Weekly Horoscope A fruitful week forthis zodiac sign people big work will be done
साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 1:49 PM1 / 13धार्मिक, सांस्कृतिक व्रतांसह त्रिग्रही गोचराचा प्रभाव कसा असेल, कोणत्या राशींना जीवनातील विविध आघाड्यांवर यश, प्रगती करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल? जाणून घेऊया...2 / 13हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कामात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्री अचानक आपल्यावर कामाचा जास्तीचा भार येण्याची संभावना आहे. हि कामे पूर्ण करण्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम व प्रवास करावे लागतील. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना आपल्या स्पर्धकांशी जास्त स्पर्धा करावी लागू शकते. ह्या दरम्यान प्रकृती सुद्धा काहीशी नाजूक होऊ शकते, तेव्हा आपल्या दिनचर्येवर व आहारावर लक्ष द्यावे. परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांच्या मार्गात अनेक अडचणी येऊ शकतात. प्रेम प्रसंगात घाई - घाईत किंवा भावनेच्या भरात केलेली कृती एखाद्या मोठ्या संकटात टाकू शकते. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका.3 / 13हा आठवडा आपल्यासाठी कधी सुख तर कधी दुःख देणारा आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ - उतार पाहावयास मिळू शकतात. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे एखादा दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. आपण जर अनेक दिवसांपासून रोजगाराच्या प्रतीक्षेत असाल तर अजून काही दिवस आपणास त्याची वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आठवड्याच्या उत्तरार्धात आपले सहकारी व वरिष्ठ ह्यांच्या बरोबर राहून काम करावे लागेल. प्रवासा दरम्यान आपल्या सामानाची व प्रकृतीची काळजी घ्यावी. परीक्षा - स्पर्धा यांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम करूनच यश प्राप्त होईल. एखाद्या महिला मित्राच्या मदतीने प्रणयी जीवनात उदभवलेले गैरसमज दूर होतील, परंतु आपसातील विश्वास पुन्हा मिळविण्यात थोडा वेळ लागू शकतो.4 / 13आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने अनेक दिवसांपासून स्थगित झालेले एखादे मोठे काम पूर्ण होईल. ह्या दरम्यान सत्ता व शासनाशी संबंधित लोकांचे पूर्ण सहकार्य आपणास मिळेल. आठवड्याच्या मध्यास कार्यक्षेत्री जे आपल्यावर जळतात, त्यांच्या पासून आपणास सावध राहावे लागेल. जमीन - जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येतील. आपण जर भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आर्थिक बाबींची स्पष्टता करूनच वाटचाल करणे आपल्यासाठी हितावह होईल. परीक्षा - स्पर्धा यांची तयारी करत असलेल्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल.5 / 13आठवड्याच्या सुरुवातीस एखादे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते, परंतु त्यामुळे अति उत्साहाच्या भरात आपली शुद्ध हरपणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही जोखमी योजनेत आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा भविष्यात खूप मोठे नुकसान सुद्धा सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपली पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्याची कामना पूर्ण होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ असे दोघे हि आपली प्रशंसा करत असल्याचे दिसून येईल. जमीन - घर यांच्या खरेदी - विक्रीतून लाभ होईल. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना माता - पित्यांचे पूर्ण सहकार्य व समर्थन मिळेल. आपण जर परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आठवड्याच्या अखेरीस मित्र किंवा कुटुंबियांसह एखादा सहलीचा कार्यक्रम होऊ शकतो. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.6 / 13या आठवड्यात आपणास आपली प्रकृती व आपले संबंध यांची खूप काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्यास आपल्या कामावर परिणाम होण्याची संभावना आहे. हाती आलेली एखादी मोठी संधी गमावल्याचा त्रास होऊ शकतो. आपली एखादी लहानशी चूक आपली प्रतिष्ठा मलिन करू शकते. ह्या दरम्यान आपणास आपल्या विरोधकांपासून सुद्धा सतर्क राहावे लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन - घर यांच्याशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या कार्यक्षेत्री अत्यंत सतर्क राहावे लागेल. प्रणयी जीवनात विचारपूर्वक वाटचाल करावी. कोणत्याही प्रकारची घाई किंवा प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात जरुरीपेक्षा जास्त हस्तक्षेप करणे संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरू शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा.7 / 13हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्यशाली व शुभ परिणाम देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास पूर्वी केलेल्या एखाद्या कामामुळे सन्मानित केले जाऊ शकते. ह्या दरम्यान आपणास एखादी मोठी जवाबदारी सुद्धा मिळू शकते. बाजारातील तेजीचा फायदा उचलण्यात आपण यशस्वी व्हाल. बाजारात आपली प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. ज्यांना आपल्या नोकरीत बदल करावयाचा आहे, त्यांना आठवड्याच्या अखेरीस एखाद्या मोठ्या ठिकाणाहून ऑफर सुद्धा येऊ शकते. आपण जर दीर्घ काळा पासून व्यवसाय वृद्धीचा विचार करत असाल तर आपली हि कामना पूर्ण होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात सुख - सुविधेशी संबंधित एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करू शकता. त्यामुळे आपल्या घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल.8 / 13 आठवड्याच्या सुरवातीस आपली खूप धावपळ होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान आपणास एखाद्या वादामुळे कोर्ट - कचेरी सुद्धा करावी लागू शकते. परंतु कोणताही वाद कोर्टाच्या बाहेर मिटविणे हितकारक होईल. आठवड्याच्या सुरवातीस लहान भावंडांशी असलेला वाद आपल्या मानसिक त्रासास कारणीभूत ठरू शकेल. ह्या दरम्यान कोणाशीही बोलताना आपली वाणी संयमित ठेवावी, अन्यथा वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान - सहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्या ऐवजी त्यांना दुर्लक्षित करणे आपल्या हिताचे होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकीर्द - व्यवसाय निमित्ते दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. हे प्रवास सुखद परंतु अपेक्षेहून काहीसे कमी लाभदायी होऊ शकतात. आपण जर कोणा समोर आपले प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर त्यात घाई करू नका. योग्य वेळ आल्यावरच ते व्यक्त करा, अन्यथा मिळणारा होकार मिळू शकणार नाही. पूर्वी पासून असलेले प्रेम संबंध प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.9 / 13आठवड्याच्या सुरवातीस आपण पूर्वी केलेले प्रयत्न व परिश्रम यांचे सुखद परिणाम मिळताना दिसू शकेल. कारकीर्द - व्यवसाय यांच्याशी निगडित एखादी चांगली बातमी मिळू शकते. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रातील विरोधकांपासून सतर्क राहावे लागेल, अन्यथा ते आपली होऊ घातलेली कामे बिघडवू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांचे अभ्यासा वरील लक्ष विचलित होऊ शकते. आपण जर एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असाल तर कठोर परिश्रम करूनच अपेक्षित यश मिळवू शकाल. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या प्रेम संबंधात समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी कोणतीही समस्या संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या अखेरीस जोडीदारासह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेचे कारण होऊ शकते.10 / 13आठवड्यात आपण जर वेळ व ऊर्जेचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालात तर अपेक्षेहून जास्त यशाची व लाभाची प्राप्ती आपणास होऊ शकते. ह्या दरम्यान आपला प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क वाढेल व भविष्यात त्यांच्या मदतीने लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या महिला एखादे उद्दिष्ट गाठू शकतील, व त्यामुळे कार्यक्षेत्री तसेच कुटुंबात त्यांच्या मान - सन्मानात वाढ होईल. विवाहेच्छुकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. कदाचित आपले आई - वडील आपल्या प्रेमावर शिक्का मोर्तब करून विवाहास हिरवा कंदील दाखवतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आईची प्रकृती आपल्या चिंतेचे कारण होऊ शकते. ह्या दरम्यान स्वतःच्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी. वाहन सावकाश चालवावे.11 / 13आठवड्यात आपल्या जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अतिरिक्त धावपळ व परिश्रम करावे लागू शकतात. आठवड्याच्या सुरवातीस घर दुरुस्ती इत्यादी कामांमुळे आपण अधिक व्यस्त राहण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात अचानकपणे आलेले जास्तीचे खर्च आपल्या आर्थिक स्थितीस प्रभावित करू शकतात. आपण जर रोजगाराच्या शोधात असाल तर आपणास अजून थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांवर कामाचा भार अचानकपणे वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ देऊ नका. घरगुती समस्या संवाद साधून दूर करण्याचा प्रयत्न करा. ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीमुळे प्रेमिकेशी निर्माण झालेले गैरसमज आपल्या प्रणयी जीवनास प्रभावित करू शकतात. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेस कारणीभूत ठरेल.12 / 13 आठवड्यात आपणास आळस व अभिमान दूर ठेवावा लागेल. अशा वेळी आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती न टाळल्यास आपणास मोठे नुकसान सोसावे लागू शकते. जमीन - जुमल्याशी संबंधित वाद जर कोर्ट - कचेरी ऐवजी आपसात बोलणी करून मिटवू शकलात तर जास्त उपयुक्त ठरेल. आठवड्याचे मधले दिवस व्यवसायास प्रतिकूल आहेत. ह्या दरम्यान आपणास आर्थिक देवाण - घेवाण करताना अत्यंत सावध राहावे लागेल. कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल, अन्यथा नंतर नुकसान सोसावे लागू शकते. प्रवासात आपल्या सामानाची व प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रणयी जीवनात सावधपणे वाटचाल करावी. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा दुर्लक्षित करू नये.13 / 13आठवड्याच्या सुरवातीस आपणास कठोर परिश्रम व प्रयत्न केल्यावरच अपेक्षित यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपले काम इतरांच्या भरवशावर सोडण्या ऐवजी स्वतःच करावे. अन्यथा आपणास वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील. आठवड्याची सुरवात व्यापाऱ्यांसाठी जरी काहीशी मंद झाली तरी उत्तरार्धात त्यांना अपेक्षित फायदा होईल. ह्या दरम्यान बाजारातील तेजीचा लाभ घेण्यात आपण यशस्वी व्हाल. संचित धनाची वृद्धी होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधला जाईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची व संबंधांची खूप काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपण ऋतुजन्य किंवा एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त होऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications