काही नवीन ऑर्डर्स मिळाल्याने आत्मविश्वास उंचावेल. खर्चात कपात तर प्राप्तीत वाढीचा काळ आहे. मन हर्षित होईल. विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास उत्तम असला तरी काही अडथळे येण्याची संभावना आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य