शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३१ जुलै २०२२ ते ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 7:07 AM

1 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याप्रमाणे ऑगस्ट महिनाही महत्त्वाचा मानला गेला आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्यदिनासह गणेशोत्सवासारखे अतिशय महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. (August Weekly Horoscope)
2 / 15
मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. तर, सण-उत्सव आणि व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
3 / 15
श्रावणात नागपंचमीपासून ते पोळापर्यंत अनेकविध प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय लाभ मिळू शकतील, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया... (August Weekly Rashi Bhavishya)
4 / 15
मेष: हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल. असे केल्याने अभ्यासात आपणास येणाऱ्या अडचणींवर आपण सहजपणे मात करू शकाल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देण्यात यशस्वी होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपले आरोग्य बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा आहारावर लक्ष ठेवावे. नोकरी करणाऱ्यांना नवीन काम शिकावयास मिळेल. आपले कौशल्य विकसित होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपणास काही लोकांना घेऊन आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्याने अभ्यासात प्रगती होऊ शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
5 / 15
वृषभ: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेऊन कुटुंबियांसह वेळ घालवाल. आपल्या कौटुंबिक खर्चात वाढ होईल. आपण व्यक्तिगत जीवन व काम ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण खूप मेहनत व काम करण्यात आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून चांगले परिणाम मिळवाल. व्यावसायिक आपल्या व्यवसायात नवीन लोकांशी भागीदारी करून व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करू शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या संबंधात प्रेमाचा वर्षाव झाल्याने संबंध अधिक दृढ होतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी आशेचे किरण घेऊन येणारा आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी मनमोकळे राहून संबंध गंभीरतेने पुढे नेऊ शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.
6 / 15
मिथुन: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मित्रांसह फिरावयास जाऊ शकाल. ह्या प्रवासामुळे आपल्या मनास शांतता लाभेल. जोखीम घेण्याची आपली क्षमता वाढल्याने व्यवसायात आपणास फायदा होईल. आपणास अनेक नवीन लोकां बरोबर काम करण्याची संधी सुद्धा मिळेल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण नोकरीचा आनंद घेऊन आपल्या कामात नैपुण्य मिळवू शकाल. आपणास त्याचा खूप मोठा फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या संबंधात आकर्षण व जवळीक ह्यांचा लाभ घेतल्याने संबंधात आत्मीयता वाढेल. आपली वाणी आकर्षक राहील व आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी व एकाग्रता वाढविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
7 / 15
कर्क: हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कुटुंबाचा गंभीरपणे विचार करून कुटुंबियांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय आपण घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रवास करू शकाल. आपण आपले मित्र किंवा कुटुंबियांसह धार्मिक यात्रेस जाऊ शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण कुटुंबियांसह वेळ घालवू शकाल. त्याच बरोबर आपण आपल्या कामावर सुद्धा लक्ष केंद्रित करू शकाल. कामात असलेल्या समस्या समजावून घेऊ शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. व्यापारात जलदगतीने प्रगती होईल. आपला दूरदृष्टीपणा आपल्या उपयोगी येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमीजनांना आपल्या संबंधांप्रती गंभीर व्हावे लागेल. असे केल्यानेच आपण आपल्या प्रेमिकेस प्रभावित करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायी आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
8 / 15
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण पूर्ण उत्साहाने व मना पासून काम कराल. आपल्या सभोवतालच्या लोकांना खुश करण्याचा व त्यांचे कल्याण करण्याचा विचार केल्याने आपण खूप प्रबळ व्हाल. आपली कार्यक्षमता आपणास इतरांच्या पुढे नेऊन ठेवेल. जोखीम घेण्याची वृत्ती व्यवसायात नफा मिळवून देईल. ह्या दरम्यान केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आपणास लाभदायी होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच आनंददायी होईल. आपण आपल्या कार्यक्षेत्रात काही मनोरंजनात्मक प्रवृत्तीत सहभागी होऊन आनंदित व्हाल. आपल्या कामावर आपली पकड सुद्धा मजबूत होईल. प्रकृतीत चढ - उतार येतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीशी निराशा पसरेल. ह्यास कारणीभूत असेल ते आपल्या वैवाहिक जोडीदाराचे आजारपण. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली प्रेमिका आपल्यावर मनापासून प्रेम करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
9 / 15
कन्या: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपली प्रकृती चांगली राहिल्याने आपण नवीन काम करण्यास प्रोत्साहित व्हाल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनात इतरांचा होणारा हस्तक्षेप थोपवावा लागेल. असे केल्यानेच आपण आपल्या प्रेम संबंधांचा आनंद घेऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादा मोठा फायदा होऊ शकेल, ज्यामुळे आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद होईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना चांगली प्राप्ती होईल. ते ह्या चांगल्या दिवसांचा आनंद घेऊ शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मोकळेपणाने आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांना आपले काम आवडू लागेल. काही कारणाने सासुरवाडी कडील लोकांशी आपला संघर्ष संभवतो. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे मधले व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
10 / 15
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आपणास अचानकपणे नशिबाची साथ मिळाल्याने धनप्राप्ती होण्याची संभावना आहे. त्याच बरोबर आपली खोळंबलेली कामे पूर्ण होतील. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत सावध राहावे. आपले विरोधक सक्रिय होतील व त्यांच्या समोर आपण काहीसे कमी पडाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होऊन आपण सामान्य जीवन जगू शकाल. प्रेमीजनांच्या जीवनात नवीन विचारसरणीचा संचार होईल. आपण आपल्या संबंधांचा मापदंड मोजण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. आपले काम सुद्धा चांगले होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. आपल्या व्यावसायिक भागीदारांशी आपले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहावे. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आपण पुढील शिक्षणात सुद्धा यशस्वी व्हाल. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आपण कोणाच्याही भांडणात मध्यस्थी करण्याचे टाळावे, अन्यथा त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होण्याची संभावना आहे. आपणास एखादे आजारपण येण्याची शक्यता असल्याने स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. रक्तदाब किंवा एखादा अपघात संभवतो. तेव्हा सावध राहावे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या संबंधांप्रती सकारात्मक राहाल. प्रेमीजन संबंधांना खोलवर जाऊन समजू शकतील. आपल्या प्रेमिकेस सतत भेटण्याचा आग्रह धरतील, ज्यामुळे संबंध परिपकव होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. कामास गती येईल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण यशस्वी होऊन आपल्या कामात प्रगती सुद्धा कराल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
12 / 15
धनु: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आपल्या वडिलांना भेटून आपले मन हलके कराल व त्यांच्या प्रती आपले प्रेम व्यक्त कराल. कौटुंबिक जीवनात मिळून मिसळून राहाल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा मिळेल. कामात यश प्राप्त होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाच्या आधारे वाटचाल करेल. प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपली प्रेमिका रागावून आपल्या पासून दूर जाण्याची शक्यता सुद्धा आहे. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास चांगली प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
13 / 15
मकर: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. आठवड्याच्या मध्यास व अखेरीस आपणास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीच कामे यशस्वी होतील. ह्यात अशी काही कामे असतील ज्यांची आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल. व्यापारात तेजी येईल. आपणास लाभ मिळेल. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्याची संधी सुद्धा मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपली सर्व कामे समर्पण भावनेने कराल. आपले आरोग्य मध्यम राहिले तरी छातीत दुखणे किंवा पोटातील जळजळ ह्यांचा त्रास संभवतो. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या संबंधाचा प्रेमळ आनंद घेऊ शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. परस्पर प्रेम वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
14 / 15
कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम वृद्धिंगत होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास एखादा महत्वाचा सल्ला देईल, जो आपल्यासाठी खूपच उपयुक्त होईल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या प्रेमाने खूपच खुश होतील. तसेच तिला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न करतील. कर्ज फेडण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. दूरवरची ठिकाणे किंवा राज्ये ह्यांच्याशी हात मिळवणी करणे फायदेशीर होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात प्रबळ होऊन खूप मेहनत करतील. तरी सुद्धा त्यांना आपल्या सहकाऱ्यां पासून थोडे सावध राहूनच काम करावे लागेल. त्यांना आपल्या विषयी असे काही सांगू नये, जे त्यांच्यासाठी उपयुक्त व आपल्यासाठी नुकसानदायी असेल. प्रकृतीत चढ - उतार येतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश प्राप्त होईल. स्पर्धेत सुद्धा आपण यशस्वी व्हाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
15 / 15
मीन: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही विरोधकाशी भांडण करू नये, अन्यथा आपणास अडचणींना सामोरे जावे लागू शकते. खर्चात वाढ होईल. मानसिक तणावात सुद्धा वाढ होईल. धीर धरून आठवडा घालवावा. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी राहतील. आपण जर व्यवसाय करत असाल तर, आपला वैवाहिक जोडीदार आपल्या प्राप्तीत वाढ करण्यासाठी एखादे नवीन काम सुचवू शकेल. तेव्हा त्यांच्या सल्ल्याचे पालन करावे, जो आपल्या उपयोगी येईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपली प्रेमिका आपल्यावर मनापासून प्रेम करत असल्याची जाणीव आपणास होईल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. आपणास चांगला नफा होईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासात खूप मेहनत करतील व त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळतील. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य