Weekly Horoscope: 4th to 10th December 2022,These zodiac signs will be blessed by Dhana Lakshmi
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य ४ ते १० डिसेंबर २०२२, 'या' ४ राशींवर धनलक्ष्मीची कृपा राहील By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 10:24 AM1 / 12मेष- मोती संधी मिळेल सप्ताहाच्या सुरुवातीला सामान्य परिस्थिती राहील. मनात थोडी धाकधूक राहील. मात्र, हळूहळू ग्रहमान अनुकूल होत जाईल. अचानक मोठी संधी मिळेल. आर्थिक आवक चांगली. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भावंडांशी सख्य राहील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येतील. मौजमजा करण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायात बरकत राहील. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जे काही नवीन शिकाल त्याचा पुरेपूर फायदा होईल. टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, चांगले दिवस.2 / 12वृषभ- संमिश्र फळे मिळतील. हा सप्ताह आपणास संमिश्र स्वरूपाची फळे देणारा राहील. सुरुवातीला काही अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळणे आवश्यक आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. सप्ताहाच्या मध्यावधीत आपल्या अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. प्रेमात सफलता मिळेल. विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. घरगुती वादाचे प्रसंग टाळा. टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस3 / 12मिथुन- अचानक प्रवास होईल. साधकबाधक परिस्थिती राहील. सुरुवातीला अचानक अडचणी येतील. त्यातून संयमाने मार्ग काढला पाहिजे. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. अनोळखी लोकांपासून दूर राहा. अचानक प्रवास करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. उत्तरार्धात मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. टीप: मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.4 / 12कर्क- धनलक्ष्मीची कृपा राहील या सप्ताहात आपल्याला अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करता येईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. विविध मार्गानी प्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील, नावीन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याचे मनात येईल. त्यात यश मिळेल. नोकरीत सुरुवातीला अडचणी येतील. काहींना नोकरीत बदलीला सामोरे जावे लागेल. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येतील. लोकांसाठी झटावे लागेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.5 / 12सिंह- ओळखीचे फायदे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला लोकापवादातून त्रास होऊ शकतो. थोडे सावधपणे वागणे आवश्यक आहे. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात येईल. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. ओळखीचे फायदे होतील. कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल. त्यातून तुमचा फायदा होईल. अचानक मोठी संधी मिळेल. काहींना मोठे पद व पगारवाढ असे फायदे होतील. प्रवासकार्य साधक ठरतील. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येतील. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. टीप: बुधवार, गुरुवार, शुक्रवार, चांगले दिवस.6 / 12कन्या- नोकरी व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. कायद्याची बंधने पाळणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामात सुरुवातीला अडचणी येतील; पण त्यानंतर कामे मार्गी लागतील. तुमचा नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. टीप: बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.7 / 12तूळ - प्रशंसा होईल. सुरुवातीला काही अडचणी असतील. मनात धाकधूक वाटत राहील. जीवनसाथीशी गैरसमज होतील. वाद विकोपाला जाणार नाहीत, याची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात खबरदारी घ्या. काहीना अचानक धनलाभ होईल. व्यवसायात बरकत राहील. प्रवासात दगदग होईल. वाहनाची दुरुस्ती वेळीच करुन घ्या. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. हातून एखादे चांगले काम होईल. त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. नोकरीत दगदग, भावंडांच्या भेटीगाठी होतील. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. टीप : मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.8 / 12वृश्चिक- प्रेमात यश मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. त्यात तुमचा चांगला फायदा होईल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. काही लोकांमुळे डोक्याला वैताग होईल. व्यवसायात बरकत राहील. टीप: रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.9 / 12धनू - मनात आनंदी अनुकूल विचार राहतील. कामात परिस्थिती आत्मविश्वास राहील. नोकरीत तुमचा प्रभाव • पडेल. तुमच्या गुणांची कदर केली जाईल. नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या जातील. तुमच्या सुखसुविधा वाढवून मिळतील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. भेटवस्तू मिळतील. विवाहेच्छूचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. गृहसौख्य उत्तम राहील. नवीन घर किवा घरासाठी महागड्या वस्तू खरेदी कराल. जवळच्या प्रवासाचे नीट नियोजन करा. टीप: मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस10 / 12मकर- चैनीवर खर्च कराल सरकार दरबारी खोळंबून राहिलेली कामे पूर्ण होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. व्यवसायात आगेकूच सुरु राहील. नोकरीत काही अनपेक्षित अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. मुलांना मोठ्या संधी मिळतील. तुमचा नावलौकिक वाढवणाच्या घटना घडतील. हितशत्रूंपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.11 / 12कुंभ- उच्च पद मिळेल : नोकरीत तुमचे 'वर्चस्व प्रस्थापित करण्यात सफल व्हाल. उच्च पद, अधिकार मिळू शकतात. नवीन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यात तुमचा फायदा होईल. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भावंडांशी गैरसमज होतील, त्यांना मदत करावी लागेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अनेक मार्गानी धनप्राप्ती होईल. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल, परीक्षेत यश मिळेल. मुलांची प्रगती कळेल. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, चांगले दिवस.12 / 12मीन- कामात उत्साह राहील अतिशय. उत्साहाने कामे कराल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना नवीन संधी मिळतील. काहींची इच्छित स्थळी बदली होऊ शकते. घरी पाहुणे येतील. गृहसौख्य चांगले राहील. महागड्या वस्तू खरेदी कराल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. टीप: गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद) आणखी वाचा Subscribe to Notifications