शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑगस्टची सुरुवात होईल दमदार! ७ राशींना अच्छे दिन, धनलाभाचे शुभ योग; गुंतवणुकीतून मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 7:15 AM

1 / 15
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कोणताही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू, हर्षल मेष राशीत, रवी कर्क राशीत, मंगळ, बुध आणि शुक्र सिंह राशीत, केतू तूळ राशीत प्लूटो मकर राशीत शनी कुंभ राशीत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
अधिक महिना सुरू असून, अधिक महिन्यात येणारी अतिशय शुभ मानली गेलेली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आहे. बुधवारी रात्री ११:२७ पासून पंचक सुरु होत आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार पंचक राहील. ऑगस्टच्या सुरुवातीला ग्रहपालट नसला तरी आगामी काळात महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.
3 / 15
तसेच ०१ ऑगस्ट रोजी अधिक मासाची पौर्णिमा आहे. अधिक महिन्याची पौर्णिमा अतिशय विशेष मानली जाते. एकूण ग्रहमान पाहता आगामी काळ आपल्यासाठी कसा असेल? करिअर, नोकरी, शिक्षण, व्यवसाय, कुटुंब याबाबत कोणत्या राशींना लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य दाखवतील. समस्या दूर करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या मित्राशी जवळीक वाढू शकते. कुटुंबियांसह आनंद द्विगुणित होईल. प्राप्तीत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत होईल. आपणास लाभ होईल. व्यापाऱ्यांची मेहनत यशस्वी होईल. सुखाचे दिवस येतील. व्यवसायाची वृद्धी उत्तम होईल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. एकाग्रता टिकवून ठेवण्यावर लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
5 / 15
वृषभ: प्रगतीसाठी प्रेरित करणारा काळ ठरू शकेल. विवाहित व्यक्तींची मनःस्थिती उत्तम असल्याचे दिसून येईल. नोकरीत आपले मन रमेल. मानसिक तणाव वाढेल. कौशल्याच्या जोरावर कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल. व्यापाऱ्यांना सावध राहून कामे करावी लागतील. स्पर्धेमुळे त्रास होऊ शकतो. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ते मदत करतील. विद्यार्थ्यांना लक्ष अभ्यासावर केंद्रित झाल्याने चांगले परिणाम मिळतील. आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
6 / 15
मिथुन: चढ – उतारांचा काळ ठरू शकेल. वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. आर्थिक लाभ होईल. मनातील एखाद्या गोष्टीचा त्रास होईल. काही वाईट विचार मनात येऊ शकतात. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात खूप मेहनत करताना दिसतील. व्यापाऱ्यांना प्रयत्न वाढवावे लागतील. असे केल्यासच व्यवसायाची वृद्धी होईल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. मित्रांसह जास्त वेळ घालविण्या ऐवजी अभ्यासावर लक्ष दिल्यास त्यांचा फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य विषयक समस्येकडे दुर्लक्ष करू नये.
7 / 15
कर्क: विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवू शकतो. खर्चांत वाढ होऊ शकेल. मानसिक तणाव त्रस्त करेल. धीर धरून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच चांगला काळ आहे. मेहनत यशाचा मार्ग मोकळा करेल. व्यापारासाठी काहीसा चढ – उतारांचा काळ असू शकतो. बरीचशी कामे हाती येता येता स्थगित होण्याची संभावना आहे. थोडा धीर धरा. कामे होतील. विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला काळ आहे. मेहनत यशस्वी होईल.
8 / 15
सिंह: पूर्णतः अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात तणाव असले तरी नात्यात प्रेमाचे सुखद क्षण अनुभवता येतील. मिळणाऱ्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. खाजगी जीवन असो किंवा व्यावसायिक दोन्हींसाठी अनुकूल काळ असून, प्रगती होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. व्यापारात लाभ होऊन नफा वाढत असयाचे दिसून येईल. विद्यार्थ्यांना आपला अभ्यास अधिक चांगला होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
9 / 15
कन्या: कामात यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसून स्वतःच मेहनत करून मार्गस्थ व्हावे. नोकरीच्या ठिकाणी खूपच व्यस्त राहाल. दूरवरच्या प्रवास करावा लागेल. एखाद्या बहुराष्ट्रीय संस्थेत कार्यरत असाल तर परदेशवारी करण्याची संधी मिळू शकते. खर्च झपाट्याने वाढतील. असे असले तरी प्राप्तीत झपाट्याने वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी चढ – उतारांचा काळ आहे. सरकारी क्षेत्राकडून एखादा लाभ होऊ शकतो, मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एकाग्रता वाढविण्यासाठी एखाद्या सल्लागाराची मदत घ्यावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
10 / 15
तूळ: वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह खरेदीस जाण्याचा बेत ठरवू शकाल. प्रलंबित योजना पूर्णत्वास जातील. आर्थिकदृष्ट्या काही लाभ संभवतो. सरकारी क्षेत्राकडून मोठ्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता. जमीन – जुमल्याशी संबंधित बाबी लक्ष वेधून घेतील. नोकरीच्या ठिकाणी स्थिती मजबूत राहील. कामावर लक्ष केंद्रित कराल. व्यापारात प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीने प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे यथायोग्य फल मिळेल.
11 / 15
वृश्चिक: अत्यंत अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आपलीच व्यक्ती विरोधात जाण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. मधुर वाणीने लोक प्रभावित झाल्याने आपली कामे होऊ लागतील. नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्त होईल. मनोबल उंचावेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असेल. कोणाशीही वाद घालणे किंवा कटू बोलणे टाळा. अति आत्मविश्वासात न राहणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना व्यावसायिक भागीदाराचा पूर्ण पाठींबा राहील. योजनांच्या आधारे व्यापारास गती देण्यात सक्षम व्हाल. दूरवरचे प्रवास व्यापारासाठी फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांसाठी मिश्र फलदायी काळ आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
12 / 15
धनु: सध्या घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. विशेषतः सरकारी क्षेत्राशी संबंधित काम असेल किंवा एखादी सरकारी निविदा भरावयाची असेल तर सावध राहावे. अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. एखाद्या ठिकाणी बदली किंवा खाते बदल होण्याची संभावना आहे. पगारवाढ संभवते. व्यापाऱ्यांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. भरपूर प्रवास करावे लागतील. कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
13 / 15
मकर: चढ - उतारांचा काळ आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतात. कौटुंबिक वातावरण सामान्यच राहील. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. मेहनत यशस्वी होईल. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ होण्याची संभावना आहे. खर्चात वाढ होईल. सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांना लक्ष विचलित होण्याच्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा. आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपले मन काहीसे अशांत राहील.
14 / 15
कुंभ: योजना यशस्वी होतील. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. यशदायी काळ आहे. कामगिरी उत्तम झाल्याने आपणास चांगले यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. गप्पागोष्टीत वेळ न घालवता कामात लक्ष घातले तर हा काळ खूपच चांगला आहे. किरकोळ खर्च होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल कालावधी आहे. योग्य दिशेने मेहनत करावी. तेलकट व मसालेदार पदार्थांपासून दूर राहावे.
15 / 15
मीन: सासुरवाडीकडील लोकांशी सलोखा होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात खूप कष्ट केल्यासच फायदा होईल. व्यापाऱ्यांना व्यवसायात यशस्वी होण्याची मोठी संधी मिळेल. विरोधकांपासून सावध राहून स्वतःवर विश्वास ठेवून कामे करावीत. खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. विनाकारण कोणाशीही वाद घालत बसू नका. विद्यार्थ्यांसाठी चांगला कालावधी आहे. तांत्रिक विषयात यश प्राप्ती होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र फलदायी आहे. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यAdhik Maasअधिक महिना